3 उत्तरे
3 answers

क्षत्रिय म्हणजे काय?

3
क्षत्रिय हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार चातुर्वर्ण्यातील एक वर्ण आहे. या वर्णातील व्यक्ती योद्धा (लढाऊ व्यक्ती) समजली जाते. आजही क्षत्रिय समाजाचे लोक भारतभर विखुरलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा व राजपूत लोक हे क्षत्रिय समाजातील लोक म्हणून ओळखले जातात.


🗡️राजे⚔️
उत्तर लिहिले · 5/7/2020
कर्म · 65405
3
क्षत्रिय हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार चातुर्वर्ण्यातील एक वर्ण आहे. या वर्णातील व्यक्ती योद्धा असतात. आजही क्षत्रिय समाजाचे लोक भारतभर विखुरलेले आहे. राजपूत तसेच गुर्जर, यादव, वैदिक क्षत्रिय म्हणून सर्वत्र स्वीकारले जातात.महाराष्ट्रामध्ये मराठा लोक हे क्षत्रिय समाजातील लोक म्हणून ओळखले जातात.


हिंदू धर्मात वर्ण व्यवस्था होती . ब्राम्हण ,क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र .त्यावरून दोन नंबरचा वर्ण म्हणजे क्षत्रिय होय . क्षत्रिय हा लढवय्या असतो .समाजाचे, रक्षण करणे हा त्याचा धर्म आहे. मनुष्य जातीवर अनेक संकटे आली बरीच सी नैसर्गिक संकटे होती.परंतु " जीवो जीवस्या जीवणं " .या उक्तीप्रमाणे टोळी करून राहणारे आदिवासी, आदी मानव एकमेकावर हल्ले करायचे .त्यातून ही वर्ण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असावी. काही लोकांनी अकलेची म्हणजेच बुध्दीची कामे करावी त्यांना ब्राम्हण नाव दिले असावे.काही धडधाकट शुर लोकांना समाजाचे रक्षण करण्याचे काम दिले ते क्षत्रिय .हिशोब ठेवणारे,धंदा ,व्यापार व्यवसायासाठी वैश्य,.आणि उरलेले शेती आणि इतर हलकी मोल मजुरीची कामे ही शूद्र करीत.

तेव्हा पासून आतापर्यंत अनेक लढाया झाल्या .रामायण महाभारत ते आजतागायत एकमेकांवर हल्ले चालूच आहेत.त्यामुळे सैन्याची जरुरी लागते.सैनिक म्हणजे क्षत्रिय होय.पण पूर्वी सारखा काही लोकांना तो अधिकार होता ,तसा प्रकार आधुनिक काळात नाही.कुठलाही समाज सैन्यात जावू शकतो.

पुराणात परशुराम पासून क्षत्रिय कसा वरचढ होऊ शकतो हे दाखविले आहे. ऋषी जमदग्नी आणि त्याची पत्नी रेणुका यांची हत्या एक राजा करतो म्हणून ब्राम्हण असलेला त्यांचा पुत्र परशुराम शपथ घेतो की या पृथ्वीवर क्षत्रिय ( राजे) जिवंत ठेवणार नाही.त्याप्रमाणे तो ही पृथ्वी नी क्षत्रिय करतो.म्हणजेच एक ब्राम्हण क्षत्रिय होतो .त्यामुळे परशुराम याला क्षत्रियांचा मुख्य मानतात .


भारतात उच्च वर्णीय पेक्षा खालच्या जातीचे लोक जास्त सैन्यात आहेत.राजपूत, सीख, जाट ,मराठा,महार( बटालियन चे नाव होते) .क्षत्रिय ही वृत्ती आहे.शुर लढवय्या,हिम्मत असलेली व्यक्ती म्हणजे क्षत्रिय.अर्जुन हा क्षत्रिय होता ,तो युद्ध करणार नाही असे श्री कृष्ण भगवान यांना सांगतो.त्यावेळी ते त्याला आठवण करून देतात की लढणे हा तुझा धर्म आहे.स्वधर्म कधीही सोडू नये .म्हणून आज सुद्धा सैनिक विर मरण पत्करतात पण शत्रूला कधी पाठ दाखवत नाही.
उत्तर लिहिले · 9/12/2021
कर्म · 121765
0

क्षत्रिय:

क्षत्रिय हा हिंदू वर्णव्यवस्थेतील दुसरा वर्ण आहे. क्षत्रिय म्हणजे योद्धा, रक्षक किंवा शासक.

क्षत्रियांचे कर्तव्य:

  • प्रजेचे संरक्षण करणे.
  • युद्ध करणे.
  • न्याय देणे.
  • दानधर्म करणे.
  • वेदांचे अध्ययन करणे.

क्षत्रियांच्या शौर्याची अनेक उदाहरणे इतिहासात प्रसिद्ध आहेत.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

एस.सी. समाजात कोण येतं?
आदिम समुदाय आणि शहरी समुदाय म्हणजे काय?
जमीनदारी पद्धतीमध्ये कोणते दोन वर्ग प्रचलित होते?
घाटा खालचे व वरचे लोक म्हणजे काय?
दलित म्हणजे काय?
ब्याकवर्ड क्लास म्हणजे के ?
बहुजन समाज म्हणजे नेमका कोणता समाज?