2 उत्तरे
2
answers
हक्कसोड पत्र करण्यासाठी काय प्रोसेस असते?
5
Answer link
हक्कसोडपत्र म्हणजे काय ?
हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने त्याचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिस्स्याचा वैयक्तिक हक्क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याच्या स्वेच्छेने आणि कायमस्वरुपी सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्तेवज होय.
हक्कसोडपत्र कोणाला करता येते ?
एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य हक्कसोडपत्र करु शकतो. एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार फक्त वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या हिस्स्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र, त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात करु शकतो.
हक्कसोडपत्र कोणत्या मिळकतीचे करता येते ?
फक्त वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या हिस्स्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र करता येते.
हक्कसोडपत्राचा मोबदला ?
सर्वसाधारणपणे हक्कसोडपत्र विनामोबदला केले जाते परंतू हक्कसोडपत्र हे मोबदल्यासह असू शकते. मोबदल्यासह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जात नाही तथापि हक्कसोडपत्र नोंदणीकृत असते त्यामुळे ते नोंदणी शुल्कास पात्र असते.
हक्कसोडपत्र कसे करावे ?
एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारा आणि तो हक्क ग्रहण करणारा यांना स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे, त्याच एकत्र कुटुंबातील कोणाही एकाच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्राचा दस्त करता येतो. असा दस्त रक्कम रु. २००/- च्या (अद्ययावत तरतुद पहावी) मुद्रांकपत्रावर (स्टँप पेपरवर) लेखी असावा. याकामी जाणकार विधिज्ञाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.
हक्कसोडपत्राच्या दस्तात खालील गोष्टी नमूद असाव्यात.
* हक्कसोडपत्राचा दस्त लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
* हक्कसोडपत्राचा दस्त लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
* एकत्र कुटुंबाच्या सर्व शाखांची वंशावळ .
* एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण.
* दोन निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वाक्षरी.
दस्ताचे निष्पादन व नोंदणी.
हक्कसोडपत्र, स्वत:च्या हिस्स्याच्या सर्व किंवा काही मिळकतींबाबत करता येते. हक्कसोडपत्र स्वत:च्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात करीत आहे आणि स्वत:च्या हिस्स्याच्या कोणत्या मिळकतींबाबत हक्कसोडपत्र केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोडपत्रात असावा. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण येणार नाही.
हक्कसोडपत्राची मुदत
हक्कसोडपत्र कधीही करता येते, त्यास मुदतीचे बंधन नाही. हक्कसोडपत्रासाठी ७/१२ अथवा मिळकत पत्रीकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्याची आवश्यकता नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिध्द करण्याइतपत पुरावा असावा. हक्कसोडपत्राविषयी असलेल्या बर्याच प्रश्नाची उत्तर आपल्याला या लेखातून मिळाली असतील.

0
Answer link
हक्कसोड पत्र (Release Deed) करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
पत्राचा मसुदा बनवण्यासाठी, तुम्हाला एक वकील शोधावा लागेल जो या कामात मदत करू शकेल.
दस्तऐवजात मालमत्तेचा तपशील, ज्या व्यक्ती हक्क सोडत आहेत त्यांची नावे आणि ज्यांच्या बाजूने हक्क सोडला जात आहे त्यांची नावे नमूद करावी लागतात.
हक्कसोड पत्रावर मुद्रांक शुल्क (Stamp duty) भरावे लागते. हे शुल्क मालमत्तेच्या मूल्यावर किंवा बाजारातील किमतीवर आधारित असते.
प्रत्येक राज्यानुसार मुद्रांक शुल्क वेगवेगळे असते.
मुद्रांक शुल्क भरल्यानंतर, हक्कसोड पत्राची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत कार्यालयात (Sub-Registrar Office) जाऊन हे पत्र नोंदणीकृत करावे लागते.
नोंदणीच्या वेळी, साक्षीदारांची (witnesses) आवश्यकता असते.
आधार कार्ड
पॅन कार्ड
मालमत्तेचे कागदपत्रे
मुद्रांक शुल्क भरल्याची पावती
साक्षीदारांचे ओळखपत्र
यामुळे मालमत्तेवरील अधिकार दुसऱ्या व्यक्तीकडे कायदेशीररित्या हस्तांतरित होतात.
कुटुंबातील सदस्यांमध्ये मालमत्तेवरून होणारे वाद टाळता येतात.
1. हक्कसोड पत्राचा मसुदा तयार करणे:
2. मुद्रांक शुल्क भरणे:
3. नोंदणी:
आवश्यक कागदपत्रे:
हक्कसोड पत्राचे फायदे:
अधिक माहितीसाठी, तुम्ही कायदेशीर सल्लागार किंवा वकिलाची मदत घेऊ शकता.