2 उत्तरे
2 answers

अनुदान म्हणजे काय?

3
अनुदान हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकास माल किंवा सेवा देण्यासाठीची सोय असते. अनुदान सामन्यतः अनुदान हे सरकारतर्फे दिले जाते परंतु उत्पादक स्वतः किंवा तिऱ्हाइत संस्थाही अशी मदत पुरवू शकतात.

उदा....

१) खतांच्या किमती कमी होऊन सामान्य शेतकर्यांना खते परवडावी.

२) सरकारच्या प्राधान्यक्रमावर असणारे उपक्रम लोकप्रिय व्हावेत म्हणून. उदा. शौचालय बांधणी, शेतातील तळ्यांची बांधणी, वृक्षारोपण इत्यादी.

३) विशिष्ट उत्पादनाची किंमत फार वाढून त्याची मागणी घटू नये या साठी अनुदान देऊन किंमत कमी ठेवली जाते. उदा. विविध रोगांवरील लस

४) बॅंकाची कर्जे स्वस्तात उपलब्ध व्हावी म्हणून. उदा. अल्पभूधारक शेतकरी, निर्यातक्षम उद्योग, ठिबक सिंचन योजनेसाठी असणारी कर्जे इत्यादी.

५) आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनाची किंमत कमी होऊन माल खपावा यासाठी सरकार अनुदान देऊ शकते.
उत्तर लिहिले · 15/10/2020
कर्म · 55350
0
अनुदान म्हणजे शासनाकडून किंवा इतर संस्थेकडून एखाद्या विशिष्ट कामासाठी, योजनेसाठी किंवा संस्थेला दिलेली आर्थिक मदत. हे पैसे परतफेड करण्याची गरज नसते.
अनुदानाचे प्रकार:
  • सामान्य अनुदान: हे अनुदान कोणत्याही विशिष्ट कामासाठी न देता संस्थेच्या सामान्य खर्चासाठी दिले जाते.
  • विशिष्ट अनुदान: हे अनुदान विशिष्ट काम किंवा योजनेसाठी दिले जाते.
  • शर्ती अनुदान: हे अनुदान काही विशिष्ट शर्तींच्या पूर्ततेनंतरच दिले जाते.
अनुदानाचे फायदे:
  • गरजू लोकांना आणि संस्थांना मदत होते.
  • विशिष्ट क्षेत्रांचा विकास होतो.
  • सामाजिक आणि आर्थिक समानता वाढते.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1780

Related Questions

माझं घरकुल मध्ये नाव आलेलं आहे, तरी माझ्या वडिलांच्या नावे जागेचा आठ अ असून त्यावर मी माझे घरकुल बांधकाम करू शकतो का?
आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना स्पष्ट करा?
बंद असलेले रेशन सुरु करायचे आहे तर काय करावे लागेल व अर्ज कसा करावा लागेल?
सानुग्रह अनुदानाचे स्वरूप स्पष्ट करा?
घरकुलसाठी जागा उपलब्ध नसल्यास लाभधारकांनी काय करावे?
पाटबंधारे विभागामध्ये ऑनलाईन विनंती अर्ज ग्रामपंचायतीला करता येतो का?
कृषी विभागाचा ईमेल ॲड्रेस काय आहे?