3 उत्तरे
3
answers
सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात?
3
Answer link
★ सजीवांचे वर्गीकरण :
सजीवांच्या वर्गीकरणाचा आधार
आपल्या सभोवती वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य प्रकार आहेत.
प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे जमिनीवर किंवा पाण्यात आणि हवेतसुद्धा आढळतात.
प्रारंभीक अवस्थेतील जीवन एका सरल जिवाणूपेशीच्या रूपात होते. या पेशीला पटलपरीबद्धीत केंद्रक नव्हते.ही पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी होय.
उत्क्रांतीच्या ओघात आदिकेंद्रकी पेशीपासून सुस्पष्ट पटल असलेल्या केंद्रकयुक्त पेशींची उत्पत्ती झाली. ही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली.
प्रत्येक सजीव रूप, जीवनपद्धती अशा लक्षणात दुसर्यापासून भिन्न असतो. स्वत:ची वेगळी ओळख जपतो. यालाच जैवविविधता म्हणतात.
सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यामुळे त्यांचेही पधतशीर गत पाडणे आवश्यक ठरते.
सजीवांमधील फरक ओळखून साधारणत: समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात.
वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समूहाना 'वर्गेकक' म्हणतात.
सर्वात उच्च स्थरिय वर्गेकक म्हणजे 'सृष्टी' होय.
वनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरिय वर्गेककास 'विभाग' म्हणतात.
प्राणांमध्ये सर्वात उच्चस्तरिय वर्गेककास 'संघ' म्हणतात.
जवळचे संबध दर्शविणार्या प्रजातींच्या समुहास 'कुल' म्हणतात.
एकमेकांशी संबंध दर्शविणार्या, जातीपेक्षा उच्च दर्जाचा वर्गेकक म्हणजे 'प्रजाती' होय.
अगदी जवळचे संबध दर्शविणारे जीव एकाच वर्गेकक मध्ये गटबद्ध करतात. अशा वर्गेककास 'जाती' असे म्हणतात.
जाती हे सर्वात लहान एकक आहे.
वर्गीकरण पदानुक्रम :
सृष्टी
विभाग / संघ
वर्ग
गण
कुल
प्रजाती
जाती
वर्गीकरणाच्या पद्धती :
1. पारंपरिक दृष्टिकोन -
व्दिसृष्टी/ व्दिनाम पद्धती -
अँरिस्टॉटालने प्राण्याचे वर्गीकरण जलचर, भूचर, खेचर व उभयचर या गटात केले.
त्याचा शिष्य थिओफ्रँस्टसने वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष झोडपे व शाक अशा गटात केले.
व्दिनाम पद्धतीचा जनक कार्ल व्हॉन लिनी हा शास्त्रज्ञ आहे.
याच पद्धतीने त्याने ताचे नाव ' कारोलस लिनियस' असे ठेवले.
त्यालाच वर्गीकरण शास्त्राचा जनक म्हणतात.
व्दिनाम पद्धतीची काही उदाहरणे :
प्राणी प्रजाती जाती वैद्यानिक नाव
सिंह पँथेरा लिओ पँथेरा लिओ
वाघ पँथेरा टायग्रिस पँथेरा टायग्रिस
बिबट्या पँथेरा पारडस् पँथेरा पारडस्
वनस्पती प्रजाती जाती वैद्यानिक नाव
आंबा मँजिफेरा इंडिका मँजिफेरा इंडिका
गुलाब रोझा गॅलिका रोझा गॅलिका
तुळस ओसिमम सँक्टम ओसिमम सँक्टम
2. आधुनिक दृष्टीकोन :
1. पंचसृष्टी पद्धती -
सृष्टी मोनेरा - एकपेशीय आदिकेंद्रकी
सृष्टी प्रोटीस्टा - एकपेशीय व दृश्यकेंद्रकी - प्रोटोझुआ, शैवाल
सृष्टी कवक - एकपेशीय व दृश्यकेंद्रकी - किन्व, बुरशी , भूछत्र
सृष्टी वनस्पती
सृष्टी प्राणी
शरीर क्रीयाशास्त्र विषयक
जैवरासायनिक
भ्रौनिकीय
रक्तद्रव्यशास्त्रीय
अत्याधुनिक पद्धती
🇪🇺

0
Answer link
सजीवांचे वर्गीकरण करताना खालील निकष विचारात घेतले जातात:
- पेशी रचना (Cell Structure): सजीव एकपेशीय आहे की बहुपेशीय, या आधारावर वर्गीकरण केले जाते.
पेशी - पेशी प्रकार (Cell Type): पेशी आदिकेंद्रकी (prokaryotic) आहे की दृश्यकेंद्रकी (eukaryotic), हे पाहिले जाते.
आदिकेंद्रकी पेशी
दृश्यकेंद्रकी पेशी - पोषणाची पद्धत (Mode of Nutrition): सजीव स्वयंपोषी (autotrophic) आहे की परपोषी (heterotrophic). स्वयंपोषी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे (उदा. वनस्पती), तर परपोषी म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असणारे (उदा. प्राणी).
स्वयंपोषण
परपोषण - शारीरिक रचना (Body Organization): सजीवाच्या शरीराची रचना किती गुंतागुंतीची आहे, यावर आधारित वर्गीकरण केले जाते.
- उत्क्रांती संबंध (Phylogenetic Relationships): सजीवांचा उत्क्रांतीचा इतिहास आणि त्यांच्यातील संबंध विचारात घेतले जातात.
हे निकष वापरून सजीवांना विविध गटांमध्ये विभागले जाते, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासात सुलभता येते.