Topic icon

मद्य निषेध

5
या पोस्ट मधून तुम्हाला असे कळेल की आपण काय केले पाहिजे



परवाना असलेले दारूचे दुकान बंद करण्यासाठी कायदा आहे. मतदान घेऊन ते बंद करता येते. पण अवैध दुकान बंद कसे करायचे ? पन्हाळा तालुक्यातील देवाळे गावातील महिलांपुढे हा प्रश्न असून गेली बारा वर्षे त्यांना तो सतावत आहे. महिलांनी जिद्दीने लढा देऊन एक दारु दुकान बंद केले. परंतु पुरुषांनी दबाव आणून महिलांचे आंदोलन मोडीत काढले. त्यामुळे एक दुकान सुरूच आहे. आता तर दबाव एवढा वाढला आहे, की महिला त्याविरोधात बोलण्यासही तयार नाहीत.
कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर देवाळे हे अडीच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातून दारू हद्दपार व्हावी अशी इच्छा इथल्या महिलांनी बाळगली. गावात दोन अवैध दारु अड्डे आहेत. ते बंद झाल्यास गावात बाटली आडवी होईल, अशी आस बाळगून इथल्या महिला होत्या. त्यासाठी गावातील महिलांनी एकत्र येऊन दारु दुकान बंद करण्यासाठी हाक दिली. गावातल्या इतर महिलांनी त्यांना साथ दिली.
२००२ साली खऱ्या अर्थाने हा लढा उभा राहू लागला. झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाची स्थापना झाली. या माध्यमातून ३०० महिला एकत्र आल्या. त्यांनी पोलिसांकडे गावातील अवैध दारु दुकान बंद करण्याची मागणी केली. गावात रास्ता रोको आंदोलन केले. मात्र कुणीच लक्ष दिले नाही. अनेक प्रयत्नांतून गावातील विनापरवाना चालत असलेल्या दोन दारू दुकानापैकी एक दुकान बंद झाले. मात्र एक सुरू होते. तेही बंद करण्याचा प्रयत्न केला पण, पुरुषांनी महिलांवर दबाव आणला.
पतीबरोबर संसार करायचा म्हणून कोणी महिला बोलण्यास तयार होत नसल्याचे मंडळाच्या उपाध्यक्ष सीमा पाटील यांनी सांगितले. पुरुषांच्या दबावामुळे महिलांचा लढा थांबला. आणि एक दारुदुकान सुरूच राहिले. हे दुकान बंद करुन गावाला व्यसनमुक्त करण्याचे स्वप्न महिला बाळगत आहेत.पुरुषांचा, पुढाऱ्यांचा दबाव एवढा आहे की, याबद्दल उघडपणे बोलायला महिला तयार नाहीत.

गावातील दोनपैकी एक दुकान बंद झाले मात्र एक अजूनही सुरू आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र पोलिसही याकडे दुर्लक्ष करत आहेत. आज पुरूषांच्या भीतीपोटी गावातील महिलांचा आवाज दबलेला आहे. या लढ्यामध्ये खूप त्रास सहन करूनही सरकारी यंत्रणेची कोणतीच मदत मिळाली नाही.
उत्तर लिहिले · 1/9/2020
कर्म · 14865
7
महाराष्ट्रापुरती विचार केला (कारण प्रश्न मराठीत आहे) तर अजून तरी तसा प्रस्ताव कुणी मांडला नाही, म्हणून तुम्हाला तारीख सांगू शकत नाही. परंतु ज्या राज्यात (गुजरात) मध्ये दारू बंदी आहे, तिकडे थोडासा जुगाड केला तर आरामात मिळते (स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय).
उत्तर लिहिले · 4/7/2017
कर्म · 0
0
मुंबईमध्ये दारूची दुकानं बंद करायची असल्यास, खालील ठिकाणी तक्रार करता येऊ शकते:
  • राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department): हा विभाग दारूच्या दुकानांवर नियंत्रण ठेवतो. त्यांच्याकडे तुम्ही लेखी तक्रार दाखल करू शकता.
  • पोलिस स्टेशन (Police Station): तुमच्या परिसरातील पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
  • न्यायालय (Court): तुम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करू शकता.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन:
    https://stateexcise.maharashtra.gov.in/
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2140