शिक्षण शिक्षणशास्त्र

आपण शिक्षण का घ्यावे?

3 उत्तरे
3 answers

आपण शिक्षण का घ्यावे?

7
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण किंवा पुस्तकी ज्ञान मिळवण्यासाठी केला जाणारा खटाटोप ही संकल्पना आपण दूर केली पाहिजे. शिक्षण म्हणजे ही एक कायमस्वरूपी चालत राहणारी गोष्ट आहे.
शिक्षण म्हणजे अपल्यासमोरील समस्या सोडवण्यासाठी आपल्याजवळ असणारी शिदोरी. ज्या प्रकारे माणसाच्या समस्या मरेपर्यंत संपत नाहीत, त्याप्रमाणे शिक्षण देखील मरेपर्यंत संपत नाही.
उदाहरण घ्यायचे झाले तर, शाळेत असताना तुम्हाला मूलभूत सर्व गोष्टी शिकाव्या लागतात, म्हणजे मोठे झाल्यावर तुम्हाला त्या कामी येतात. लिहायला वाचायला शिकल्याने तुम्ही प्रवासात तिकिटं काढून योग्य गाडीची पाटी वाचून तीत प्रवास करू शकता. ही गोष्ट जरी साधारण वाटत असली, तरी एखाद्या अडाणी माणसाला विचारून पहा, तुम्हाला त्याचे महत्व कळेल.

आणखी एक उदाहरण घ्यायचे झाले तर, बदलते तंत्रज्ञान. बरेच उच्चशिक्षित लोक संगणकाचे शिक्षण नसल्या कारणाने त्यांची नोकरीत बढती रखडली जाऊ शकते. म्हणजे तुमच्याकडे पदवी असून उपयोग नाही, बदलत्या काळात नवीन गोष्टीचे ज्ञान आत्मसात करायला तंत्रज्ञानाचे शिक्षण त्यांना घ्यावेच लागणार.

असे हजारो उदाहरणे देता येतील. म्हणून आपल्याला शिक्षण घ्यावे लागते आणि ते आयुष्यभर सतत चालूच राहते.
उत्तर लिहिले · 21/9/2020
कर्म · 283280
2
शिक्षणाने विचार प्रगल्भ होतात आणि त्या विचारातून नवनिर्मिती घडत असते. आणि स्वतः मध्ये बदल करून घ्यायचा असेल, तर शिक्षण फार महत्वाचे आहे.

विद्येविना गती गेली,

   गती विना मती गेली,

   मती विना शूद्र खचले,

   इतके अनर्थ एका अविद्येने केले.”


                                          🙏🙏
उत्तर लिहिले · 22/9/2020
कर्म · 255
0

शिक्षण घेणे महत्वाचे आहे कारण:

  • ज्ञान आणि कौशल्ये: शिक्षणामुळे आपल्याला ज्ञान आणि कौशल्ये मिळतात, ज्यामुळे आपण चांगले जीवन जगू शकतो.
  • चांगल्या संधी: शिक्षणामुळे नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात आणि चांगले उत्पन्न मिळू शकते.
  • आत्मविश्वास: शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आपण अधिक सक्षम बनतो.
  • सामाजिक विकास: शिक्षणामुळे आपण समाजात चांगले नागरिक बनतो आणि समाजाच्या विकासात मदत करतो.
  • आर्थिक विकास: शिक्षणामुळे देशाच्या आर्थिक विकासात मदत होते.

थोडक्यात, शिक्षणामुळे आपले जीवन सुधारते आणि आपण एक चांगले भविष्य निर्माण करू शकतो.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

औपचारिक शिक्षण म्हणजे काय?
मुक्त शाळा शिक्षणशास्त्र काय आहे?
शिक्षणातील गुणात्मक आणि संख्यात्मक पैलू काय आहेत?
माझ्या परिवार आणि आपले पर्यावरण या विषयात इयत्ता पाचवीसाठी घटक नियोजन तयार करा?
शिक्षण ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे का?
आकलनातील तर्कपातळी या घटकाची संकल्पना स्पष्ट करा. ग्रंथालयाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. अभ्यास प्रक्रियेशी निगडीत घटक स्पष्ट करा. व्हर्च्युअल क्लासरूमचे स्वरूप सविस्तर लिहा. भाषेची सर्जनशीलता म्हणजे काय ते स्पष्ट करा?
आदर्श वादानुसार शिक्षणाचे ध्येय काय आहे?