समाजशास्त्र हिंदु धर्म जात व कुळे समाज सेवा समाज जात

वंजारी समाज एनटीडी (ओबीसी) मध्ये येतो का?

2 उत्तरे
2 answers

वंजारी समाज एनटीडी (ओबीसी) मध्ये येतो का?

5
वंजारी ही महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-(ड) (NT-D म्हणजेच NT-3) मधे वर्गीकृत आहे. यवन आक्रमकांच्या त्रासाला कंटाळून इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेल्या विविध ३० (तीस) क्षत्रिय जाती-जामाती पैकी ही एक जात होय. हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यांत कमी जास्त लोकसंख्येत आढळतो. महाराष्ट्र राज्या बाहेरील वंजारी समाजाला तेथिल भाषेतील विविधते मुळे वंजारा, वंजरी संबोधले जाते. स्व. गणपत पांडुरंग संखे यांच्या महाराष्ट्र सरकार विरुद्ध मुंबई उच्च न्यायालया मधील प्रदीर्घ लढ्यामुळे  वंजारी समाज OBC मधून NT-3 मधे वर्गीकृत केला गेला.
उत्तर लिहिले · 12/10/2020
कर्म · 6750
0

वंजारी समाज हा महाराष्ट्र शासनाच्या एनटीडी (Nomadic Tribes D) म्हणजेच भटक्या जमाती 'ड' मध्ये येतो. या प्रवर्गाला इतर मागासवर्गीय (OBC) म्हणून देखील गणले जाते.

अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5220

Related Questions

माझ्या आजोबांच्या 1918शाळेच्या दाखल्यावर माझी खारवी जात नमूद आहे पण माझ्या हिंदू धर्माचा उल्लेख नाही. माझ्या वडिलांचा दाखला नाही. पण माझ्या स्वतः च्या दाखल्यावर हिंदू- खारवी असा उल्लेख आहे. तर माझ्या व मुलांच्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणी साठी आजोबांचा दाखला चालेल का?
मी खूप प्रयत्न करतो, पण माझं खूप वीर्य वाया जातं, जास्त करून झोपेमध्ये. त्याला काय पर्याय करू?
कुणबी सर्टिफिकेट कसे काढावे?
अनुसूचित जाती म्हणजे नेमके कोणत्या जाती?
जाधवांचे सोयरे पाहुणे कोणती आडनावे आहेत?
सोलापूरमध्ये उकेडे जाधव नावाचे मराठा लोक राहतात का?
उकेडे जाधव आडनाव असलेले मराठा आहेत का?