Topic icon

डोपिंग

0

डोपिंग म्हणजे खेळाडूंनी त्यांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी घेतलेली निषिद्ध औषधे किंवा केलेले अनैतिक उपाय.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5300
2
डोपिंग काय प्रकार आहे.

डोपिंग प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास 'त्या' खेळाडूचे तात्पुरते निलंबन करण्यात येते. मात्र, त्या खेळाडूला आपली बाजू मांडण्याची यावेळी परवानगी देण्यात येते. काही वेळा खेळाडूला स्पर्धेतून कायमचे बाद ठरवण्यात येऊ शकते. तर काही वेळा दोन ते पाच वर्षासाठी किंवा आजीवन बंदीही लागू करण्यात येऊ शकते. तसेच खेळाडूने जिंकलेली पदके या चाचणीत दोषी आढळल्यास काढून घेतली जातात.

खेळाडू उत्तेजक पदार्थाचे सेवन करुन स्नायूंची आमि मज्जातंतूची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतात. याचे दूरगामी परिमान खेळाडूच्या आरोग्यावरही होते. यामुळे डोपिंगची चाचणी घेतली जाते. ही चाचणी वाडा (वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी) आणि नाडा (नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ) या एजन्सी मार्फत होते 

कशी होते डोपिंग चाचणी -

महत्वपूर्ण बाब म्हणजे, कुठल्याही खेळाडूंची डोपिंग चाचणी घेण्यात येऊ शकते. ती कुठल्याही स्पर्धेपूर्वी किंवा प्रशिक्षणादरम्यान घेतली जाऊ शकते. ही चाचणी ‘वाडा’ किंवा ‘नाडा’ कडून घेतली जाते. ही चाचणी खेळाडूचे रक्त आणि मूत्राचे नमुने घेऊन केली जाते. महत्वाचे म्हणजे, हे नमुने खेळाडूंसमोरच घेतले जातात आणि ते सिलबंद केले जातात आणि ते नमुने नाडाच्या प्रयोगशाळेत तपासले जातात. तो खेळाडू ए चाचणीत दोषी आढळल्यास त्याचे तात्पुरते निलंबित केले जाते.त्यानंतर तो खेळाडू बी चाचणीसाठी अपील करू शकतो. यावर या नमुन्यांची पुन्हा तपासणी केली जाते. जर बी चाचणीतही खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षा केली होते.

डोपिंग प्रकरणात कोणती कारवाई होते -

डोपिंग प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास 'त्या' खेळाडूचे तात्पुरते निलंबन करण्यात येते. मात्र, त्या खेळाडूला आपली बाजू मांडण्याची यावेळी परवानगी देण्यात येते. काही वेळा खेळाडूला स्पर्धेतून कायमचे बाद ठरवण्यात येऊ शकते. तर काही वेळा दोन ते पाच वर्षासाठी किंवा आजीवन बंदीही लागू करण्यात येऊ शकते. तसेच खेळाडूने जिंकलेली पदके या चाचणीत दोषी आढळल्यास काढून घेतली जातात.


उत्तर लिहिले · 13/3/2021
कर्म · 14895
0
`डोपिंग' (Doping) करण्याचे एक कारण खालीलप्रमाणे दिले आहे:

खेळामध्ये चांगले प्रदर्शन करण्यासाठी: खेळाडू अनेकदा उत्तेजक पदार्थांचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढते. ताकद वाढवणे, अधिक ऊर्जा मिळवणे आणि सहनशक्ती सुधारणे यांसारख्या फायद्यांसाठी खेळाडू डोपिंग करतात.

उदाहरणार्थ:

  • काही खेळाडू स्टेरॉइड्स (steroids) घेतात, ज्यामुळे त्यांची ताकद वाढते.
  • काही उत्तेजक औषधे घेतात, ज्यामुळे त्यांना अधिक वेळ खेळण्याची ऊर्जा मिळते.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5300
0

डोपिंगचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

  1. स्टिम्युलंट्स (Stimulants):
    • हे औषध ॲथलीटला अधिक सतर्क आणि उत्साही बनवतात.
    • उदाहरण: ॲम्फेटामाइन (Amphetamine).
  2. ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स (Anabolic Steroids):
    • हे स्नायूंची वाढ जलद करतात आणि ताकद वाढवतात.
    • उदाहरण: टेस्टोस्टेरॉन (Testosterone).
  3. पेप्टाइड हार्मोन्स (Peptide Hormones):
    • यामध्ये Erythropoietin (EPO) चा समावेश होतो, जे लाल रक्तपेशींची संख्या वाढवते आणि ऑक्सिजनची क्षमता सुधारते.
  4. डाययुरेटिक्स (Diuretics):
    • हे औषध शरीरातील पाणी कमी करतात, ज्यामुळे वजन कमी होते आणि काही औषधे लपवण्यासाठी मदत होते.
  5. ब्लड डोपिंग (Blood Doping):
    • ॲथलीटच्या शरीरात जास्त ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी रक्ताचे प्रमाण वाढवले जाते.
  6. जन डोपिंग (Gene Doping):
    • यामध्ये ॲथलीटच्या डीएनए (DNA) मध्ये बदल केला जातो, ज्यामुळे त्याची क्षमता वाढते.

हे सर्व प्रकार खेळाडूंच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत आणि नियमांनुसार गैर मानले जातात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5300
9
डोपिंग म्हणजे,
खेळाडूंना शारीरिक क्षमता वाढवून स्पर्धेत चांगले प्रदर्शन करता यावे म्हणून केलेले नशेदार अंमली पदार्थांचे सेवन करतात... खेळाडूनी नशा इत्यादी पदार्थांचे सेवन केले आहे का हे पाहणे... खेळाडूची प्रशिक्षण शिबिरात किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत  उतरण्यापूर्वी ही परीक्षा घेतली जाते...
स्टिरॉइड, पेपटाईड हार्मोन, नार्कोटिक्स, डाययुरेटिक्स आणि ब्लड डोपिंग यांचा समावेश होतो... खेळाडूचे युरिन टेस्ट होते व पोसिटीव्ही आढळल्यास बंदी लागते... विश्व डोपिंग संस्था आणि राष्ट्रीय डोपिंग संस्था ह्या संस्थांकडून ही टेस्ट होते...
उत्तर लिहिले · 6/9/2018
कर्म · 458580