2 उत्तरे
2
answers
इंटरनेटचे उपयोग लिहा?
0
Answer link
आज प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा उपयोग केला जातो.
असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे इंटरनेट वापरले जात नाही.
माहितीची देवान घेवाण करणे
आज संदेश पाठवणे, लवकरात लवकर माहिती पोहचवणे किंवा माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो.
तसेच इंटरनेटचा वापर करून आज आपण कोणतीही माहिती एका क्षणात मिळवू शकतो. कोणत्याही विषयाची माहिती, त्याचे सविस्तर उपयोग, तोटे, औषधे, बस, ट्रेनचे वेळापत्रक या सगळ्याची माहिती इंटरनेटद्वारे आपल्याला एका क्षणात मिळू शकते.
वैद्यकीय क्षेत्र
वैद्यकीय क्षेत्रात इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. एखाद्या आजारावरील ज्ञान प्राप्त करण्यासाठी, त्यावरील इतर डॉक्टर्सचे रिसर्च पाहण्यासाठी, तसेच रूग्णाची माहीती नोंद करून ठेवण्यासाठी इंटरनेटचा उपयोग होतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये बसून डॉक्टर परदेशातील तज्ञ व्यक्तींशी सल्ला मसलत करू शकतात. एखाद्या आजाराचे अचूक निदान करण्यासाठी देखील इंटरनेटचा फायदा होतो
शिक्षण क्षेत्र
इतर क्षेत्राप्रमाणे आज शिक्षण क्षेत्रात देखील इंटरनेटचा अधिक प्रमाणात उपयोग केला जात आहे. ऑनलाईन परीक्षा, क्लासेस यासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. तसेच दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये देखील याचा वापर वाढलेला दिसून येतो. विविध शाखेतील कोर्स करण्यासाठी, प्रशिक्षित शिक्षकांकडून शिक्षण घेण्यासाठी देखील इंटरनेटचा वापर दिसून येतो.
0
Answer link
इंटरनेटचे अनेक उपयोग आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- संपर्क (Communication): इंटरनेटमुळे जगभरातील लोकांशी संपर्क साधणे सोपे झाले आहे. ईमेल, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधता येतो.
- माहिती (Information): इंटरनेट ज्ञानाचा अथांग सागर आहे. कोणतीही माहिती काही क्षणात उपलब्ध होते.
- शिक्षण (Education): ऑनलाईन शिक्षण, शैक्षणिक साहित्य,tutorials आणि कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामुळे शिक्षण घेणे सोपे झाले आहे.
- मनोरंजन (Entertainment): चित्रपट, संगीत, गेम्स आणि इतर मनोरंजक गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
- व्यवसाय (Business): इंटरनेटमुळे व्यवसाय करणे सोपे झाले आहे. ऑनलाइन स्टोअर्स, जाहिरात आणि मार्केटिंग करता येते.
- बँकिंग (Banking): इंटरनेट बँकिंगमुळे घरी बसून आर्थिक व्यवहार करता येतात.
- खरेदी (Shopping): ऑनलाइन शॉपिंगमुळे घरबसल्या वस्तू खरेदी करता येतात.
- नोकरी शोधणे (Job search): इंटरनेटवर अनेक जॉब पोर्टल्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने नोकरी शोधणे सोपे होते.
अधिक माहितीसाठी: