कागदपत्रे प्रक्रिया ऊर्जा नैसर्गिक ऊर्जा उपकरणे गॅस सिलिंडर

गॅस सिलिंडर ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया काय आहे?

3 उत्तरे
3 answers

गॅस सिलिंडर ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया काय आहे?

6
_*LPG कनेक्शन ट्रान्सफर करण्याची सोपी पद्धत*_

_अनेकदा आपण आपलं राहतं घर बदलतो. नवं घर घेतो. जेव्हा घराचा पत्ता बदलतो, तेव्हा गरजेच्या गोष्टी ट्रान्सफर कराव्या लागतात. आम्ही तुम्हाला सांगतोय की घरचा पत्ता बदलला तर गॅस कनेक्शन कसं ट्रान्सफर करायचं._

👉 _*तुम्ही त्याच भागात शिफ्ट झालात*_
_तुम्ही ज्या भागात राहता, तिथेच नव्या घरात शिफ्ट झालात, तर तुम्ही तुमच्या वितरकाशी संपर्क करा. तुम्हाला एक फाॅर्म भरावा लागेल. त्यावर नव्या घराचा पत्ता द्यावा लागेल. सोबत प्रमाणपत्रही. याव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही द्यावं लागणार नाही कारण तुमच्या गॅस एजन्सीकडे तुमची माहिती अगोदरच असते._

👉 _*तुम्ही शहर बदललं*_
तुम्ही वेगळ्या शहरांत शिफ्ट झालात तर गॅस कनेक्शनची प्रक्रिया वेगळी आहे. तुम्हाला जुन्या एजन्सीकडे जाऊन सब्सक्रिप्शन वाऊचर, डोमेस्टिक गॅस कंझ्युमर कार्ड, ट्रान्सफर सब्सक्रिप्शन वाऊचर सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावे लागतील. त्यानंतर वितरक तुम्हाला टर्मिनल वाऊचर तयार करून देईल. तुम्ही दुसऱ्या शहरात जाल तेव्हा तुम्हाला जवळच्या एजन्सीशी संपर्क साधावा लागेल. तुमचं टर्मिनल वाऊचर आणि नव्या घराचा पत्ता द्यावा लागेल. चौकशी पूर्ण जाल्यानंतर नवी गॅस एजन्सी तुम्हाला रेग्युलेटर आणि गॅस सिलेंडर देईल. तुम्ही सिलेंडर जमा केलंत की जुनी गॅस एजन्सी तुमचे सिक्युरिटी पैसे परत करेल. नव्या एजन्सीकडे तुम्हाला पुन्हा सिक्युरिटी पैसे भरावे लागतील._

👉 _*गॅस एजन्सी बदलायची असेल*_
_तुम्हाला हवं तर तुम्ही वितरक बदलू शकता.  त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. वितरक बदलण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जुन्या वितरक आॅफिसमध्ये जाऊन मिळालेले सब्सक्रिप्शन वाऊचर जमा करावं लागेल. इथे तुम्हाला टर्मिनल वाऊचर मिळेल. त्यावर तुम्हाला नवा पत्ता भरावा लागेल. वाऊचरला पूर्ण भरून जुना वितरक स्टँप लावून द्यावं लागेल._

👉 _*ही कागदपत्रं आवश्यक*_
_पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड अपडेट करावं लागेल. पत्ता बदलल्यावर आधार कार्डही अपडेट करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्राची गरज लागणार नाही. आधार व्यतिरिक्त टेलिफोनचं बिल, विजेचं बिल, मतदार आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुकाची झेराॅक्स, पासपोर्ट ही कागदपत्रं गरजेची आहेत._
उत्तर लिहिले · 6/4/2019
कर्म · 569245
5
तुमच्या जुन्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून तुमचे जुने कनेक्शन सिलेंडरसहित (शेगडी वगळून) जमा करा. जुनी एजन्सी तुम्हाला ट्रान्सफर लेटर देईल. ते लेटर घेऊन नवीन एजन्सीला भेट द्या. तिथे ते लेटर, रहिवासी पुरावा, बँक खाते, आधार कार्ड, फोटो द्या. तुम्हाला नवीन सिलेंडर मिळेल.
उत्तर लिहिले · 19/8/2017
कर्म · 210095
0

गॅस सिलिंडर (LPG cylinder) ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. कंपनी निवडणे:
    • तुम्ही ज्या कंपनीचा गॅस वापरत आहात (उदा. इंडेन, भारत गॅस, एचपी), त्याच कंपनीमध्ये तुम्हाला सिलिंडर ट्रान्सफर करण्याची सोय मिळते.
  2. आवश्यक कागदपत्रे:
    • गॅस कनेक्शनचे कागदपत्र (Subscription Voucher/SV)
    • ओळखीचा पुरावा (Proof of Identity) (आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, इ.)
    • पत्त्याचा पुरावा (Proof of Address) (आधार कार्ड, वीज बिल, पाणी बिल, इ.)
  3. गॅस एजन्सीमध्ये अर्ज:
    • तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  4. ऑनलाइन प्रक्रिया:
    • काही कंपन्या ऑनलाइन पद्धतीने सिलिंडर ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात. त्यांच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता.
  5. शुल्क:
    • सिलिंडर ट्रान्सफर करण्यासाठी काही शुल्क लागू शकते.
  6. वेळ:
    • सिलिंडर ट्रान्सफर होण्यासाठी काही दिवस लागू शकतात.

टीप:

  • नवीन पत्त्यावरील गॅस एजन्सी तुमच्या क्षेत्राला सेवा पुरवते की नाही, याची खात्री करा.
  • तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती (acknowledgement receipt) मिळेल, ती जपून ठेवा.

अधिक माहितीसाठी, तुमच्या गॅस कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या किंवा त्यांच्या कस्टमर केअरला संपर्क साधा.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2260

Related Questions

गॅस सिलेंडर घरी डिलिव्हरी न घेता गोडाऊनमधून घेतला तर, वेळेपूर्वी संपला तर गॅस एजन्सी विरोधात तक्रार कोठे करावी?
भारत गॅस वडिलांच्या नावावरून मुलाच्या नावावर घेता येतो का?
घरगुती गॅस सिलेंडर घेतला तर ६६० रुपये घेतो, पण मेसेज ६४८ चा येतो, याची तक्रार कुठे करायला पाहिजे?
गॅस एजन्सी घरपोच सिलेंडर देण्यासाठी काही एजन्सी जास्त पैसे घेतात, त्याची तक्रार कुठे करायची आणि एजन्सीला घरपोच सिलेंडर देण्यासाठी काही नियम आहेत का?