4 उत्तरे
4 answers

चारधाम माहिती द्या?

12
हिंदू धर्मात चार पवित्र क्षेत्रांना चार धाम म्हटलेले आहे व चार धामांची यात्रा सांगितली आहे. ते चार धाम खालीलप्रमाणे-

बद्रीनाथ (उत्तराखंड)
केदारनाथ (उत्तराखंड)
गंगोत्री (उत्तराखंड)
यमुनोत्री (उत्तराखंड)

वैष्णव तीर्थे

आदिगुरू शंकराचार्य यांनी परिभाषित केल्याप्रमाणे तेथे चार वैष्णव तीर्थे आहेत. जिथे प्रत्येक हिंदूला त्याच्या आयुष्यात जाणे आवश्यक आहे, जे हिंदूंना मोक्ष प्राप्त करण्यास मदत करेल. याच्या उत्तरेस बद्रीनाथ, पश्चिमेस द्वारका, पूर्वेस जगन्नाथ पुरी व दक्षिणेस रामेश्वरम् धाम आहे

आदि शंकराचार्यांचे चार मठ भारताच्या चार कोपऱ्यात आहेत. ते असे :-

  • पश्चिम दिशेला शारदा मठ, द्वारका (गुजरात) ... स्थापना युधिष्ठिर संवत् २६४८
  • दक्षिणेला शृंगेरी (चिकमंगलूर), रामेश्वर (वेदान्त मठ तामिळनाडू) ... स्थापना-युधिष्ठिर संवत् २६४८
  • पूर्वेला जगन्नाथपुरी (गोवर्धन मठ, ओरिसा)... स्थापना युधिष्ठिर संवत् २६६५
  • उत्तरेला ज्योतिर्पीठ, (बद्रीनाथ (उत्तराखंड) ... स्थापना-युधिष्ठिर संवत् २६४१ ते २६४५
चार धाम

1. बद्रीनाथ





बद्रीनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. बद्रीनाथ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून व ते राजधानी डेहराडूनच्या ३३५ किमी ईशान्येस स्थित आहे.

आद्य शंकराचार्यांनी ९व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.

2. रामेश्वर





रामनाथस्वामी मंदिर (मराठी लेखनभेद: रामेश्वर ; तमिळ: இராமேஸ்வரம் ;) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम द्वीपावरील रामेश्वरम शहरामधील एक शिवमंदिर आहे. हिंदू मान्यतांनुसार रामाने रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी शंकराची आराधना केली. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते.

3. द्वारका





द्वारकाधीश मंदिर हे भारत देशाच्या गुजरात राज्यातील द्वारका शहरामधील कृष्णाचे एक मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी द्वारकाधीश मंदिर एक आहे. हे मंदिर गुजरातच्या देवभुमी द्वारका जिह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ स्थित आहे. ह्या म्ंदिराचे वय २,२०० -२,०००० वर्षे असावे असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

4.  जगन्नाथपुरी





जगन्नाथ मंदिर (उडिया: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର୍) हे भारत देशाच्या ओरिसा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली.



उत्तर लिहिले · 1/8/2020
कर्म · 44255
2

हिंदू धर्मात चार पवित्र क्षेत्रांना चार धाम म्हटलेले आहे व चार धामांची यात्रा सांगितली आहे. ते चार धाम खालीलप्रमाणे -

बद्रीनाथ (उत्तराखंड)
केदारनाथ (उत्तराखंड)
गंगोत्री (उत्तराखंड)
यमुनोत्री (उत्तराखंड)



उत्तर लिहिले · 12/10/2020
कर्म · 6750
0

भारतातील चारधाम यात्रा:

चारधाम यात्रा ही भारतातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तीर्थयात्रा आहे. ह्या यात्रेत भारतातील चार प्रमुख मंदिरांना भेट दिली जाते.

हे चार धाम खालीलप्रमाणे आहेत:

  1. बद्रीनाथ: हे धाम उत्तराखंड राज्यात असून भगवान विष्णूंना समर्पित आहे. बद्रीनाथ मंदिर हे अलकनंदा नदीच्या काठी वसलेले आहे.
  2. द्वारका: हे गुजरात राज्यात असून भगवान कृष्णाला समर्पित आहे. द्वारकाधीश मंदिर हे गोमती नदीच्या काठी वसलेले आहे.
  3. रामेश्वरम: हे तामिळनाडू राज्यात असून भगवान शंकरांना समर्पित आहे. रामनाथस्वामी मंदिर हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.
  4. जगन्नाथ पुरी: हे ओडिशा राज्यात असून भगवान जगन्नाथ (कृष्ण) आणि त्यांच्या बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांना समर्पित आहे. जगन्नाथ मंदिर हे रथयात्रेसाठी प्रसिद्ध आहे.

ही यात्रा हिंदू धर्मात मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1080

Related Questions

कांदळगांवचा रामेश्वर बद्दल माहिती द्या?
पट्टा किल्ल्याबद्दल माहिती द्यावी?
पाचगणीतील गेस्ट हाऊस मध्ये फ्री मध्ये राहण्यासाठी काय अटी आहेत?
भारतातील अजबगजब ठिकाणे कोणती?
महाराष्ट्रातील कोणत्या गावात चार महिने धुके पडते?
इटलीच्या कोणत्या गावात राहण्यासाठी पैसे व घर दिले जाते?
फ्रान्स मध्ये सुट्टी का घेत नाहीत?