3 उत्तरे
3
answers
वाणिज्य म्हणजे काय?
1
Answer link
वाणिज्य (इंग्लिश: Commerce, कॉमर्स ;) ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो. वाणिज्य भांडवलवादी व अन्य काही अर्थशास्त्रीय व्यवस्थांचा मूलाधार आहे.
वाणिज्य व्यवसायाचा असा एक विभाग कि जो वस्तू व सेवांचे वितरण करतो त्याला वाणिज्य असे म्हणतात . तुलनेने भांडवली गुंतवणूक कमी प्रमाणात लागते. वितरणाचे काम बाजारपेठेमध्ये तसेच कार्यालयात केले जाते. वस्तूंचे वितरण करण्यासाठी मनुष्यबळाची व संदेशवहनाची गरज भासते.वानिज्यामुळे वास्तूमध्ये स्थळ काळ व समय उपयोगिता निर्माण होते.वाणिज्य वस्तू व व्यापारी अभिकर्ते करतात. वाणिज्य हा व्यवसायाचा एक भाग असल्यामुळे त्यामध्ये व्यापारी कौशल्य असणे गरजेचे आहे.
0
Answer link
वाणिज्य (Commerce): वाणिज्य म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी-विक्री किंवा देवाणघेवाण करणे होय.
व्याख्या:
- अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन (American Marketing Association) नुसार, "वाणिज्य म्हणजे वस्तू व सेवांचे उत्पादन ते उपभोग दरम्यानचे वितरण."
- प्रोफेसर जेम्स स्टीफन्सन (Prof. James Stephenson) यांच्या मते, "वाणिज्य म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे विनिमय."
वाणिज्य मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- खरेदी (Purchasing)
- विक्री (Selling)
- वस्तु-उत्पादन (Manufacturing)
- वितरण (Distribution)
- बँकिंग (Banking)
- विमा (Insurance)
- वाहतूक (Transport)
- साठवण (Warehousing)