3 उत्तरे
3
answers
जर उत्तम गुरू मिळत नसेल तर आपल्या आराध्य परमेश्वराला गुरू मानले तर चालेल काय?
13
Answer link
ज्यामुळे आपण घडतो त्यास गुरू म्हणतो..
तुम्हाला जर तुमच्या आराध्यात गुरू वाटत असेल तर तेही गुरुच..
गुरू म्हणजे शिक्षक..
जो कोणतीही पदवी न घेताही विविध रुपात एखाद्याचं कल्याण करणारा असतो तो गुरू..
तुम्हाला तुमचं जीवन त्या व्यक्ती, सजीव, शक्ती, एखादी गोष्ट अश्या कोणत्यातरी गोष्टींमुळे सार्थकी झालं असं वाटत असेल ती गोष्ट म्हणजे आपला गुरू होय..
तुम्हाला तो एक प्रसंग ज्ञात आहे का..
जेव्हा १९९४ मध्ये भारतीय राष्ट्रपति श्री शंकर दयाल शर्मा यांनी एका अधिकारीक यात्रा विमानाने केली तेव्हा ओमानचे सुलतान(ओमान किंग) हे स्वतः राष्ट्रपतींना घ्यायला थेट विमानस्थळावर पोहोचले..
असं म्हणतात की ओमान किंग हे कुणालाच(कितीही महत्त्वाची व्यक्ती असली तरीही) घ्यायला विमानस्थळावर येत नाही..
एवढेच नाही तर ओमान किंग यांनी स्वतःचे सर्व सुरक्षा सोडून आपल्या ड्रायव्हरच्या जागी बसून त्या गाडीत राष्ट्रपतींना बसवून ओमान किंग खुद्द चालक समजून त्यांना कार मधून सन्मानाने नेले..
यावर बऱ्याच रिपोटर्सनी ओमानच्या सुल्तान यांना विचारणा केली की हे सर्व प्रोटोकॉल तुम्ही भारताच्या राष्ट्रपतींसाठी का तोडले..!!
तेव्हा सुल्तान म्हणाले, श्री शंकर दयाल शर्मा एक राष्ट्रपती होते म्हणून मी त्यांना घ्यायला विमानतळावर नाही गेलो.. तर मी भारतात शिकलो आहे.. वेगवेगळ्या गोष्टी मी शिकलो.. जेव्हा मी पुण्यात शिकत होतो तेव्हा श्री शंकर दयाल शर्मा हे माझे प्राध्यापक होते.. आणि हेच कारण आहे की मी त्यांच्यासाठी असे केले..
तेव्हा कोणताही गुरू ठरवून होत नाही.. तुम्हाला ते गुरू कळावे लागतात.. आज कुणाच्या तरी गोष्टींचं आपण अवलंबन केलं आणि इथपर्यंत पोहोचलो... तीच गोष्ट महत्त्वाची आहे..
इथे ओमानचा सुल्तान कबूस बिन सैद-अल-सैद हे त्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करत आहेत जे आज त्यांच्या मनात शिक्षकांप्रति मनात आदर निर्माण आहे.. कुठेतरी त्या शिक्षकाने त्या गुरूने आपल्याला अशी काही शिकवण दिली आहे जी मी माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या कार्यासाठी अंमलात घेत आहे.. आणि याचा पुरेपूर फायदाही मला मिळत आहे..
म्हणून गुरू हे तुम्हाला तुमच्या जीवनात महत्त्व घडवून गेले असतील त्यास माना..
ज्या मुळे तुम्ही माणुसकी जपता त्यास गुरू माना..
माझ्यासाठी माझा गुरू म्हणजे पुस्तक..
जान्हवी जाधव

8
Answer link
म्हणुनी जाणतेनो श्रीगुरु भजीजे। जेणे कृत कार्य होइजे। जैसे मूळ सिंचने सहजे ।शाखा पल्लव संतोषती।।
मानवी जीवनाला आकार देणारा खरा कुंभार जर कोणी असेल तर तो माणसाला लाभलेला गुरु होय. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंना, सवयींना घासून पुसून चमकविण्याचे कार्य एक शिक्षकच करू शकतो. त्यामध्ये सर्वात पहिली भूमिका आईची गुरु म्हणून महनीय आहे.
आई माझा गुरु। आई कल्पतरु।।
सुखाचा सागरू ।आई माझी।।
भारतीय संस्कृती व विचार परंपरा यामध्ये असणारी विचारधारा गुरू परंपरेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संदीपनी - श्रीकृष्ण, वसिष्ठ- श्रीराम, द्रोणाचार्य -अर्जुन या प्राचीन कालखंडातील काही गुरु-शिष्यांच्या जोड्या अजरामर झालेल्या आहेत. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून गुरूंच्या शेताचा बांध वाचवणारा आरुणी शिष्याची निष्ठा अधोरेखित करतो तर गुरूने मांगीतलेला अंगठा एकलव्य एक क्षणात देतो. ही महाभारतातील त्यागाची घटना सर्वश्रुत आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये निवृत्तीनाथ- ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद, संत तुकाराम- छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय जगप्रसिद्ध गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने व विचारधारेच्या बळावर त्यांच्या शिष्याच्या जीवनामध्ये कायापालट झालेला आहे. अलीकडच्या काळात रमाकांत आचरेकर व सचिन तेंडुलकर या गुरू शिष्याच्या जोडीने सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले होते. आपल्या शिष्याने जगामध्ये नाव उज्वल करावे हा ध्यास प्रत्येक गुरूचा असतो. गुरु म्हणजे कोण? तर शिष्या मधील असणाऱ्या गुणांना ओळखून त्या गुणांना खऱ्या अर्थाने पारखून त्याना जगासमोर मांडण्याचे कसब ज्या व्यक्तीमध्ये असते तो म्हणजे खरा गुरु होय. गुरूच्या आगमनाने शिष्याच्या जीवनातील दहाही दिशा प्रकाशमान होतात. त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व अंधकार गुरूच्या ज्ञानाच्या प्रकाशाने दूर करता येऊ शकतो. ज्ञानेश्वर माऊली गुरूंचे वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात- म्हणुनी जाणतेनो श्रीगुरु भजीजे। जेणे कृत कार्य होइजे। जैसे मूळ सिंचने सहजे ।शाखा पल्लव संतोषती।।
ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या मुळाशी आपण जलसिंचन केले असता त्याचा फायदा त्यांच्या शाखा व पानांना होतो; त्याप्रमाणे सामान्य माणसाने श्रीगुरुयांच्या विचाराने व ज्ञानाने आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. हा संदेश देतात. वेदकाळापासून गुरुमहिमा अपरंपार आहे म्हणूनच वेदांमध्ये
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मये श्री गुरवे नमः ।।
असे म्हटले आहे. आयुष्यातील पहिला श्री गणेशा आईच्या शिकविन्याने होतो तर पुढे वर्गात शिकवणारे गुरु शिक्षक हे सुद्धा विविध टप्प्यावर गुरुची भूमिका निभावत असतात. विज्ञान युगामध्ये हे आज संगणक आपल्याला विविध प्रकारे माहिती प्राप्त करून देतो तर त्याला गुरु म्हणावे का तर जो ज्ञान देतो, मार्ग दाखवितो व चुकलेल्याला वाट दाखवतो तोच खरा गुरु होय. मानवी मनाची शक्ती अगाध आहे. ती शक्ती प्रत्येकच व्यक्तीला ओळखता येत नाही. ती शक्ती ओळखण्याचे काम गुरु करत असतो, त्या शक्तीला त्या व्यक्तीची ताकद बनवायची काम गुरु करीत असतात . खऱ्या गुरूंना ओळखता आले पाहिजे. भारतीय अध्यात्म विचारांमध्ये हे आपण जर पाहिलं तर नामदेवांनी आपल्या आयुष्यात गुरु केले नव्हते म्हणून छोट्याशा मुक्ताईने त्यांना गोरोबा काकांच्या थापट्या ने तपासून नामा कच्चा हा निकाल दिला होता .त्याचं कारण त्यांच्या आयुष्यात गुरूंचे स्थान नव्हतं. गुरु नसल्यामुळे अहंकार आला होता साक्षात भगवंत माझा हातचे जेवण जेवतो . म्हणजेच नाम्याच्या हातची खीर भगवंत खात होते त्यामुळे त्यांना अभिमान झाला होता, तो जाण्यासाठी गुरूंना शरण गेले पाहिजे हा उपदेश संत मंडळींनी नामदेवांना केला होता. त्यामुळे त्यांनी थेट विसोबा खेचर यांचे कडे जाऊन त्यांना आपले गुरु केले होते. श्री गुरु सारखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ।।राजयाची कांता काय भीक मागे। मनाच्या जोगे सिद्धी पावे ।।
असं वर्णन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये श्रीगुरुंबद्दल केले आहे. आज आपल्याला प्रत्येकालाच योग्य गुरु प्राप्त होईलच हे सांगता येणार नाही. म्हणून ग्रंथांना आपले गुरु मानले तर ते आपल्याला निश्चितपणे योग्य वाट दाखवू शकतात. त्यांच्यामध्ये असणारी ज्ञानाची शक्ती आपले आयुष्य उजळून टाकू शकते.म्हणून प्रत्येकाने ग्रंथांना गुरुस्थानी मानून अध्ययन करण्याची आवश्यकता आहे. आज वाचन संस्कृती लोप पावत असून, ग्रंथांना गुरु मानण्याची आपली जी परंपरा आहे ती बाजूला करून संगणकावर असलेल्या माहिती आपली गरज भागवत आहे. त्यामुळे जे मला माहित आहे ते इतरांना माहीत आहे. जे इतरांना माहीत आहे ते मला माहित आहे . त्यामुळे सर्वांचे ज्ञान एका विशिष्ट पातळीवर समान झाले आहे. ग्रंथामुळे ज्ञानाची लांबी, रुंदी, खोली व कल्पकता ही वाढण्याचे एक महत्वाचे साधन आहे. जणूकाही एखादी व्यक्ती जी मार्गदर्शकाच्या भुमीकेत आहे ती आपल्याला मार्ग दाखवीत आहे, त्याप्रमाणे ग्रंथसुद्धा आपल्याला विविध प्रसंगी मार्ग दाखवत असतात. अनुभव हा सुद्धा एक महत्त्वाचा शिक्षक किंवा गुरूच आहे. अनुभव आपल्याला त्याच्या बळावर विविध निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. ज्याचा अनुभव जेवढा अधिक तेवढा त्याचा निर्णय अधिक अचूक असतो हे बऱ्याच प्रमाणात सत्य आहे. अनुभवी व्यक्ती हे कुटुंबाचे,संस्थेचे व राष्ट्राचे खरे धन आहेत. खरे गुरु आहेत. त्यांच्या अनुभवाच्या ज्ञानाने त्या व्यक्तींना त्या संस्थेला त्या राष्ट्राला पुढे नेण्याची, भवितव्य घडवण्याची व निश्चित क्षमता असते म्हणून अशा व्यक्तींना जपणे ही प्रत्येक कुटुंबाची , संस्थेची व राष्ट्राची महत्त्वाची जबाबदारी आहे. गुरू काय करू शकत नाही- वो चहा तो इंसान बना सकता है ।ऐसे वैसे को सुलतान बता सकता है ।उसकी शक्ती को समझो दुनियावालो । वो पत्थर की मुरत को भगवान बना सकता है । वो है गुरू...
अनुभव हा कठोर शिक्षक आहे तो पहिल्यांदा शिक्षा करतो व त्यानंतर शिकवितो. ओपन असणारा गुरु आज प्राचीन कालखंडांमध्ये राज कुमारांना गुरूंच्या आश्रमात जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते. तेव्हा त्यांना आपल्या राजघराण्यातील सुख सुविधा त्यागून हे काम करावे लागत होते. सांदिपनी ऋषींच्या आश्रमात साक्षात श्रीकृष्ण भगवंतांनी फुले फळ तोडणे, लाकडे तोडणे, गुरूंच्या सोबत जे पडेल ते काम करणे व त्यांचे आज्ञापालन करणे असे काम केले आहे. म्हणजेच श्रमाचे मूल्य गुरु शिष्यांना शिकवित होते. त्या बळावर त्यांनी आपले आयुष्य उजळून टाकले. रामकृष्ण व स्वामी विवेकानंद यांची ही जोडी तत्वज्ञान विषयक चर्चांमध्ये अजरामर झालेली आहे. महात्मा फुले संत कबीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुरू स्थानी मानत असत. तुकडोजी महाराजांचे गुरू संत अडकोजी महाराज हेसुद्धा अलीकडच्या काळातील एक महत्वाची गुरु-शिष्य परंपरा व त्यांचा संप्रदाय जयगुरुदेव परंपरेचे आचरण करीत आहेत.
गुरूदेव दया करदे । हम ध्यान धरे तेरा ।।हा विचार राष्ट्रसंतांनी या गुरु परंपरेसाठी दिला आहे ..
आज धर्म, अध्यात्म व विज्ञान यांनी कितीही प्रगती केली असली तरी अंतरीच्या जिव्हाळा पासून शिकविणाऱ्या शिक्षकांची, गुरूंची वानवा आहे. गुरूंची जागा कोणताही संगणक घेऊ शकणार नाही .करण त्याला बनविणारा हा शेवटी एक गुरूच आहे,एक व्यक्तीच आहे. म्हणून गुरुचे मानवी जीवनातील तील स्थान हे एकमेवाद्वितीय व अनन्यसाधारण आहे ते बदलता येऊ शकत नाही...
- डॉ. आखरे हरिदास

0
Answer link
जर तुम्हाला योग्य गुरु मिळत नसेल, तर तुम्ही तुमच्या आराध्य परमेश्वराला गुरु मानू शकता.
या संदर्भात काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे:
- भक्ती आणि श्रद्धा: तुमची परमेश्वरावर पूर्ण भक्ती आणि श्रद्धा असावी.
- मार्गदर्शन: परमेश्वराकडून तुम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन मिळेल असा विश्वास ठेवा.
- सत्कर्म: नेहमी सत्कर्म करत राहा आणि आपल्या सद्विवेकबुद्धीनुसार वागा.
अनेक संत आणि महापुरुषांनी परमेश्वरालाच आपला गुरु मानले आहे आणि त्यांनी त्यातूनच ज्ञान प्राप्त केले आहे. त्यामुळे, योग्य गुरु मिळत नसेल तर परमेश्वराला गुरु मानणे निश्चितच योग्य आहे.