अध्यात्म वनस्पतीशास्त्र आरोग्य

तुळशीची माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

तुळशीची माहिती मिळेल का?

3

​# *तुळस* 

भारतात तरी 'तुळस' माहिती नाही अशी व्यक्ती नाही सामान्यपणे हिंदू धर्मातील जवळजवळ सर्व महिला जागा
मिळेल तेथे चाळीत, गॅलरीत, ब्लॉकमध्ये किंवा बंगल्यात एक
तरी तुळशीचे झाड लावतातच आपल्या पूर्वजांनी त्यांना माहीत असलेल्या विज्ञानाचा उपयोग सगळ्यांना व्हावा म्हणून हे विज्ञान संस्कृतीत बसविले दिनचर्या व धार्मिक विधींमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा उपयोग त्यांनी चातुर्याने करून घेतला. पाण्यामुळे थंडी व सर्दीचा त्रास संभवतो तो घालवण्यासाठी त्यास सर्दीहारक तुळस लागते. वैद्य
दातारशास्त्री नेहमी सर्दीखोकल्याच्या रोग्यांना सोप्पा उपाय सांगत. एका फुलदाणीत पाणी घेऊन त्यात तुळशीची एक जुडीठेवून ती रुग्णाच्या पलंगाशेजारी डोक्याशी ठेवल्यास सर्दीचा त्रास तुळशीच्या अस्तित्वाने कमी होतो. थोडक्यात थंडीमुळे होणारे आजार तुळशीमुळे घालवता येतात.
आपण आपल्या घरात जी तुळस लावतो तिचे वर्गीकरण
फॅब्लिी लिबियाटीत केलेले आहे. जगात या वर्गाच्या १६० प्रजाती आहेत. भारतात २६ प्रकार आहेत. याच वर्गात सब्जा, मरवा छोटय़ा पानांचा ओवा, रोजमेरी, इ. प्रकार आहेत. या वनस्पती झुडूप वर्गात मोडतात. त्या सुगंधी असतात व त्यांच्या दांडय़ांवर आणि पानांवर तेलाने भरलेले केसांसारखे पिंड असतात. या सर्व वनस्पती औषधासाठी वापरल्या जातात. तुळशीच्या पानातून ओझोन (०३) हा वायू बाहेर पडतो या वायूमुळे मन प्रसन्न आनंदी राहते. साधारण सकाळच्या वेळी तुळशीला प्रदक्षिणा घालतात, पूजा करतात. त्या वेळी ओझोन बाहेर पडत असतो त्या काळात महिलांना घराबाहेर मॉर्निग तुळशीच्या पानातून ओझोन (०३) हा वायू बाहेर पडतो. या वायूमुळे मन प्रसन्न आनंदी राहते. साधारण सकाळच्या वेळी तुळशीला प्रदक्षिणा घालतात, पूजा करतात. त्या वेळी ओझोन बाहेर पडत असतो त्या काळात महिलांना घराबाहेर मॉर्निग वॉकला जाण्याची पद्धत नव्हती महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने तुळशीच्या सान्निध्यात जर सकाळचा काही वेळ घालवला तर त्यांचे आरोग्य चांगले राहील व त्यामुळे कुटुंबाचेसुद्धा आरोग्य
त्यांच्यामुळे चांगले राहील.
आपल्याकडे तुळशीचे सामान्यपणे तीन प्रकार लावले जातात. यात रामतुळस (हिरवी), कृष्णतुळस (काळसर पाने) व कापूर तुळस हिच्या पानांना कापरासारखा वास येतो. यातील कापूर तुळस ही उंच वाढणारी बहुवर्षीय आहे. तुळशीचे औषधी
गुणधर्म मंजिरी (फुले) आल्यावर कमी होतात. यासाठी मंजिऱ्या सातत्याने काढल्या जाऊन त्या देवास वाहतात.तुळशीच्या अस्तित्वाने आजार बरे होतात व आरोग्य चांगले राखतो.




















उत्तर लिहिले · 6/8/2020
कर्म · 34255
0

तुळशीची माहिती

तुळस (इंग्रजी: Basil, Ocimum tenuiflorum) ही एक औषधी वनस्पती आहे. तुळस ही भारतीय संस्कृतीत पवित्र मानली जाते आणि अनेक घरांमध्ये तिची पूजा केली जाते.

तुळशीचे प्रकार

तुळशीच्या मुख्यत्वे दोन प्रकार आढळतात:

  • रामा तुळस: या तुळशीची पाने हिरवी असतात.
  • श्यामा तुळस: या तुळशीची पाने जांभळट रंगाची असतात.

उपयोग

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. खाली काही उपयोग दिलेले आहेत:

  • सर्दी आणि खोकला झाल्यास तुळशीच्या पानांचा रस गुणकारी असतो.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस उपयुक्त आहे.
  • त्वचेच्या विकारांवर तुळशीचा लेप लावल्यास फायदा होतो.
  • तणाव कमी करण्यासाठी तुळशीचा चहा फायदेशीर आहे.

धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे, जो कार्तिक महिन्यात केला जातो.

संदर्भ

विकिपीडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B8)

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5280

Related Questions

भारतातील औद्योगिक चिकित्सा करा भाषाची?
योग साधनेसाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींचे महत्त्व?
योग साधनेसाठी नैसार्गिक ओषधी वनस्पतींचे?
योग जीवनशैली म्हणजे काय?
फास्ट फुडचे परिणाम?
खालील विधाने वाचुन त्यातील योग्य उत्तराची निवड करा. Assertion (A)दीर्घकालीन ताण मानसिक विकाराना कारणीभूत ठरू शकतो.(R)ताणामुळे शरीरातील हामोनल संतुलन बिघडते.a?
खालील विधाने वाचून त्यातील योग्य उत्तराची निवड करा.Assertion (A)दीर्घकालीन ताण मानसिक विकारांना कारणीभुत ठरू शकतो.Reason (R)ताणामुळे शरीरातील होमनल बिघडते.?