2 उत्तरे
2
answers
कानांमधून पाणी येतो यावर काही उपाय?
1
Answer link
कानातून पू येणे किंवा कानातून पाणी येणे हा एक सामान्यपणे होणारा कानाचा आजार आहे. सामान्य आजार असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण वेळीच उपचार न झाल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. बहिरेपणा ही येऊ शकतो.
कानातून पाणी, रक्तस्त्राव किंवा पू यासारखे स्त्राव येत असल्यास, कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीचं उपचार न केल्यास वाहते कान अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देते.
कान वाहणे याकडे दुर्लक्ष केल्यास ऐकू येण्यास बाधा निर्माण होते. उपचार न केल्यास कान बंद होतो, बहिरेपणा येतो.
कानाभोवतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू. मेंदूत हे कानातील इन्फेक्शन पसरल्यास मेंदूला सूज येणे, चक्कर येणे, मेंदूज्वर अशा गंभीर विकार उद्भवतात.
त्यामुळे कानातून काही स्त्राव येत असल्यास त्यावर लागलीच उपचार करणेच योग्य ठरते.
औषधाने कानातील संसर्ग नियंत्रणात आणता येतो.
जर औषधोपचाराने कान वाहणे थांबले नाही तर ऑपरेशन करावे लागते. पडद्याचे छिद्र दुरुस्त करण्यासाठी कानाच्या पडद्याचे प्रत्यारोपण (टिम्पॅनोप्लास्टी) केली जाते. या ऑपरेशनमध्ये कानामध्ये त्वचेचा कृत्रिम पडदा तयार करून बसविला जातो.
कान वाहणाऱ्या अवस्थेत काही वेळा मायरिंगोटॉमी केली जाते. यात पडद्यातून द्रव बाहेर काढला जातो. तसेच व्हेंटिलेशन ट्यूब टाकण्यात येते.
• सर्दी, खोकला होणे, टॉन्सिल्स, अॅडिनॉइड्सच्या तक्रारी टाळण्यासाठी थंडगार पदार्थ खाणे टाळा, थंडगार एसीत बसू नका.
• आंघोळ करताना पाणी कानात जाणार नाही याची काळजी घ्या. यासाठी छोट्याशा पॉलिथिन पिशवीने कान झाकावा.
• आंघोळीनंतर कान कोरड्या फडक्याने पुसा.
• कानात काडी, पेन्सिल यासारख्या वस्तू घालणे टाळा.
• वारंवार कान खाजवणे ही टाळा.
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात कोणतेही औषध घालू नका. विनाकारण घरगुती उपाय करीत बसू नये.
• कानातून पाणी, पू यासारखे स्त्राव येत असल्यास, कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

0
Answer link
कानांमधून पाणी येणे (Ear discharge) ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यावर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- कान कोरडा ठेवा: कानात पाणी गेल्यास ते त्वरित सुती कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हळूवारपणे पुसून घ्या.
- हेअर ड्रायरचा वापर: कमी उष्णतेवर हेअर ड्रायर कानाजवळ धरा आणि हलक्या हाताने हवा आत सोडा. यामुळे जमा झालेले पाणी सुकायला मदत होईल.
- इअर बड्स टाळा: इअर बड्स वापरल्याने कानातील नैसर्गिक तेलकटपणा कमी होतो आणि संक्रमण होण्याची शक्यता वाढते.
- डॉक्टरांचा सल्ला: जर पाणी येणे थांबत नसेल किंवा त्यासोबत वेदना, सूज किंवा ऐकण्यात अडचण येत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घरगुती उपाय:
- लसूण तेल: लसणाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते तेल गरम करून कानात २-३ थेंब टाका.
- टी ट्री ऑईल: टी ट्री ऑईलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते नारळ तेलात मिसळून कानात टाका.
हे लक्षात ठेवा: कोणतेही तेल वापरण्यापूर्वी ते तुमच्या त्वचेला मानवते का, याची खात्री करा.
जर तुम्हाला आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Disclaimer: या उपायांमुळे तात्पुरता आराम मिळू शकतो, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.