3 उत्तरे
3
answers
पर्यावरण म्हणजे काय?
3
Answer link
हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणूस, सर्व मिळून पर्यावरण बनत असते. निसर्गामध्ये या सगळयांचे प्रमाण व त्यांची रचना अशा विशिष्ट प्रकारे केलेली असते की, पृथ्वीवर एक संतूलित जीवन चालत राहावे अनेक कोटी वर्षापूर्वी जेव्हा माणूस , पशुपक्षी, कीटक, जंतू पृथ्वीवर जन्माला येऊ लागले तेव्हापासून निसर्गाचे हे चक्र अखंड आणि सुरळीत रितीने चालत आले आहे. ज्याला जितकी आवश्यक आहे. तितके त्याला मिळत असते आणि निसर्ग पुढच्यासाठीही व्यवस्था करत आलेला असतो.
पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात. आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो. पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते. कारण हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
1
Answer link
पर्यावरण म्हणजे आपला परिसर . जमीन , आकाश व पाणी हे पर्यावरणाचे प्रमख घटक आहेत तर यामधील जैविक व अजैविक घटक मिळून परिसर अर्थात पर्यावरण तयार होते .
जैविक घटकामध्ये आपण म्हणजे मानव , सर्व प्रकारचे जीव , वनस्पती , झुडपे यांचा समावेश आहे.
तर अजैविक घटकामध्ये हवा , आकाश , हवेतील सर्व वायू , सूर्य किरणे , प्रकाश , सर्व प्रकारचे रासायनिक मूलद्रवे इत्यादी येतात. या सर्व घटकाचा उपयोग करून जीव सृष्टी जीवित राहते . म्हणूनच पर्यावरण सुरक्षित तर मानव सुरक्षित हे आपणास आता पटले आहे.
आपले पाण्याचे साठे ज्यात महासागर , समुद्र , नद्या , तळी , पाण्यातील जीव सृष्टी , पाण्यातील रसायनाचे घटक , त्याचे साठे , आकाश , सूर्य , चंद्र , सूर्यकिरणे , सूर्य ऊर्जा , तसेच आकाशातील इतर ग्रह , जमिनीवरील उंच ,लहान पर्वत , मोठं -मोठी वाळवंट , वोल्कॅनो , डोंगरातील द-या , हे सारे पर्यावर्णाचे घटक आहेत .
पाण्यातील जिवाणू , विविध प्लवक , मासे व इतर सर्व जीव सृष्टी , समुद्रातील सूक्ष्म शेवळापासून ते महाकाय सस्तन सागरी प्राणी , विविध प्रकारचे पाण्यातील शेवाळ ,जंगलातील सर्व वन्य जीव , सर्व वृक्ष सृष्टी, गवताळ प्रदेश, पक्षी जग , डोंगरातील जीव सृष्टी हे सर्व ही पर्यावरणातील जैविक घटक आहेत .
पर्यावरणातील प्रत्येक जैविक घटक पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी जबाबदार आहे , जमिनीवर सर्व प्रकारची वनस्पती यामध्ये झाडे , झुडपं , पिकं , फळाची झाडे अन्न निर्मिती , ऊर्जा उत्पन्न करतात म्हणून यांना उत्पादक म्हणतात ज्यावर मानवासहित सर्व इतर जीव सृष्टी जिवंत आहे . तर पाण्यात सूक्ष्म शेवाळ , हरित द्रव्य असलेले प्लवक , इतर मोठे शेवाळ अन्न निर्मिती करतात ज्यावर अन्न साखळी मुळे सर्व पाण्यातील जीव सृष्टी जगते.
मनुष्य म्हणजे आपण पर्यावरणात खूप बदल केले . मानवाने नद्यांवर मोठी धरण बांधून पिण्या, शेती , उद्योगासाठी पाण्याची सोय केली , शहरी करण , शेती ,रस्ते , इत्यादी साठी खूप जंगल तोड केली . सुमद्रात भराव टाकून समुद्राचे खूप क्षेत्र उदयोग ,इमारती बांधण्यासाठी केला.
आपण पर्यावरणात बदल करून जे काही केले त्यामुळे आपली प्रगतीझाली पण त्याबरोबर मानवाने पर्यावरणासाठी काही केले नाही , त्याची काळजी घेतली नाही . इत्यादींमुळे आज जगात हवामान बदलामुळे आपण हतबल होत चाललो आहोत . समुद्रातील पाण्याची आम्लता वाढू लागल्याने सागरातील जीवसृष्टी नाहीशी होऊ शकते. नवनवीन रोगांचे संक्रमण होत असून त्यावर उपाय सापडत नाही अशी आपली आजची स्थिती आहे.
पर्यावरणात केलेल्या बदलाचे परिणाम आता मानवास दिसू लागल्याने जगभर पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी माणूस खडबडून जागा झाला आहे .आज जगात पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत पण त्यास उशीर झाला आहे हे नक्की
0
Answer link
पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. यात हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होतो.
पर्यावरणाचे दोन मुख्य भाग आहेत:
- नैसर्गिक पर्यावरण: निसर्गात आढळणाऱ्या गोष्टी, जसे की हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी.
- मानवनिर्मित पर्यावरण: माणसाने तयार केलेल्या गोष्टी, जसे की शहरे, गावे, रस्ते, इमारती आणि शेती.
पर्यावरणाचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. ते आपल्याला अन्न, पाणी आणि हवा देते. पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे जेणेकरून ते आपल्या भावी पिढ्यांसाठी सुरक्षित राहील.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता: विकिपीडिया