कायदा व्यसन गाव दारू मद्य निषेध

गावात दारू बंद करायची आहे तर काय करावे?

2 उत्तरे
2 answers

गावात दारू बंद करायची आहे तर काय करावे?

5
या पोस्ट मधून तुम्हाला असे कळेल की आपण काय केले पाहिजे



परवाना असलेले दारूचे दुकान बंद करण्यासाठी कायदा आहे. मतदान घेऊन ते बंद करता येते. पण अवैध दुकान बंद कसे करायचे ? पन्हाळा तालुक्यातील देवाळे गावातील महिलांपुढे हा प्रश्न असून गेली बारा वर्षे त्यांना तो सतावत आहे. महिलांनी जिद्दीने लढा देऊन एक दारु दुकान बंद केले. परंतु पुरुषांनी दबाव आणून महिलांचे आंदोलन मोडीत काढले. त्यामुळे एक दुकान सुरूच आहे. आता तर दबाव एवढा वाढला आहे, की महिला त्याविरोधात बोलण्यासही तयार नाहीत.
कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर देवाळे हे अडीच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातून दारू हद्दपार व्हावी अशी इच्छा इथल्या महिलांनी बाळगली. गावात दोन अवैध दारु अड्डे आहेत. ते बंद झाल्यास गावात बाटली आडवी होईल, अशी आस बाळगून इथल्या महिला होत्या. त्यासाठी गावातील महिलांनी एकत्र येऊन दारु दुकान बंद करण्यासाठी हाक दिली. गावातल्या इतर महिलांनी त्यांना साथ दिली.
२००२ साली खऱ्या अर्थाने हा लढा उभा राहू लागला. झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाची स्थापना झाली. या माध्यमातून ३०० महिला एकत्र आल्या. त्यांनी पोलिसांकडे गावातील अवैध दारु दुकान बंद करण्याची मागणी केली. गावात रास्ता रोको आंदोलन केले. मात्र कुणीच लक्ष दिले नाही. अनेक प्रयत्नांतून गावातील विनापरवाना चालत असलेल्या दोन दारू दुकानापैकी एक दुकान बंद झाले. मात्र एक सुरू होते. तेही बंद करण्याचा प्रयत्न केला पण, पुरुषांनी महिलांवर दबाव आणला.
पतीबरोबर संसार करायचा म्हणून कोणी महिला बोलण्यास तयार होत नसल्याचे मंडळाच्या उपाध्यक्ष सीमा पाटील यांनी सांगितले. पुरुषांच्या दबावामुळे महिलांचा लढा थांबला. आणि एक दारुदुकान सुरूच राहिले. हे दुकान बंद करुन गावाला व्यसनमुक्त करण्याचे स्वप्न महिला बाळगत आहेत.पुरुषांचा, पुढाऱ्यांचा दबाव एवढा आहे की, याबद्दल उघडपणे बोलायला महिला तयार नाहीत.

गावातील दोनपैकी एक दुकान बंद झाले मात्र एक अजूनही सुरू आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र पोलिसही याकडे दुर्लक्ष करत आहेत. आज पुरूषांच्या भीतीपोटी गावातील महिलांचा आवाज दबलेला आहे. या लढ्यामध्ये खूप त्रास सहन करूनही सरकारी यंत्रणेची कोणतीच मदत मिळाली नाही.
उत्तर लिहिले · 1/9/2020
कर्म · 14865
0

तुमच्या गावात दारू (alcohol) बंद करायची असल्यास, तुम्ही खालील उपाय करू शकता:

  1. ग्रामसभा (Gram Sabha):

    • प्रथम तुमच्या गावाची ग्रामसभा बोलवा.
    • ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मांडा.
    • ठराव बहुमताने मंजूर झाल्यास, तो शासकीय कार्यालयात सादर करा.

  2. महिला मंडळ आणि स्वयंसेवी संस्था (Mahila Mandal and NGO):

    • गावातील महिला मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृती करा.
    • दारूमुळे होणारे दुष्परिणाम लोकांना समजावून सांगा.

  3. पोलिसांना तक्रार (Police Complaint):

    • गावात अवैध दारू विक्री होत असल्यास, पोलिसांना तक्रार करा.
    • दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करा.

  4. राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department):

    • राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारूबंदीसाठी अर्ज करा.
    • विभागाच्या नियमांनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा.

  5. जनजागृती (Awareness):

    • गावात दारूबंदीच्या समर्थनार्थ रॅली (rally) काढा.
    • पथनाट्ये (street plays) आणि सभांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा.

Gram Sabha Information: अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वेबसाइटला भेट द्या: ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन

टीप: दारूबंदी करणे हे एक सामाजिक आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे सर्व नियम आणि कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1480

Related Questions

दारूबंदी कधी होईल?
मुंबईमध्ये दारूची दुकानं बंद करायची असल्यास, त्यासाठी कुठे तक्रार करायची?