भूगोल अध्यात्म धर्म

दहा दिशा व त्यांचे स्वामी कोण आहेत?

2 उत्तरे
2 answers

दहा दिशा व त्यांचे स्वामी कोण आहेत?

2
भारतीय वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करताना आपण अष्टदिशांना महत्त्व देतो. अष्ट म्हणजे आठ या शब्दाला आपल्या भारतात अनेक दृष्टीकोनातून महत्त्व आहे.



उदा अष्टपैलू, अष्टदिशा, अष्टगुणसंपन्न, अष्टप्रधान, अष्टलक्ष्मी, अष्टविनायक, अष्टौप्रहर, “अष्टपुत्र सौभाग्यवती भव’ सारखे प्राचीन आशीर्वाद, अशा अनेक संकल्पनांमधून आठ या आकड्याचे महत्त्व दिसून येते.



अष्टदिशा
पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य या आठ दिशा आहेत.
------------------------



  • १. पूर्व दिशा :
--------------------------

या दिशेचा दिशापालक इंद्र देव आहे. त्याची पत्नी शची देवी आहे. त्याचे नगर (पूर) अमरावती आहे. त्याचे वाहन पांढरा हत्ती (ऐरावत) आहे. त्याचे आयुध वज्रायुध हे आहे. या दिशेची राशी मेष (१) , वृषभ (२) आहे. या दिशेचा रंग श्वेत (पांढरा) आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला ऐश्वर्यं लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह सूर्य (रवी) हा आहे.

*पूर्व दिशेचे महत्व*

१) या दिशेला जमिनीचा उतार असल्यास त्या वास्तूमध्ये ऐश्वर्य ,धन व बुद्धी मध्ये वाढ होते
२) हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो धन नाश होतो
३) पूर्व जागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास त्या घरात समृद्धी येते
४) या दिशेला घराचा दिवाणखाना असावा
५) मुख्य दरवाजा असावा शोभिवंत कुंड्या असव्यात
६) या जागी संडास असल्यास रुधय रोग , रक्तविकार , उष्णज्वर,शिरोरोग होतात असे अनुभव आहेत
७) या जागी फिक्का गुलाबी, क्रीम, पांढरा , असे रंग असावे.
८) या दिशेला खूप उंच झाडे असू नयेत परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावीत.
९) या दिशेला कुंपण इतर दिशे पेक्षा कमी उंचीचे असावे.
१०) राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी पूर्वेच्या मध्यभागी मुख्य दरवाजा असावा.

------------------------
*अष्टदिशा*
------------------------

वास्तुशास्त्रात दिशेची योग्य जागा पाहुनच घरबांधणी करण्याचे संकेत दिले आहेत. कारण घर व माणूस आकाशाकडून केंद्रीय उर्जा, सौरउर्जा तसेच प्रकाश मिळवतात. जमिनीच्या गुरुत्वाकरणाने प्रभावित होतात तसेच मुख्य दिशा व उपदिशांच्या मदतीनेच नैसर्गिक शक्ती मिळवतात.
सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व तर सूर्य मावळतो त्या दिशेला पश्चिम दिशा म्हणतात.

------------------------


  • २) पश्चिम दिशा
--------------------------

पश्चिम ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. पूर्व ही सूर्य  उगवण्याची दिशा आहे, तर पश्चिम ही सूर्य मावळण्याची दिशा आहे. मराठीत पश्चिम दिशेला ’मावळत’ असाही शब्द आहे. ही दिशा पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला आणि दक्षिण-उत्तर दिशांना लंबरूप असते. ३६० अंशाच्या होकायंत्रावर ही दिशा २७० अंशाच्या कोनात असते.

भारताच्या पश्चिम दिशेला असणार्‍या लोकांना किंवा त्यांच्या संस्कृतीला भारतीय भाषांमध्ये पाश्चात्त्य किंवा पाश्चिमात्य अशी विशेषणे वापरतात.

पश्‍चिम या दिशेचा स्वामी वरुण आहे. या दिशेला वास्तुशास्त्रानुसार योग्य बांधकाम केल्यास घरमालकास धन, समृद्धी, यश, सफलता मिळते. हा भाग पूर्वेच्या बांधकामापेक्षा खाली असल्यास घरमालकाला नेहमी अपयश, आर्थिक नुकसानी पदारात पडते. पश्‍चिम-नैर्ऋत्य बाजूला मुख्य प्रवेशद्वार नको. उंचावरील पाण्याची टाकी नको. भोजनकक्ष चांगला राहतो*

*पश्चिम दिशा*

१) या दिशेला नेहमी संडास , बाथरूम असावे.
२) या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते.
३) हि दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते व्यवसाय वृद्धी होते.
४) या दिशेला सेप्टिक टैंक चालेल.
५) प्लॉट मध्ये या दिशेला कमी जागा सोडावी.
६) ईशान्य दिशे पेक्षा जास्त उतार असल्यास दुख भोगावे लागेल.
७) गडद सर्व रंग चालतील.

----------------
*अष्टदिशा*
----------------
घर बांधताना, फ्लॅट घेताना, घरातील, कार्यालयातील रचना करताना ज्या आठ दिशा आहेत त्याचा विचार करावा.या  ठिकाणी लक्षात घ्यावे की, आकाशतत्व घराच्या मध्यभागी असते. इतर तत्त्वांचे या जागेवर प्रभुत्व असते.

-----------------------

                
  • ३) उत्तर दिशा
--------------------------

पूर्व दिशेच्या खालोखाल या दिशेला महत्त्व आहे. उत्तर याचा अर्थ अतिउत्तम, नेहमी वाढणारा असा आहे. कुबेराच्या स्वामित्वामुळे या दिशेकडे धनसंपत्तीची रेलचेल आहे. म्हणून वास्तूतील पैशांचे कपाट किंवा तिजोरीचे तोंड उत्तर दिशेला करून ठेवण्याचा सिद्धांत आहे. उत्तर दिशेकडून येणार्‍या स्पंदनलहरी पूर्वदिशेच्या खालोखाल मानवी जीवनात पोषक व श्रेष्ठतम आहे. उत्तरचा दुसरा अर्थ प्रश्‍नांचे उत्तर हा आहे. म्हणून अडचणीच्या वेळी उत्तरेकडे तोंड करून बसल्यास प्रश्‍नांचे उत्तर मिळते, असे वास्तुशास्त्र सांगते. उत्तरेकडे आकाशात ध्रुवतारा आहे. तो नेहमी स्थिर असतो. म्हणून स्थिरतेच्या दृष्टीने ही दिशा महत्त्वपूर्ण आहे. जेवताना, घरी विचारविनिमय करताना, आंघोळ करताना, कारखान्यात वगैरे काम करताना, कार्यालयात बसताना लाभदायक उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे.

उत्तर दिशेचा स्वामी धनाचा देव कुबेर आहे. याचा प्रतिनिधी ग्रह ‘बुध’ हा आहे. वास्तू बांधताना उत्तर दिशेकडे जास्तीत जास्ती मोकळा भाग घ्यावा, यामुळे जीवनभर आर्थिक स्थिती चांगली राहते. हे आपल्या ‘मातेचे’ म्हणजे आईचे स्थान आहे. हा भाग घरातील इतर स्थानांच्या मानाने उंच आणि घाणेरडा नको, नाहीतर घरच्या स्त्रीला नेहमी शारीरिक व मानसिक त्रास होत राहतो.
*उत्तर, ईशान्य, पूर्व*
या कोनांमध्ये पाण्याची टाकी, स्विमिंग पूल, तलाव असल्यास घरची इतर मंडळी संवेदनशील, बुद्धिमान राहतात. त्यामुळे सुखी, समृद्ध जीवन प्राप्त होते. या भागात स्वयंपाकघर, कोठीघर (स्टोअर रूम), नोकरांसाठी राहाण्याची जागा धोकादायक आहे. तसेच कार, वाहने, स्कूटर्स वगैरे ठेवण्याची जागा नसावी. मुख्य दरवाजा, व्हरांडा, बैठकीची खोली, बाल्कनी असणे योग्य राहील.

--------------------------------
*उत्तर दिशेचे महत्व*
------------------------------
१) साक्षात कुबेराची हि दिशा असून या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये कधीही पैसे कमी पडत नाही
२) या दिशेला नेहमी उतार असावा…
३) या दिशेला पाण्याचा साठा शुभ
४) या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी.
५)हि दिशा नेहमी साफ व सुंदर ठेवावी.
६) या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी.
७) महत्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावी.
८) या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी
९) या दिशेला संडास असल्यास दारिद्र्य येते
१०) मुलांनी अभ्यास करताना याच दिशेला तोंड करावे.

-------------
अष्टदिशा
----------------
घर बांधताना, फ्लॅट घेताना, घरातील, कार्यालयातील रचना करताना ज्या आठ दिशा आहेत त्याचा विचार करावा.या  ठिकाणी लक्षात घ्यावे की, आकाशतत्व घराच्या मध्यभागी असते. इतर तत्त्वांचे या जागेवर प्रभुत्व असते.

---------------------


  • ४) दक्षिण दिशा
--------------------------

या भागाचे स्वामी देवता ‘यम’ आहे, तर ग्रह मंगळ आहे. ही दिशा तिच्या वाईट गुणधर्मांमुळे कुठल्याही शुभकार्यास वर्ज्य मानली गेली आहे. या बाजूने मनुष्याच्या कल्याण करणार्‍या लहरी (स्पंदन) येत नाहीत म्हणून दक्षिण बाजूला घराचा मुख्य दरवाजा करू नये, असा संकेत आहे. दक्षिण बाजू इतर बाजूंपेक्षा थोडी उंच ठेवावी, त्यामुळे घरादाराला सुख मिळेल. मुलांच्या अभ्यासाची खोली या बाजूला नको. लागेल तर कोठीघर (स्टोअर रूम) ठेवा. झोपण्याची खोली असल्यास नुकसान नाही. विहीर नको, जिना, लिफ्ट चालेल. कार्यालयात विक्री व्यवस्थापक, कामगार व्यवस्थापक, हिशेब तपासनीस, उच्चस्तरीय अधिकारी यांनी बसणे चांगले राहील. दुकानात या बाजूला तळघर असल्यास मंदिरगृह, क्लब, इतर कारखान्यात विश्रांतीची खोली, अर्धा तयार माल, वाहन तळ ठेवावे.
------------------------------
दक्षिण दिशेचे महत्व
------------------------------
१) या दिशेला दार अशुभ आहे. या दिशेला दार असल्याने सतत त्रास होतो आजारपण असते.
२) हि दिशा नेहमी उंच असावी तसेच या दिशेच्या भिंतीही इतर दिशेपेक्षा जाड व उंच असव्यात.
३) या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास एकामागे एक असे मृतू होतात.
४)दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती लाऊ नका मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालून येतात हे योग्य नव्हे.
५) या दिशेला उंच झाडे लावावीत.
६) या दिशेला निळा भुरका रंग चालेल.
७)या दिशेला संडास बाथरूम असल्यास पती पत्नीमध्ये सतत कलह असतो.
८) दक्षिणेला वरती मजला बांधल्यास शुभ फळ मिळते.
९) या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक चणचण असते.
१०) या दिशेला जिना शुभ फळ देतो.
११) या जागी तळघर असल्यास अपमृत्यू होतात.

-------------
अष्टदिशा
----------------
घर बांधताना, फ्लॅट घेताना, घरातील, कार्यालयातील रचना करताना ज्या आठ दिशा आहेत त्याचा विचार करावा.या  ठिकाणी लक्षात घ्यावे की, आकाशतत्व घराच्या मध्यभागी असते. इतर तत्त्वांचे या जागेवर प्रभुत्व असते.

------------------------


  • ५) ईशान्य दिशा
--------------------------

ईशान्यचा स्वामी महादेव (शंकर) आहे, तर प्रतिनिधी ग्रह ‘गुरू’ आहे. ईशान्यला सूर्याची महाशक्तिमान किरणे सूर्योदयानंतर फेकली जातात.

या दिशेला घराचे मुख्य द्वार असणे अतिशय शुभ मानले जाते. विहीर, बोअरवेल, जमिनीखाली पाण्याची टाकी या बाजूला असल्यास शुभ फळे मिळतात. या भागात देवघर, पूजास्थान असणे चांगले.
विद्यार्थ्यांनी या दिशेला बसूनच अभ्यास करावा, वयोवृद्ध व्यक्ती, विधूर-विधवा येथे राहू शकतात. या बाजूला शौचालय नसावे. विवाहित दाम्पत्याने राहू नये. या कोपर्‍यात घराच्या आवारात उंच झाडे नसावेत.घराचा ईशान्य कोपरा तुटलेला असू नये. कारखान्यातील संचालक मंडळींनी या दिशेला बसू नये.तसेच माल ठेवणे, पहारेकर्‍यांची जागा, कामाची जागा न ठेवणे चांगले. वास्तूतील हा भाग, कोन हलका पाहिजे. या बाजूला मोठमोठी कपाटे वगैरे ठेवणे चांगले मानले जात नाही. या बाजूला स्वच्छतागृह, स्वयंपाकघर नसावे.
कार्यालय किंवा कारखानदारांनी या बाजूला स्वागतकक्ष, पिण्याचे पाणी, मंदिर, तळघर, संगणक ठेवावेत, पण स्वच्छता या भागात ठेवणे फायदेशीर राहील. दुकानदारांनी या भागातून प्रवेश ठेवावा. कापड, शिक्षण, सोने-चांदी, आध्यात्मिक वस्तूंसाठी दुकाने या भागात ठेवणे इष्ट राहते. कारखान्यात प्रशासन, तांत्रिकी विभाग, दुचाकी ठेवण्याची जागा, तयार माल ठेवायला हरकत नाही.
ईशान्य दिशेला जर दोष असतील, तर माणसाला अतिशय त्रास होतो. वंशवृद्धी होत नाही, चिंता लागून राहते, मुलांच्या शिक्षणात अडचणी येतात, आर्थिक बाजू कमकुवत होते इत्यादी.
---------------------------------
ईशान्य दिशेचे महत्व
---------------------------------

देवघर

साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे, संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे

१) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल
२) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा
३) ईशान्येला नेहमी उतार असावा
४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये
५) या कोपऱ्यात संडास कचराकुंडी, संडासची टाकी ,चप्पल , जिना , विजेचा मीटर , मोठी झाडे स्वयंपाकघर , वाहनतळ असणे अशुभ
६) वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास अशी वस्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावेत अश्या जागी वंशनाश होतो दारिद्रय येते विनाकारण संकटे येतात.
७) या जागी रोज देवपूजा करावी , दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी लावावे या जागी कलश आवर्जून ठेवा..
८) इथे नवरा बायकोने झोपणे टाळावेच , अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती अथवा लहान मुले चालतील.

-------------
अष्टदिशा
----------------
घर बांधताना, फ्लॅट घेताना, घरातील, कार्यालयातील रचना करताना ज्या आठ दिशा आहेत त्याचा विचार करावा.या  ठिकाणी लक्षात घ्यावे की, आकाशतत्व घराच्या मध्यभागी असते. इतर तत्त्वांचे या जागेवर प्रभुत्व असते.
------------------------


  • ६) आग्नेय दिशा –
---------------------------

या दिशेचा स्वामी अग्निदेव आहे. गणपतीपण आहे.

वास्तूतील हे अग्नीचे स्थान आहे. या भागात स्वयंपाकघरातील गॅस, स्टोव्ह, चूल ठेवावी. स्वयंपाकघराजवळ विहीर नसावी. नाहीतर घरातील गृहिणी सदैव आजारी राहण्याची शक्यता असते. सासू-सून, जावा-जावा यांची भांडणे व्हायची शक्यता असते. घरात चोरी होऊ शकते. घरात सासू-सून असल्यास सासूने या दिशेच्या खोलीत राहणे योग्य नाही. देवघर, शयनकक्ष, बैठकीची खोली, प्रवेशद्वार या बाजूला करणे टाळावेच. जमिनीच्या खाली टाकी नसावी. मुलींसाठी शयनगृह असणे ठीक राहील. कारखान्यात, कार्यालयात विजेचे मीटर, स्वच्छतागृह, वातानुकूलित यंत्र, ट्रान्सफॉर्मर, बॉयलर, उपाहारगृह असावे. वास्तूच्या या भागात ब्युटीपार्लर, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने चांगली चालतील.
--------------------------------
आग्नेय दिशेचे महत्व
----------------------------------
१) या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते.
२) या दिशेला विजेचा मीटर तसेच जनरेटर विचेची मोटार अश्या वस्तू असाव्यात.
३) आग्नेय दिशेला विहीर कुपनलिका पाण्याची टाकी असल्यास शत्रूंचा त्रास तसेच अपघात योग दाखवतात.
४) या दिशेला वाहनतळ करू शकता.
५) हा कोपरा दुषित असल्यास त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो.
६) या दिशेला काही दोष असल्यास कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा.
७) या दिशेला दार असल्यास संबधित तज्ञाकडून उपाय करून घ्यावेत अशा वेळी घरात नेहमी मतभेद असतात.
८) या दिशेला हलका गुलाबी फिक्कट केसरी रंग देऊ शकता.
९) अग्नेयेचे दार दक्षिणेला असल्यास दीर्घ रोग व कटकटी असतात.

-------------
अष्टदिशा
----------------
घर बांधताना, फ्लॅट घेताना, घरातील, कार्यालयातील रचना करताना ज्या आठ दिशा आहेत त्याचा विचार करावा.या  ठिकाणी लक्षात घ्यावे की, आकाशतत्व घराच्या मध्यभागी असते. इतर तत्त्वांचे या जागेवर प्रभुत्व असते.
------------------------


  • ७) नैर्ऋत्य दिशा
-------------------------
या भागात पृथ्वीतत्त्व व राहू-केतूंचे स्थैर्य असते. हा कोपरा घरात सर्वात उंच ठेवावा. संडास या दिशेला बांधणे योग्य. इथे पाण्याची भूमिगत टाकी बांधू नये. लहान मुलांना या भागात झोपवू नये. नोकर माणसांना चुकूनही या भागातील खोली देऊ नये. फक्त कोठीघर असल्यास चांगले. मास्टर बेडरूम ठेवावी. कार्यालयात संचालक मंडळींनी या कोनात बसावे. माल ठेवण्याचे गोडाऊन या भागातच ठेवावे

------------------------------
नैऋत्य दिशेचे महत्व
------------------------------
१) हि दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी.
२) या दिशेला घरातील मोठ्यांचे बेड रूम असावे तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेला तोंड करून ठेवावी.
३)या दिशेला जिना चालेल संडास बाथरूम चुकूनही असू नये.
४) हि दिशा कट असल्यास अथवा या दिशेला दार असल्यास आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतो.
५) या दिशेला गोडाऊन अथवा वाहनतळ चालेल.
६) या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंचावर असल्यास अति उत्तम
७) जी व्यक्ती घरात या जागच्या खोलीत राहते त्याचेच प्रभुत्व या घरावर राहते.
८) या दिशेचा दरवाजा असल्यास त्वरित बंद करावा.
९) या दिशेला संडास पाण्याची टाकी विहीर उतार असल्यास अपकीर्ती बाहेरील बाधा चर्मरोग होतात तसेच संकटांची मालिका चालू राहते असा अनुभव आहे.

---------------------------
-: अष्ट दिशा :-
----------------------------
घर बांधताना, फ्लॅट घेताना, घरातील, कार्यालयातील रचना करताना ज्या आठ दिशा आहेत त्याचा विचार करावा.या  ठिकाणी लक्षात घ्यावे की, आकाशतत्व घराच्या मध्यभागी असते. इतर तत्त्वांचे या जागेवर प्रभुत्व असते.

---------------------


  • ८) वायव्य –
-------------------------

या कोनात वायुदेव व चंद्राचा प्रभाव असतो. या भागात हँडपंप नसावा. पाण्याची भूमिगत टाकी, हौद नसावा. स्वयंपाकघर चालेल. या बाजूच्या खिडक्या व दरवाजे जास्तीत जास्त वेळ उघडे ठेवावेत, मुख्यत: कारखानदारांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. विहीर नसावी. नवविवाहितांचे शयनगृह नसावे. कार्यालयात विक्री कर्मचारी बसणे योग्य. दुकानात जाहिराती, वाहनप्रदर्शन जागा ठीक राहील. कारखान्यात जावक विभाग ठेवावा.

----------------------------------
वायव्य दिशेचे महत्व
----------------------------------

१) या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेड रूम असावे.
२) या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ
३) या दिशेला विहीर कुपनलिका ,जमिनीच्या खालचा पाण्याचा साठा पक्षाघात वेडेपणा कावीळ असे रोग दर्शवतात
४) या दिशेला जिना शुभ
५) ज्यांचे विवाह जमत नाही अश्या व्यक्तींनी या दिशेला झोपावे.
६) व्यवसायाच्या जागी या दिशेचा माल लवकर विकला जातो.
७) या दिशेला संडास चालेल.







---------------------------------------------
  • मानवी जीवनावर दिशांचे परिणाम
----------------------------------------------

पृथ्वीच्या पोटातून विविध प्रकारचे प्रवाह वाहत असतात. त्यांचा अभ्यास करून दिशांचे परिणाम ठरविले गेले आहेत.

  • १)पूर्व दिशा :-
पूर्व दिशेकडून वाहणारे प्रवाह हे प्रकाश मार्गाचे आहेत, देव-देवतांचे आहेत. त्यामुळे पूर्व दिशेकडे तोंड करून जप, ध्यान केले असता खूप चांगले अनुभव येतात, ज्ञानप्राप्ती होते, प्रकाशाचा मार्ग मिळतो, देव-देवतांची कृपा होते.

  • २)ईशान्य दिशा :-
ईशान्य दिशेकडून वाहणारे प्रवाह पूर्व दिशेप्रमाणेच दैवी असतात, प्रकाशमान असतात व ईश्वरीय असतात.

  • ३)उत्तर दिशा :-
उत्तर दिशेकडून वाहणारे प्रवाह हे सिद्धपुरुषांचे असतात, ऋषींचे असतात. या दिशेकडे तोंड करून जप-ध्यान केले असता दैवी कृपा व ज्ञान प्राप्त होते. पूर्व, ईशान्य व उत्तर दिशा या मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या आहेत.

  • ४)पश्चिम दिशा :-
या दिशेकडून वाहणारे प्रवाह साधकाला संपत्ती, ऐश्वर्य व किर्ती प्राप्त करून देतात. देव-देवतांची कृपा प्राप्त करून देतात.

  • ५)वायव्य दिशा :-
वायव्य दिशेकडे तोंड करून जप केला असता पश्चिम व उत्तर या दोघांची मिश्रफळे प्राप्त होतात.

  • ६)दक्षिण दिशा :-
दक्षिण ही पिशाच्च यांची दिशा आहे. वाईट शक्तींची दिशा आहे. या दिशेकडे तोंड करून साधना केली असता दुसऱ्याचे वाईट करण्याची शक्ती प्राप्त होते. असा मनुष्य कधीही दुसऱ्याचे चांगले करु शकत नाही. दक्षिण दिशेकडे तोंड करून साधना केली असता मनात कधीही चांगले विचार येत नाहीत, फक्त वाईट विचारच मनात येतात. काळी विद्या (Black magic), चेटूक विद्या (Witchcraft) अशा दुसऱ्याचे वाईटच करण्याच्या विद्या, पिशाच्च विद्या, काळ्या शक्ती प्राप्त करू इच्छिणारे साधक दक्षिण दिशेकडे तोंड करून साधना करतात. अतिशय दृष्ट अशा शक्तीचें प्रवाह दक्षिण दिशेकडून वाहतात.

  • ७) नैऋत्य दिशा :-
दक्षिण दिशेपेक्षाही भयंकर अशा शक्तींचे प्रवाह नैऋत्य दिशेकडून वाहतात. या दिशेला राक्षशांची दिशा असे म्हंटले जाते. राक्षसी आत्मे या दिशेला राहतात. दक्षिण दिशेप्रमाणेच या दिशेची फळे आहेत. दक्षिण किंवा नैऋत्य दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये. पिशाच्च बाधा व रोग होतात.

  • ८) आग्नेय दिशा :-
या दिशेला अग्नीची दिशा मानलेले आहे. अग्नितत्वाची उपासना करणारे लोक या दिशेकडे तोंड करून साधना करतात. यक्ष- यक्षिणींची साधना आग्नेय दिशेकडे तोंड करून घेतली जाते.
सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर दिशांचे परिणाम फारसे दिसून येत नाहीत.
उत्तर लिहिले · 1/8/2020
कर्म · 7815
0

दहा दिशा आणि त्यांचे स्वामी खालीलप्रमाणे आहेत:

  1. पूर्व: इंद्र
  2. अग्नेय: अग्नी
  3. दक्षिण: यम
  4. नैऋत्य: निऋती
  5. पश्चिम: वरुण
  6. वायव्य: वायू
  7. उत्तर: कुबेर
  8. ईशान्य: ईशान्य (शिव)
  9. ऊर्ध्व दिशा (वरची): ब्रह्मा
  10. अधो दिशा (खालची): अनंत

टीप: काही ठिकाणी ऊर्ध्व दिशेचे स्वामी विष्णू आणि अधो दिशेचे स्वामी शेषनाग असल्याचे सांगितले जाते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

मार्कंडेय ऋषी कोण होते?
इस्टरपूर्वी ख्रिस्ती उपवास का करतात?
आज गुरुवार कोणत्या देवाचे महत्त्व व शिकवण काय आहे?
बौद्ध धर्माने स्त्रियांना नाकारले होते का?
केरळच्या देवाला चॉकलेटचा नैवेद्य लागतो हे खरे काय?
देवाचे गुरू बृहस्पति यांचे मंदिर कोठे आहे?
बौद्ध धर्मातील गणपती बदल माहिती दया?