व्यक्तिमत्व गाव ऐतिहासिक स्थळे इतिहास

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी कुठे आहे?

2 उत्तरे
2 answers

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी कुठे आहे?

5
सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी स्थळ - तळबीड , ता. कराड , जि. सातारा
NH4 वरून उंब्रज कडून कराड कडे जाताना उंब्रज पासून ६ कि .मी . अंतरावर तळबीड फाटा लागतो तेथून ३ कि . मी . तळबीड गाव आहे.

हम्बीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली.

हम्बीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी साम्भाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील सम्भाजी व धारोजी मोहिते यांचा सम्बन्ध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. सम्भाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळते.

स्वराज्याच्या स्थापनेवेळी सम्भाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजाशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे सम्भाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजीचे अगदी जवळचे घराणे झाले.

यातील सम्भाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हम्बीरराव मोहिते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हम्बिरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हम्बीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.

महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हम्बीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हम्बीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या.

ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हम्बीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यन्त पिटाळून लावण्यात हम्बीररावांचे मोठे योगदान आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हम्बीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकड पर्यन्तच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानन्तर (सन १६७६) सरसेनापती हम्बीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हम्बीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. (अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मन्दिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत. त्या तलवारीवर ' कान्होजी मोहिते हम्बीरराव' अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हम्बीरराव मोहित्यांची नसून हम्बीरराव 'किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक वीराची आहे. परन्तु जनमानसात असा समज आहे की ती तलवार 'सरसेनापती हम्बीरराव मोहिते' यांची आहे.)

हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हम्बीरराव मोहिते हे छत्रपतीना गोवळकोण्ड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानन्तर महाराजांना आपले बन्धू व्यंकोजीराजें बरोबर सामोपचाराने चांगले सम्बन्ध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजीची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हम्बीरराव मात्र नन्तर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानन्तर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीराजांचे निधन झाले. यावेळी हम्बीरराव कऱ्हाड परिसरात छावणी टाकून होते.

मोहिते घराण्याच्या इतिहासाला ज्ञात असलेला पुरुष म्हणजे रतोजी मोहिते .

शम्भूराजेंच्या पाठीशी खम्बीर मामा हम्बीर
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनन्तर सम्भाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच सम्भाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हम्बीररावांनाही मिळाले होते. हम्बीररावांनी सम्भाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.

सम्भाजी राजेंच्या राज्याभिषेकानन्तर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हम्बीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचण्ड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानन्तर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हम्बीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हम्बीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हम्बीरराव जखमी झाले होते. यानन्तर पुढे सम्भाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हम्बीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्‍न केला. त्यानन्तर कल्याणजवळ रहुल्लाखान व बहाद्दुरखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हम्बीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानन्तरच्या कालखण्डात खुद्द सम्भाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हम्बीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हम्बीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ केंजळगडच्या पायथ्याशी झाली. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परन्तु किल्लेदार पिलाजी गोळे अन इतर मावळ्यांना (तंबूत नियोजन सुरू असताना) त्यांच्यावर जाणारा तोच तोफेचा गोळा स्वतःच्या अंगावर झेलून ,लागून ते धारातीर्थी पडले.

या हम्बीरराव मोहिते यांची समाधी कऱ्हाड तालुक्यातील तळबीड (जिल्हा सातारा) येथे आहे.
उत्तर लिहिले · 9/11/2020
कर्म · 20065
0

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या वाडेगाव येथे आहे.

हंबीरराव मोहिते हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2960

Related Questions

माझगाव विषयी माहिती लिहा. तुम्हाला माहीत असलेल्या गुरु-शिष्यांच्या जोड्या लिहा.
संभाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे?
शिवाजी महाराजांचे किल्ले किती होते?
खेळणा किल्ल्याला शिवरायांनी काय नाव दिलेले आहे?
लोहारा नगर तहसील प्राचीन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे का?
संभाजी राजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले?