2 उत्तरे
2
answers
लिथोट्रिप्सी म्हणजे काय?
2
Answer link
मूतखडा होण्याची अनेक कारणे आहेत. मूत्रमार्गामध्ये काही विकृती असल्यास, चयापचयाच्या मूलभूत प्रक्रियांमध्ये दोष असल्यास किंवा मूतखडा होण्याची अनुवंशिक प्रवृत्ती असल्यास मूतखडे होतात. काही मूतखडे हे मूत्रपिंडातच राहतात, मूत्रमार्गात येत नाहीत. त्यांच्यामुळे फारशी लक्षणे दिसत नाहीत, पण कालांतराने मूत्रपिंड कायमचे खराब होते. मूत्रमार्गात खाली घसरताना मूतखड्यांमुळे अनेक लक्षणे निर्माण होतात. यात लघवीतून रक्त पडणे, पोटात तीव्र वेदना होणे, लघवी करताना खूप दुखणे या लक्षणांचा समावेश होतो. क्ष-किरण तपासणी करून मूतखड्याचे निदान करता येते. इंट्राव्हेनस पायलोग्राफीसारख्या तपासणीने मूतखड्याचे खात्रीशीर निदान करता येते. मूतखडा काढून टाकणे हाच या रोगावरील उपाय असतो. शस्त्रक्रिया करून हे खडे काढता येतात. बरेचसे लहान आकाराचे मूतखडे भरपूर पाणी पित राहिल्यास आपोआपच लघवीवाटे पडून जातात.
लिथोट्रिप्सी ही देखील मूतखड्यांच्या उपचाराचीच एक पद्धत होय. या पद्धतीत शस्त्रक्रिया करत नसल्याने ती एक सुरक्षित पद्धत आहे. यात लेसर किरणांच्या आधारे मूतखडे आतल्या आत फोडले जातात. फुटलेले मूतखडे नंतर लघवीवाटे शरीराबाहेर पडतात. शस्त्रक्रियेचे धोके नसल्याने ही पद्धत दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. या पद्धतीतील तोटे म्हणजे फार मोठ्या मूतखड्यांसाठी ती फारशी उपयुक्त ठरत नाही. मूत्रमार्गाच्या रचनेत विकृती असल्याने मूतखडे होत असतील, तर वारंवार लिथोट्रिप्सीची पद्धत वापरावी लागेल. कारण शस्त्रक्रियेने मूळ बिघाड दुरूस्त केल्याखेरीज मूतखडे पुन्हा पुन्हा होण्याचे थांबणार नाही. अशा वेळी लिथोट्रिप्सीपेक्षा शस्त्रक्रिया जास्त योग्य ठरते. दुसरे म्हणजे लिथोट्रिप्सीने मूतखडा काढण्यास खर्च बराच जास्त येतो. मूतखड्याच्या आकारावर हा खर्च अवलंबून असतो. तरीही लिथोट्रिप्सी हे मूतखड्याच्या रुग्णांसाठी वरदानच मानावे लागेल. कारण त्यामुळे वेदना न होता, जोखिमरहित आणि जखमरहित पद्धतीने मूतखड्यावर उपचार करता येतो.
0
Answer link
उत्तर:
लिथोट्रिप्सी (Lithotripsy) ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी मूत्रपिंडातील (kidney), पित्ताशयातील (gallbladder) किंवा मूत्रमार्गातील (ureter) खडे काढण्यासाठी वापरली जाते.
या प्रक्रियेत, शॉक वेव्हज (shock waves) वापरून खड्यांना लहान तुकड्यांमध्ये रूपांतरित केले जाते, ज्यामुळे ते नैसर्गिकरित्या शरीरातून बाहेर पडू शकतात.
लिथोट्रिप्सीचे प्रकार:
- एक्स्ट्राकोर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी (Extracorporeal Shock Wave Lithotripsy - ESWL): यात शरीराबाहेरून शॉक वेव्हज पाठवले जातात.
- पर्क्युटेनियस नेफ्रोलिथोटॉमी (Percutaneous Nephrolithotomy): यात लहान छिद्र पाडून दुर्बिणीच्या साहाय्याने खडे काढले जातात.
- युरेटरोस्कोपी (Ureteroscopy): यात मूत्रमार्गातून दुर्बिण टाकून खडे काढले जातात.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त स्रोत: