तक्रार ऊर्जा नैसर्गिक ऊर्जा उपभोक्ता गॅस सिलिंडर

गॅस सिलेंडर घरी डिलिव्हरी न घेता गोडाऊनमधून घेतला तर, वेळेपूर्वी संपला तर गॅस एजन्सी विरोधात तक्रार कोठे करावी?

2 उत्तरे
2 answers

गॅस सिलेंडर घरी डिलिव्हरी न घेता गोडाऊनमधून घेतला तर, वेळेपूर्वी संपला तर गॅस एजन्सी विरोधात तक्रार कोठे करावी?

2
*🧐गॅस सिलिंडर विषयी महत्वाची माहिती जी तुम्हाला माहीतच असायला हवी..?!👍*

*🔰📶महा डिजी | विशेष माहिती*

        *गॅस सिलिंडरचा वापर जवळपास सर्वच घरात होतो.* परंतु, गॅस कनेक्शन घेतल्यानंतरही अनेकांना आजही त्याच्या फायद्यांबाबत माहिती नाही. याच अज्ञानाचा फायदा काही लोक घेतात. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे नियम सांगणार आहोत. यामुळे तुम्ही दक्ष तर राहाल त्याचबरोबर तुमचा आर्थिक फायदाही होईल.

*जर तुम्ही सिलिंडरची घरी डिलिव्हरी न घेता स्वतः* गोडावूनमधून घेतला तर तुम्ही त्या एजन्सीकडून 19 रुपये 50 पैसे परत घेऊ शकता. कोणतीही गॅस एजन्सी ही रक्कम देण्यास नकार देऊ शकत नाही. ही रक्कम डिलिव्हरी चार्ज म्हणून सिलिंडर बुकिंग करतानाच तुमच्याकडून घेतलेली असते. सर्व कंपन्यांना सिलिंडरची ही रक्कम ठरलेली आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी ही रक्कम वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला डिलिव्हरी चार्ज 15 रुपये घेतले जात. आता ती रक्कम वाढवून 19.50 पैसे करण्यात आली आहे.

*कोणताही एजन्सी चालक ही रक्कम नाकारु शकत नाही.* परंतु, जर एखाद्याने पैसे देण्यास नकार दिला तर तुम्ही *18002333555* या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता. दरम्यान, ग्राहकांना अजूनही वर्षभरात सबसिडीचे 12 सिलिंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यानंतर बाजारातील दराने सिलिंडर खरेदी करावे लागतात.

*🧯रेग्युलेटर लीक झाल्यानंतर काय करायचं..?!*
        जर तुमच्या सिलिंडरचा रेग्युलेटर लीक झाला असेल तर तुम्ही ते फ्रीमध्ये एजन्सीकडून बदलून घेऊ शकता. त्यासाठी जवळच्या एजन्सीचे सबस्क्रिप्शन व्हाऊचर गरजेचे आहे. तुम्हाला तो रेग्युलेटर आपल्याबरोबर एजन्सीकडे न्यावा लागेल. सब्स्क्रिप्शन व्हाऊचर आणि रेग्युलेटरचा नंबर जुळतो का हे पाहिले जाईल आणि दोन्ही नंबर एकच असल्यास *तुम्हाला रेग्युलेटर बदलून दिला जाईल.* त्यासाठी तुम्हाला कोणतेच शूल्क द्यावे लागणार नाही.

*🤔रेग्युलेटर खराब झाला तर..?!*
        जर तुमचा गॅस रेग्युलेटर एखाद्या कारणामुळे खराब झाला असेल तर गॅस एजन्सी तोही बदलून देते. परंतु, यासाठी एजन्सी कंपनीच्या टेरिफप्रमाणे तुमच्याकडून *ठराविक रक्कम जमा करुन घेते.* ही रक्कम 150 रुपयांपर्यंत असू शकते.

*🕵️‍♂️तुमचा रेग्युलेटर चोरीला गेला तर..?!*
        जर तुमचा रेग्युलेटर चोरीला गेला आणि तुम्हाला एजन्सीकडून नवीन रेग्युलेटर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पोलिसांत *एफआयआर दाखल करावा लागेल.* एफआयआरची प्रत जमा केल्यानंतर एजन्सी तुम्हाला रेग्युलेटर बदलून देईल.

*🧐तुमचा रेग्युलेटर हरवला तर..?!*
        रेग्युलेटर हरवला तर तुम्हाला *250 रुपये जमा करुन* एजन्सीकडून नवीन रेग्युलेटर घेता येईल. ग्राहकांच्या सुविधेसाठी आता मल्टिफंक्शनल रेग्युलेटरही बाजारात आले आहेत. हे रेग्युलेटर टाकीत गॅस किती राहिला आहे, हेही सांगतात. रेग्युलेटरची लाइफटाइम वॉरंटी असते. मात्र, उत्पादनासंबंधी समस्या असेल तरच रेग्युलेटर फ्रीमध्ये बदलून दिले जातात. इतरवेळेस शूल्क घेतले जातात.

*_📍तर मंडळी वरील माहिती पुढील वेळी लक्षात ठेवा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्याचबरोबर मित्रांना सुद्धा कळवा..!!🤝_*
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_

*_महा डिजिटल मॅगेझिन_*

https://bit.ly/34kRwdy
___________________
*🔰📶महा डिजी । माहिती*

💁‍♂️   *जर गॅस सिलिंडर वेळेपूर्वी संपला तर LPG एजन्सीविरोधात, येथे करु शकता तक्रार - पहा सविस्तर*

⏰   तस तुम्हला माहिती असेल कि आपल्या देशात आता नवीन ग्राहक संरक्षण लागू झाला आहे

📢   त्यानुसार आता आपण गॅस सिलिंडर वेळेच्या आधी संपला तर त्याची तक्रार ग्राहक फोरम मध्ये करु शकता

💁‍♂️    *हे आपण आणखी सविस्तरपणे समजून घेऊ ?*

🔰    एलपीजी वितरक बऱ्याच वेळेस पुरवठा करताना वजयमाप यंत्र स्वत: कडे ठेवत नाही , तसेच वजन न करता एलपीजी सिलिंडरवर ग्राहकांना पोहोचतात

🔰    अशा वेळी आता नवीन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार गॅस सिलिंडर वेळेच्या आधी संपला तर त्याची तक्रार

🔰    आपण थेट ग्राहक मंचात तक्रार दाखल करु शकता , याठिकाणी एका महिन्यातच, आपल्या तक्रारीवर दखल घेतली जाईल

🔰    तसे ग्राहक *एलपीजी सोडून सुद्धा* कोणत्याही गोष्टीची फसवणूक झाली तर आपण http://www.consumerhelpline.gov.in/ या पोर्टलवर

🔰    तसेच सकाळी ९ ते संध्याकाळी ५ दरम्यान  - 1800114000 किंवा 14404 या दोन पैकी एका हेल्पलाईन वर कॉल करू शकता

🔰    *दरम्यान हि माहिती* प्रत्येक ग्राहकांसाठी खूप महत्वाची आहे ,आपण इतरांना पण अवश्य शेअर करा
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 15/8/2020
कर्म · 569245
0
तुम्ही गॅस सिलेंडर घरी डिलिव्हरी न घेता गोडाऊनमधून घेतला आणि तो वेळेआधीच संपला, तर तुम्ही गॅस एजन्सीविरोधात खालील ठिकाणी तक्रार करू शकता:

1. गॅस कंपनीकडे तक्रार:

2. ग्राहक न्यायालयात तक्रार:

  • जर गॅस कंपनीने तुमच्या तक्रारीचे समाधानकारक निवारण केले नाही, तर तुम्ही ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकता.
  • ग्राहक न्यायालयात तक्रार करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आणि पुरावे सादर करावे लागतील.

3. ऑनलाइन तक्रार:

  • तुम्ही ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण मंचावर (Online Consumer Complaint Redressal Forum) तक्रार नोंदवू शकता.

4. पेट्रोलियम मंत्रालयाकडे तक्रार:

  • पेट्रोलियम मंत्रालय हे गॅस कंपन्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते. तुम्ही त्यांच्याकडे देखील तक्रार करू शकता.

तक्रार करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • गॅस सिलेंडर कधी घेतला याची तारीख.
  • गॅस एजन्सीचे नाव आणि पत्ता.
  • सिलेंडर नंबर.
  • तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक.
  • तक्रारीचे कारण.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2220

Related Questions

भारत गॅस वडिलांच्या नावावरून मुलाच्या नावावर घेता येतो का?
घरगुती गॅस सिलेंडर घेतला तर ६६० रुपये घेतो, पण मेसेज ६४८ चा येतो, याची तक्रार कुठे करायला पाहिजे?
गॅस सिलिंडर ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया काय आहे?
गॅस एजन्सी घरपोच सिलेंडर देण्यासाठी काही एजन्सी जास्त पैसे घेतात, त्याची तक्रार कुठे करायची आणि एजन्सीला घरपोच सिलेंडर देण्यासाठी काही नियम आहेत का?