2 उत्तरे
2 answers

इंटरनेट: www ची सुरुवात केव्हा झाली?

4
✍🏻  _*गोष्ट तुमचं जगणं बदलणाऱ्या WWWच्या जन्मदात्याची!*_

🔰📶 *MAHA DIGI । TECHNOLOGY*

जगभरात संवादाचे विश्‍व ‘वर्ल्ड वाइड वेब’ या तीन शब्दांनी पूर्ण बदलून टाकलं. संवादाचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणून आज वर्ल्ड वाइड वेबकडे (WWW) पाहिले जाते. टीम बर्नर्स-ली या अवलिया संशोधकाने त्याचा शोध १९८९ मध्ये लावला, त्याचा आज (८ जून) हा जन्मदिवस, तर १ ऑगस्ट हा शोधाचा दिवस वर्ल्ड वाइक वेब दिवस म्हणून साजरा केला जातो.

👉🏻 *अशी झाली इंटरनेटची सुरवात* :

इंटरनेट युगाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने १९६९ साली झाली. त्यावेळी सुरवात ‘अर्पानेट’ अशा जाळ्याची कल्पना समोर आली होती. त्याचवेळी ‘युनिक्‍स’ सारख्या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमला ही सुरवात झाली. त्यानंतर १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या ‘रे टॉमलिन्सन’ यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला. या @ चिन्हामुळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या गेल्या.

🐣 *वर्ल्ड वाइड वेबचा जन्म* :
स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथील ‘सर्न’ प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांशी हायपरलिंक्‍सद्वारे संपर्क साधण्याच्या उद्देशाने टीम बर्नर्स-ली यांनी सुरवात केली. टीम यांनी केलेल्या प्रयोगाची प्रचंड मोठी आवृत्ती म्हणजेच आजचे वर्ल्ड वाइड वेब (WWW). वर्ल्ड वाइड वेब या तीन अक्षरांनी पुढील पिढ्यांचे आयुष्य आश्‍चर्यकारकरीत्या बदलून टाकले. तेव्हापासून आतापर्यंत या संकल्पनेच्या माध्यामातून अनेक इंटरनेटचे प्रकार तयार झाले आहेत. यात सध्या ई-मेल, फेसबुक, इन्सटाग्राम, व्हॉट्‌सऍप, यू-ट्यूब, गुगल यांचा सर्वाधिक वापर होताना दिसून येत आहे.

🌐 *वेबचा विस्तार* :
वेबचा विस्तार होत गेला आणि वेबने हळूहळू सर्वच क्षेत्रे पादाक्रांत केली. टेक्‍स्टच्या आदानप्रदानापासून सुरू झालेल्या वेबच्या दुनियेत अनेक संकल्पनांचा पुढे समावेश होते गेला. एक प्रकारे आभासी जग निर्माण करण्यात वेब हे माध्यम यशस्वी झाले. या प्रतिसृष्टीचा आपण दररोजच्या जगण्यात अनेकदा अनुभव घेत असतो.

👨🏻‍🦰 *टीम बर्नर्स-ली यांच्याबद्दल* :
टीम यांचा जन्म इंग्लंडमध्ये ८ जून १९५५ या दिवशी झाला. त्यांचे आई व वडील गणितज्ज्ञ होते. त्यांचे उच्चशिक्षण क्विन्स कॉलेज, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झाले. युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्यांना त्यांच्या मित्राबरोबर हॅकिंग करताना पकडले गेले. त्यानंतर त्यांनी पदार्थविज्ञानामध्ये पदवी मिळवली. ‘सर्न’ या पदार्थविज्ञानातील प्रयोगशाळेत ते १८८४ मध्ये संशोधक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांच्याकडे संशोधनातील सूचना एका संगणकावरून दुसऱ्यावर कॉपी करणे, हे होते. त्यावेळी त्यांनी सर्व सूचना एकाचवेळी सर्वच संगणकांवर दिसतील अशी व्यवस्था निर्माण करण्याचे ठरवले. त्यातूनच टीम यांनी बेव तंत्रज्ञानाचा शोध लावला व त्यांनी पहिले वेब पेज ‘सर्न’ मध्येच विकसित केले. मात्र, टीम यांनी विकसित केलेल्या या तंत्रावर ‘सर्न’चा कॉपीराइट होता. ली यांच्या सांगण्यावरून १९९३ मध्ये हे संशोधन ‘सर्न’कडून मुक्त करण्यात आले. ते आता जगभरात मोफत आणि मुक्त स्वरुपात उपलब्ध आहे.

📍 टीम अमेरिकेमध्ये स्थायिक झाले व त्यांनी मेसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये ‘वर्ल्ड वाइड वेब’ संघाची स्थापना केली. टीम यांना २००१ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले, तर २००४मध्ये ‘नाइटहूड’ हा किताब देण्यात आला. ब्रिटनने त्यांना २००७मध्ये ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा सर्वोच्च बहुमान दिला, तर ‘टाइम’ या नियतकालिकाने २०व्या शतकातील १०० महान संशोधकांमध्ये टीम बर्नर्स ली यांचा समावेश केला.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 8/6/2020
कर्म · 569245
0

वर्ल्ड वाइड वेब (www) चा शोध मार्च 1989 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी लावला.

त्यांनी 'इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट: अ प्रपोजल' नावाचा एक प्रस्ताव सादर केला, ज्यामध्ये हायपरटेक्स्ट प्रणाली वापरून माहिती सामायिक करण्याची कल्पना मांडली होती. याच प्रस्तावामुळे www चा विकास झाला.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1580

Related Questions

तुम्ही इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करा व लिहा?
शिक्षकांच्या मदतीने गटात हॉटपॉट्स कसे तयार करायचे?
इंटरनेट सेवा आणि त्याचे रेडिएशन हे सगळ्यात मोठे प्रदूषण आहे, असे आपल्याला वाटत असेल तर, ते का?
मी माझ्या मुलींसाठी कॉम्प्युटर घेतला आहे. मला कॉम्प्युटरसाठी वाय-फायची जोडणी करायची आहे. मला वाय-फाय जोडणीसाठी माहिती द्यावी.
इंटरनेटची रचना १९८० साली सर्वप्रथम कोणत्या देशाने मांडली?
जागतिक स्वीकार्यता (Universal Acceptance) म्हणजे काय?
इंटरनेटचे उपयोग लिहा?