2 उत्तरे
2 answers

खूप धावल्यावर घाम का येतो?

2
खूप खेळल्याने, धावल्याने व्यायाम होतो. शरीरातील स्नायुंचे मोठ्या प्रमाणावर आकुंचन-प्रसरण होते. स्नायुंचे कार्य वाढते. साहजिकच या भौतिक श्रमांमुळे उष्णता निर्माण होते. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान ठरावीक पातळीवर स्थिर राहण्यासाठी शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याची आवश्यकता असते. व्यायामामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या परिणामाने त्वचेखालचा रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे त्वचेचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा जास्त होते व काही उष्णता वातावरणात सोडली जाते; परंतु उष्णतेतील या मार्गाने होणारी घट अल्प प्रमाणातच असते. व्यायामानंतर निर्माण होणारी उष्णता शरीराबाहेर टाकण्याचा महत्त्वाचा मार्ग घाम हाच होय. खूप व्यायाम केल्यानंतर घाम येण्याचे प्रमाण वाढते व त्याबरोबरच घामाचे बाष्पीभवन होण्याचेही प्रमाण वाढते. शरीरातील वाढलेली उष्णता व मेंदूतील प्रेरणा या दोहोंमुळे व्यायामानंतर आपल्याला खूप घाम येतो. विश्रांती घेतल्यावर हळूहळू घाम येण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारे घाम आल्याने शरीरात निर्माण झालेली उष्णता शरीराबाहेर टाकली जाते व शरीराचे तापमान सामान्य पातळीत राहते. त्यामुळेच खूप व्यायाम केल्यावर घाम येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम आणखीनच येतो व हिवाळ्यात तेवढाच व्यायाम करून घाम कमी येतो, याचा अनुभव तुम्ही घेतला असेल.
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

खूप धावल्यावर घाम येण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. शरीराचे तापमान वाढणे: धावताना आपल्या शरीराची ऊर्जा वापरली जाते, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते.
  2. शरीराला थंड ठेवण्याची प्रक्रिया: जास्त तापमानामुळे शरीराला थंड ठेवण्याची आवश्यकता असते. घाम येणे ही नैसर्गिकरित्या शरीराला थंड ठेवण्याची प्रक्रिया आहे.
  3. त्वचेवरील ग्रंथी सक्रिय होणे: जेव्हा शरीराचे तापमान वाढते, तेव्हा त्वचेवरील स्वेद ग्रंथी (sweat glands) सक्रिय होतात आणि घाम तयार करतात.
  4. घाम evaporates होणे: घाम त्वचेवर evaporates होतो, तेव्हा ते शरीरातील उष्णता शोषून घेते आणि त्यामुळे शरीर थंड होते.

याव्यतिरिक्त, धावताना येणारा घाम आपल्याला थकवा आणि जास्त उष्णता (heat stroke) येण्यापासून वाचवतो.

अधिक माहितीसाठी आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

शरीरात योग्य नियंत्रण?
तोंडाला पाणी का सुटते?
शरीराचे तापमान नियंत्रित करणारे घटक कोणते?
गारवा कशामुळे थरथरतो?
नाडीचे ठोके का पडतात?
तहान का लागते?
रक्त गोठण्याची प्रक्रिया कशी होते?