डोळ्यांचे आरोग्य आरोग्य

काही लोक वारंवार डोळा का मिचकवतात?

2 उत्तरे
2 answers

काही लोक वारंवार डोळा का मिचकवतात?

2

डोळा मिचकावणे, खांदा उडवणे, खाकरणे, नाकपुड्या फुगवणे इत्यादी सवयी लोकांना असतात. या गोष्टी ते मुद्दाम करत नाहीत, हे आपल्याला जाणवते; पण या गोष्टी केल्याशिवाय त्यांना राहवत नाही. लोक असे का करतात, हे कोडे तुम्हाला कधी ना कधी पडलेच असेल.

तुम्हाला एखादे वेळी आश्चर्य वाटेल, पण स्नायुंच्या या अनैच्छिक हालचाली म्हणजे फारशा गंभीर नसलेल्या मानसिक आजारांचीच लक्षणे होत. सदोष व्यक्तिमत्त्वात अशा सवयी आढळून येतात. क्वचित प्रसंगी या हालचाली शरीरभर झटक्यांच्या स्वरूपात दिसतात. कधीकधी अशा हालचालींच्या वेळी व्यक्ती विशिष्ट असा आवाज काढतात, शिव्या देतात वा काहीतरी बरळतात. या भावनिक ताणतणावाच्या काळात अशा हालचाली ती व्यक्ती वारंवार करताना आढळते. झोपेत मात्र या हालचाली आपोआप बंद होतात.

अशा हालचाली हा गंभीर आजार असला, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. सौम्य स्वरूपात मात्र या हालचाली काही वर्षांत बंद होतात. मानसोपचारांचाही यात चांगला उपयोग होऊ शकतो. सवयीने असे होण्याखेरीज अनेक रोगांमध्येही शरीराच्या विशिष्ट स्नायुंच्या हालचाली होतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरते.
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

काही लोक वारंवार डोळा मिचकवण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

  • कोरडे डोळे: डोळे कोरडे झाल्यास डोळ्यांना खाज येते आणि ते मिचकावण्याची गरज भासते.
  • तणाव: तणावामुळे चेहऱ्याच्या स्नायूंवर दाब येतो आणि डोळे मिचकावले जाऊ शकतात.
  • कॅफीन आणि अल्कोहोल: जास्त प्रमाणात कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने डोळे मिचकावण्याची समस्या वाढू शकते.
  • डोळ्यांची ऍलर्जी: ऍलर्जीमुळे डोळ्यांना खाज येते आणि ते मिचकावले जातात.
  • आ Habit Tic: काहीवेळा डोळे मिचकावणे ही एक सवय (Habit Tic) बनून जाते.
  • neurological conditions: क्वचित प्रसंगी, डोळे मिचकावणे हे एखाद्या neurological conditions चे लक्षण असू शकते.

जर तुम्हाला वारंवार डोळे मिचकावण्याचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे. ते तुम्हाला योग्य निदान आणि उपचार देऊ शकतील.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1020

Related Questions

ग्लूकोमाच्या प्रभावी चिकित्सेमध्ये कोणते उपचार येतात?
डोळे तिरळेपणा कसा?
नको हे फक्त मला जास्त बोलू सांगा लगेच डोळे दुखतात?
डोळे अश्रूंनी न्हाणे?
एका डोळ्यात किती वेळा मोतीबिंदू बसवता येतो?
डोळ्यावर पडदा आला असेल तर तो जाण्यासाठी काही उपाय आहे का?
एका डोळ्यात तिरकसपणा आहे आणि दृष्टी कमी आहे?