प्रजनन प्राणी पाळीव प्राणी पशुवैद्यकीय

कुत्रीण किती दिवसात पिलांना जन्म देते?

2 उत्तरे
2 answers

कुत्रीण किती दिवसात पिलांना जन्म देते?

2
जगातील निरनिराळ्या प्रदेशांत पाळलेल्या कुत्र्यांच्या बाबतीत प्रजननाच्या तपशिलात बराच फरक आढळतो. सर्वसाधारणपणे कुत्री (मादी) एक वर्षाची झाल्यावर वयात येते. काहींना यापेक्षा आधी, सहा महिन्यांनीच पहिला ॠतुस्राव होतो यानंतर दर सहा महिन्यांनी ॠतुचक्र सुरू राहते. ॠतुकाळी जननेंद्रियातून रक्त पडते व यावेळी मूत्रात येणाऱ्या दर्पयुक्त पदार्थामुळे कुत्रे (नर) मादीकडे आकर्षिले जातात. ॠतुकाळ जरी एक आठवडा राहत असला, तरी त्यानंतर काही दिवस– दोन आठवडेपर्यंत सुद्धा– कुत्री नराला संयोग करू देते. हा काळ संपण्यापूर्वी ७२ तास अंडमोचन (अंडाशयातून अंडे बाहेर पडणे) होते. ॠतुकाळ सुरू असताना कुत्री एकापेक्षा अधिक नरांना संयोग करू देते. अशा वेळी कधीकधी एकाच वेतात दोन नरांची पिले असण्याचा संभव असतो. नर-मादीच्या फलित संयोगानंतर ६२-६३ दिवसांनी कुत्री पिलांना जन्म देते. अगदी लहान आकाराच्या ‘चिवावा’सारख्या जातीत एक किंवा दोन तर मोठ्या जातीत आठ ते दहा पिले होतात. पाच वर्षांनी मादीची जननक्षमता कमी होऊ लागते व आठ वर्षाच्या सुमारास संपूर्ण नष्ट होते.
उत्तर लिहिले · 15/7/2020
कर्म · 7815
0

कुत्री साधारणपणे 58 ते 68 दिवसांच्या गर्भावस्थेनंतर पिलांना जन्म देतात. सरासरी गर्भधारणेचा काळ 63 दिवस असतो.

कुत्रीण कोणत्या प्रकारची आहे, तिची शारीरिक क्षमता आणि तिची पहिली वेळ आहे की नाही यावर देखील हे अवलंबून असते.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5060

Related Questions

बायकोच्या मुस्लिम मैत्रिणीला गेल्या पंधरा वर्षांपासून मूल होत नाही, त्यासाठी काय केले पाहिजे?
बायकोच्या मुस्लिम मैत्रिणीला गेल्या पंधरा वर्षांपासून मूल होत नाही, तर मी काय मदत करू शकतो आणि ती कशी?
संततीसाठी वडाच्या कोंबाचा उपयोग?
पुंस्वन म्हणजे काय?
फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे?
बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा?
मुले कधी होऊ द्यावीत?