4 उत्तरे
4
answers
संगणक म्हणजे काय?
1
Answer link
संगणक म्हणजे काय?

उदा.माहिती पाठवणे ,तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे .
0
Answer link
श्रोत -https://www.digitalmahiti.in/information-of-computer-in-marathi/
संगणक हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती (Data) विश्लेषण, माहिती प्रक्रिया (Processing), सांख्यिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे.
संगणकावर कोणतेही काम करण्यासाठी संगणकाला सूचना (Instructions) द्याव्या लागतात. दिलेल्या सुचनांनुसार संगणक डेटावर प्रक्रिया करून डेटा आउटपुट च्या स्वरूपात परत करते. संगणकामध्ये डेटाला साठवण्याची, परत करण्याची वर डेटावर प्रक्रिया करण्याची क्षमता असते. संगणक एका वेळेस हजारों प्रक्रिया करण्यास सक्षम असते.
संगणकाला इंग्रजी भाषेत Computer असे म्हटले जाते. Computer हा शब्द Compute या शब्दापासून बनला आहे. Compute चा मराठी अर्थ गणना करणे असा होतो. पूर्वीच्या काळी संगणकाचा वापर फक्त गणना करण्यापर्यंतच मर्यादित होता त्यामुळे Computer हे नाव दिले गेले. सुरुवातीच्या काळातील संगणक विकसीत नव्हते, त्यांचा उपयोग गणितीय क्रिया करण्यापर्यंत मर्यादित होता. कालांतराने जसे जसे तंत्रज्ञान वाढत गेले त्यानुसार संगणकात प्रचंड प्रमाणात बदल होत गेले आणि संगणक आधुनिक झाले.
0
Answer link
संगणक (Computer) म्हणजे काय?
संगणक एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. हे उपकरण डेटा (Data) आणि सूचना (Instructions) स्वीकारून त्यावर प्रक्रिया (Process) करते आणि निकाल (Output) देते.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास:
- संगणक माहिती स्वीकारतो.
- त्या माहितीवर प्रक्रिया करतो.
- आणि आपल्याला अपेक्षित निकाल देतो.
संगणकाची काही मुख्य कार्ये:
- डेटा स्वीकारणे: कीबोर्ड, माउस यांसारख्या इनपुट उपकरणांमार्फत डेटा स्वीकारतो.
- डेटा साठवणे: डेटा आणि सूचना मेमरीमध्ये साठवतो.
- प्रक्रिया करणे: साठवलेल्या डेटावर प्रक्रिया करतो.
- निकाल देणे: मॉनिटर किंवा प्रिंटरद्वारे निकाल दर्शवितो.
उदाहरण:
तुम्ही कीबोर्डवर 2 + 2 टाइप केले, तर संगणक हे आकडे स्वीकारतो, त्यांची बेरीज करतो आणि मॉनिटरवर 4 असा निकाल दाखवतो.
अधिक माहितीसाठी: