कला संगीत

संगीत म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

संगीत म्हणजे काय?

0
संगीत

नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदीत असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो.संगीत हे ईश्वराने दिलेली एक देन आहे.आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात.संगीत आयुष्याला प्रेरणा देते.एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.
उत्तर लिहिले · 25/1/2021
कर्म · 14895
0

संगीत म्हणजे ध्वनी आणि लय यांचा एक कलात्मक मिलाफ.

संगीताची व्याख्या:

  • ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार, "स्वर किंवा लयबद्धतेत तयार केलेले आवाज, विशेषत: गायन किंवा वाद्यांच्या माध्यमातून."
  • Merriam-Webster डिक्शनरी नुसार, "आवाज अशा प्रकारे एकत्र करणे की ते सौंदर्यपूर्ण, सुसंवादी आणि भावनात्मकदृष्ट्या अर्थपूर्ण असेल."

संगीताचे घटक:

  • स्वर (सुर): हे संगीतातील मूलभूत घटक आहेत.
  • लय: लय म्हणजे वेळेनुसार स्वरांची रचना.
  • ताल: ताल म्हणजे लयबद्धतेचे एक आवर्तन.
  • melody (राग): melody म्हणजे स्वरांची एक विशिष्ट क्रमाने केलेली रचना.
  • harmony (संवाद): harmony म्हणजे एकाच वेळी दोन किंवा अधिक स्वर एकत्र वापरणे.

संगीताचे प्रकार:

संगीताचे अनेक प्रकार आहेत, जसे:

  • शास्त्रीय संगीत
  • सुगम संगीत
  • लोकसंगीत
  • पाश्चात्त्य संगीत

संगीताचे महत्त्व:

संगीत हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हे आपल्याला आनंद, शांती आणि प्रेरणा देते.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5220

Related Questions

अजिंठा येथील लेणी यावर सविस्तर निबंध लिहा?
कविता लिहिण्यासाठी कवीकडे काय असायला पाहिजे?
ग्रामीण कलेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
अभिनेत्री म्हणून सुलभा देशपांडे यांच्या नाटकातील भूमिकांबद्दल थोडक्यात माहिती?
अभिनेत्रीची म्हणून सुलभा देशपांड नाटकातील भूमिकेशी तन्मयता in few words?
अभिनेत्रीची म्हणून सुलभा देशपांड नाटकातील भूमिकेशी तन्मयता?
अभिनेत्री म्हणून सुलभा देशपांड े यांना जाणवलेले नाटकाच े आशयसूत्र in few words?