कायदा
                
                
                    काश्मीर
                
                
                    आतंकवाद
                
                
                    युद्ध
                
                
                    गुन्हेगारी
                
            
            काश्मीरमध्ये नेहमी पाकिस्तानी अतिरेकी मारले जातात. त्यांच्या मृतदेहांचे काय केले जाते?
2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        काश्मीरमध्ये नेहमी पाकिस्तानी अतिरेकी मारले जातात. त्यांच्या मृतदेहांचे काय केले जाते?
            3
        
        
            Answer link
        
        बहुतांशी काश्मीरमध्ये मारले गेलेले आतंकवादी हे पाकिस्तानवरून आलेले असतात. पाकिस्तान हे कधीच मान्य करत नाही. बरेचदा आतंकवाद्यांकडे आयएसआयचे आयकार्ड सापडते. तसेच काहींकडे पाकिस्तानी असल्याचे पुरावे देखील सापडतात. कितीही पुरावे दिले तरी आतंकवादी पाकिस्तानमधून आलेले आहेत असे मान्य न केल्यामुळे ते मृतदेह भारतातच राहतात. नंतर जेव्हा त्याची विल्हेवाट लावायची वेळ येते तेव्हा काश्मीर पोलीस त्या मृतदेहांचे दफन करते. शेवटी ही जबाबदारी पोलिसांची असते, त्यामुळे अशा मृतदेहांचे धार्मिक विधीनुसार दफन केले जाते.