2 उत्तरे
2 answers

बँक व्याज दर कसा ठरवते?

2
बँक आपला व्याजदर बीपीएस (BPS ) च्या हिशोबाने कमी करते. हे तेव्हा होते, जेव्हा आरबीआय म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात येते. बीपीएस इंटरेस्ट रेट आणि बाकी फायनान्स पर्संटेजची गणना करणारे एक युनिट असते. ज्याला खासकरून इंटरेस्ट रेट बदलण्याच्या वेळी वापरण्यात येते._*
*_१०० बीपीएसचा अर्थ एक टक्का आणि जर जनरल इंटरेस्ट रेट १५ बीपीएसपेक्षा कमी झाला आहे, तर याचा अर्थ हा आहे की, ०.१५ टक्के कमी झाला._*       
मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट फॉर्म्यूला (एमसीएलआर) च्या आधारावर व्याज दर ठरवण्यात येतो. हा बँकांचा कमीत कमी व्याज दर असतो, या व्याजदरापेक्षा कमी व्याजदराने कोणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्ज दिले जाऊ शकत नाही. याला इंटरनल बेंचमार्क किंवा बँकेचे रेफ्रेंस रेट असे म्हटले जाते._*
🔻कसे ग्राहकांना वेगवेगळ्या व्याजदरावर लोन मिळते ?🔻
*_भलेही बँक एक विशिष्ट व्याजदर ठरवते. पण असे काहीही नसते की, त्या बँकेतून कर्ज घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा व्याजदरावर कर्ज दिले जाईल. बँक तुमचा सिबिल स्कोर पाहू शकते आणि त्या हिशोबाने जो व्याजदर तुमच्या सिबिल स्कोरला मॅच करतो, तो बँकेद्वारे ठरवला जाऊ शकतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, जर कोणाचा सिबिल स्कोर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर त्याला बँकेने ठरवलेलय व्याज दरावर कर्ज मिळू शकते. जर ८५० पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल, तर व्याजदरावर बार्गेनिंग करणे सोपे होईल आणि व्याजदरावर काही बीपीएस (BPS) ची सूट मिळू शकते.जर तुमचा क्रेडिट स्कोर ७५० पेक्षा कमी आहे, तर तुम्हाला कर्ज देणे की न देणे हे बँकेच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही येथे तुमच्याकडे कोणतीही बार्गेनिंग पॉवर उरलेलीच नाही आहे. क्रेडिट स्कोर जर कमी असेल, तर बँक ठरवते की, तुम्हाला कोणत्या व्याजदरावर कर्ज दिले गेले पाहिजे. असे मानले जाते की, कर्ज त्याच व्याजदरावर दिले गेले पाहिजे. जो बँकेने ठरवला आहे. पण प्रत्येकवेळी असे घडत नाही. जर तुमचा सिबिल स्कोर खूपच खराब असेल, तर बँक तुमचे लोन रीजेक्ट देखील करू शकते._*
🔻क्रेडिट रेटिंग बरोबर असल्याचे फायदे :🔻
चांगले इन्व्हेस्टमेंट डिसीजन :
क्रेडिट स्कोरच्या आधारावर कर्ज घेणे खूप सोपे होते. बँक असो किंवा एखादी कंपनी असो कधीही रिस्की कस्टमरला कर्ज देऊ इच्छित नसते. त्यांना व्याजाच्या आधारावर पैसे कमवायचे असतात आणि त्यामुळे ते योग्य या ग्राहकावर पैसे लावू इच्छित असतात.
🔻सुरक्षा :
पैसे देणाऱ्या बँकेला किंवा कंपनीला हा विश्वास असतो की, त्यांचे पैसे कुठेही जाणार नाहीत आणि कर्ज घेणारा मनुष्य वेळेवर आपले पैसे परत करू शकले.
🔻कर्ज घेणारांसाठी फायदे
सहज कर्ज उपलब्ध होणे :
क्रेडिट रेटिंग जर चांगली असेल, तर तुम्हाला सहजतेने कर्ज उपलब्ध करून मिळेल आणि ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा रिस्क घ्यावी लागणार नाही. बँक तुमचे लोन अप्लिकेशन सहज मंजूर करेल.
कमी व्याजदर
जर तुमही सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला व्याजदरावर बार्गेनिंग करण्याची देखील सुविधा मिळते.
🔻क्रेडिट स्कोर चांगला कसा होतो ?
बहुतेक लोकांचे असे मानणे असते की, क्रेडिट स्कोर तेव्हा सर्वात चांगला असेल जेव्हा तुम्हीं कोणतेही कर्ज घेतलेले नसेल, क्रेडिट कार्डचा वापर केला नसेल आणि कोणत्याही प्रकारचा ईएमआय चालू नसेल. पण सर्व एकदम चुकीचे आहे. क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये पैश्यांचा व्यवहार करणे गरजेचे आहे. पण हा व्यवहार कॅशमध्ये नसावा, कारण जोपर्यंत बँकांना हे माहीत नसेल की, तुम्ही कशाप्रकारे कर्जाची भरपाई करू शकाल, तोपर्यंत तुमचा क्रेडिट स्कोर चांगला होणार नाही.
अशाप्रकारे बँक एक विशिष्ट पद्धतीने प्रत्येक कर्जदाराचा व्याजदर ठरवते आणि त्यानुसार त्याला कर्ज देते.
इनमराठी  वरून साभार
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
_*माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव*_
*╰──────•◈•──────╯*
*🌹.............................................*
.       _*ണคн¡т¡ รεvค*_
.       *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
.            *༺♥༻​​*

0

बँक व्याज दर ठरवताना अनेक घटकांचा विचार करते. त्यापैकी काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत:

1. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) धोरण:

  • रिझर्व्ह बँक रेपो रेट (Repo Rate) आणि रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) ठरवते. याच आधारावर बँका त्यांच्या व्याज दरात बदल करतात. (RBI FAQ)

2. मागणी आणि पुरवठा (Demand and Supply):

  • कर्जाची मागणी जास्त असल्यास व्याज दर वाढण्याची शक्यता असते.
  • ठेवी (Deposits) जास्त असल्यास व्याज दर कमी होण्याची शक्यता असते.

3. महागाई दर (Inflation Rate):

  • महागाई वाढल्यास, बँका त्यांचे व्याज दर वाढवू शकतात.

4. बँकेचा खर्च (Bank's Expenses):

  • बँकेला कर्मचाऱ्यांचे वेतन, इमारतीचे भाडे आणि इतर खर्च असतात. हे खर्च भागवण्यासाठी बँक व्याज दरांचा वापर करते.

5. स्पर्धा (Competition):

  • इतर बँकांच्या व्याज दरांचा विचार करून, प्रत्येक बँक आपला दर ठरवते.

6. पत धोरण (Credit Policy):

  • बँक कर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री (Credit History) तपासते. त्यानुसार व्याज दर ठरवला जातो. (Paisabazaar)

यांसारख्या अनेक घटकांचा विचार करून बँक आपले व्याज दर ठरवते.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1780

Related Questions

बँकेचे व्याज किती मिळते?
मी सीबीआय बँकेत 10000 रुपये जमा केले आहेत, तर मला किती टक्के व्याज दर मिळेल?
बँक ऑफ इंडिया बँकेत ५०००० ला किती टक्के व्याज मिळते?
कृपया बँकेचा व्याजदर उदाहरणासह समजाऊन सांगा?
27/01/2021 मध्ये खरेदीसाठी सध्या किती दर % सुरू आहे?
एसबीआयला एफडीसाठी 2 वर्षाला कमी व 1 वर्षाला जास्त व्याज असं का?