औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय आजार आरोग्य

नॉर्मल बीपी रेट किती हवा? बीपी कमी असल्यास चक्कर येते का? लो बीपी असेल तर काय उपाय असतो?

5 उत्तरे
5 answers

नॉर्मल बीपी रेट किती हवा? बीपी कमी असल्यास चक्कर येते का? लो बीपी असेल तर काय उपाय असतो?

9
       ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब म्हणजे ज्या तीव्रतेने आपले हृदय पूर्ण शरिराला रक्तपुरवठा करते त्याचे मोजमाप म्हणजे रक्तदाब होय. हे रक्तदाब मोजण्यासाठी मशिन चा वापर केला जातो आणि रक्तदाब हे मिलिमीटर ऑफ mercury म्हणजे mmHg मध्ये मोजले जाते. 🎚️

       आता नॉर्मल रक्तदाब हा १२०/८० mmHg ते ९०/६० mmHg यांच्या मध्ये असला पाहिजे आता ते  १४०/९० mmHg च्या वर गेले तर high bp किंवा उच्च रक्तदाब मानले जाते आणि जर ते ९०/६० mmHg च्या खाली गेले तर low bp किंवा कमी रक्तदाब मानले जाते .

😧 कमी रक्तदाबाची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे :-

➡️ चक्कर येणे किंवा हलकी डोकेदुखी .
➡️ मळमळ.
➡️ अशक्त पणा येणे.
➡️ निर्जलीकरण (dehydration).
➡️ शुध्द हरपणे.
➡️ अस्पश्ट दृष्टी.

☺️ कमी रक्तदाबा वर उपाय :-

➡️ आहारात योग्य प्रमाणात मिठाचा समावेश करा.
➡️ अल्कोहोलयुक्त पेये टाळावे 🍸🍷🍾❌❌
➡️ भरपूर पाणी प्यावे.
➡️ नियमित व्यायाम, योग करावे.
➡️ सकाळी ४-५ तुळशीची पाने चाऊन खावीत त्याने सुद्धा रक्तदाब नियंत्रित राहतो.
➡️ एकदम जेवन घेण्याऐवजी थोड्या-थोड्या वेळानं खावे .

✔️  मुख्य उपाय म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलून सल्ला घेणे आणि ते जे औषधे देतील त्या प्रमाणे उपचार चालू करणे .

धन्यवाद !



     
उत्तर लिहिले · 7/7/2020
कर्म · 7975
4
नॉर्मल बीपी हा १२०/८०mm hg इतका असतो,
होय बीपी कमी असेल तर चक्कर हमखास येते
बीपी असेल तर,
१. पाठीवर झोपा :
बीपी लो झाला की अचानक डोळ्यांसमोर अंधारी येणे, गरगरल्या सारखे वाटतं. त्यानंतर ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.
२. ओरल रिहायड्रेशन सॉल्ट :
ओआरएस शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा आणि त्याचे मिश्रण बनवून प्या. मधूमेह म्हणजेच डायबिटीस असल्यासं ओआरएस पावडर  पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरे देखील असते. 
३. पाणी प्या : 
ओआरएस नसल्यास पाणी प्या. पाण्यामध्ये थोडं मीठ आणि चमचाभर साखर मिसळा.  मिठातील सोडीयम रक्तदाब नियंत्रित करतो तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करते.
४. मीठ चाखा :
रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा  देखील उपाय करु शकतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अती प्रमाणात घेऊ नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
५. डॉक्टरांचा सल्ला :
रक्तदाब स्थिरावल्यानंतर सामान्य झालात की डॉक्टांचा सल्ला घ्या. रक्तदाब कमी का झाला याचे निदान होणे गरजेचे आहे. रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नका याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित तपासून घ्या.
*****धन्यवाद*****

उत्तर लिहिले · 20/9/2020
कर्म · 9330
0

नमस्कार! सामान्य रक्तदाब (ब्लड प्रेशर) आणि कमी रक्तदाबाबद्दल (लो बीपी) तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे:

सामान्य बीपी (Normal BP):

सामान्य रक्तदाब 120/80 mmHg असतो. जेव्हा रक्तदाब 120/80 mmHg च्या आसपास असतो, तेव्हा तो सामान्य मानला जातो.

सिस्टोलिक (Systolic) रक्तदाब 120 mmHg पेक्षा कमी आणि डायस्टोलिक (Diastolic) रक्तदाब 80 mmHg पेक्षा कमी असावा.

कमी बीपी (Low BP) असल्यास चक्कर येते का?

होय, रक्तदाब कमी झाल्यास चक्कर येऊ शकते. जेव्हा रक्तदाब खूप कमी होतो, तेव्हा मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे, अंधारी येणे असे त्रास होऊ शकतात.

लो बीपी (Low BP) असल्यास उपाय:

  1. मीठ (Salt) सेवन: आहारात मिठाचे प्रमाण वाढवावे. मिठाच्या सेवनाने रक्तदाब वाढण्यास मदत होते.
  2. पुरेसे पाणी प्या: दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्यावे. पाण्यामुळे शरीरातील द्रवांचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब सुधारतो.
  3. आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. फळे, भाज्या, आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
  4. नियमित व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने रक्तदाब सुधारतो.
  5. डॉक्टरांचा सल्ला: जर रक्तदाब खूपच कमी असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार करा.

टीप: हा सल्ला केवळ सामान्य माहितीसाठी आहे. तुमच्या आरोग्यासंबंधित अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 880

Related Questions

विटामिन अ च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
मानसिक आजाराचे उपचार?
तीव्र मानसिक आजाराचे थोडक्यात विवेचन करा?
मायोपिया आजाराची लक्षणे आणि उपचार काय आहेत?
झोपेत चालण्याची सवय गंभीर आजार आहे?
मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे शरीरावरील शारीरिक आजार कोणते?