2 उत्तरे
2
answers
राज्यातील मुरब्बी राजकारणी कोण?
3
Answer link
महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारसणीचा पुरस्कृता राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत संतांच्या शिकवणूकीचा मोठा परिणाम आढळून येतो. समाजप्रबोधन करणार्या संतांनी जातीय विषमता यांवर नेहमीच आघात केला आहे. मागील सरकारने पुरोगामी विचारसरणीला बाजूला सारुन महाराष्ट्र मोडकडीस आणण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले. सत्ताधार्यांवर रिमोट चालवणारे हे विशिष्ट विचारणीचे व महाराष्ट्राचे हित जोपासणारे नसल्याचे महाराष्ट्राची प्रत्येक क्षेत्रात अधोगती झाली होती. जनतेतून याविषयी राग होता मात्र मतपेटीतून तो का व्यक्त होत नव्हता हे न उलगडणारे कोडे आहे. असो, महाराष्ट्राच्या अस्मितेला पोहचणारी हानी थांबविण्यासाठी व खोट्या पक्षाला ..सत्य.. काय असते हे दाखविणारे उद्धव ठाकरे प्रगल्भ ठरले. मित्रत्वाच्या नात्यातून युतीकरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होतोय हे त्यांनी वेळीच ओळखून शिवसेना मजबूत करण्यासाठी घेतलेला निर्णय महाराष्ट्राला सुखद होता. प्रादेशिक अस्मिता जपणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांसमवेत महाविकास आघाडी साधत उद्धव ठाकरेंनी राज्यात नवीन सरकारची मोठ बांधली. २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देवून शेतकर्यांना मोठा दिलासा दिला. दिलेला शब्द त्यांनी पाळल्यामुळे शेतकरी या आघाडी सरकारकडून मोठ्या अपेक्षेने बघत आहे. भाजप सरकारने एकतर्फी निर्णय घेत मुंबईतील अनेक उद्योग गुजरातकडे वर्ग केले. सराफाबाजार, कपडाबाजार, जेएनपीटी बंदर, हिरे व्यापार तसेच अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला दक्षणा म्हणून देण्यात आले. बुलेट ट्रेनच्यामाध्यमातून होणारा अन्याय महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावा लागत होता. शेतकर्यांना कर्जमाफी देताना घालण्यात आलेल्या जाचक अटीमुळे शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली नाही. अनेक शेतकरी जाचक अटींची पूर्तता करू शकत नव्हता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा भ्रमनिरास झाला होता. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने महाविकास आघाडी सरकारच्या निमित्ताने राज्याचा गाडा हाकायला सुरूवात केली आहे. पहिलाच निर्णय शेतकर्यांच्या अनेक अडचणी सोडविणारा आहे. जाणता राजा शरद पवार खुद्द या सरकारला मार्गदर्शन करत असल्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकून राहणार यात तिळ मात्र शंका नाही. येत्या काळात सरकारी नोकर्यांची दारे बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी उघडी करून राज्यात महानोकर भरती अपेक्षित आहे. तसेच जेएनपीटी व कपडा व्यापार परत गुजरातहून महाराष्ट्रात स्थलांतर करण्यासंदर्भात पाठपुरावा आवश्यक आहे. महाराष्ट्रातील थांबलेली प्रगती पुन्हा नव्या दम्याने सुरू करण्यासाठी विकासकामांचा सपाटा लावला लागणार आहे. जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी साचेबद्ध विकास आराखड्याची आवश्यकता आहे. मुरब्बी राजकारणी, अनुभवी नेतृत्व, कणखर भूमिका यांमुळे हे महाविकास आघाडी सरकार राज्यातील नागरिकांच्या आकांक्षा पूर्णत्वास नेईल अशी अपेक्षा आहे.
0
Answer link
महाराष्ट्रामध्ये अनेक मुरब्बी राजकारणी होऊन गेले, ज्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपल्या कामाचा आणि विचारांचा ठसा उमटवला. त्यापैकी काही प्रमुख नावांचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे:
- यशवंतराव चव्हाण: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि कुशल प्रशासक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
- वसंतदादा पाटील: लोकप्रिय मुख्यमंत्री आणि सहकार चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
- शरद पवार: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव. ते अनेक वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत आणि केंद्र सरकारमध्ये त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- बाळासाहेब ठाकरे: शिवसेना पक्षाचे संस्थापक आणि प्रभावी वक्ते म्हणून ते ओळखले जातात.
- अटल बिहारी वाजपेयी: भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) ज्येष्ठ नेते. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
या व्यतिरिक्त, अनेक नेते आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.