छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या हातावर कशी तुरी दिली?
छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या हातावर कशी तुरी दिली?
शिवाजी महाराजांनी मुंबईच्या ईंग्रजांची इतकी मस्त फसवणूक केलीये! खूप कमी जणांना माहित असलेली ही गोष्ट ह्या लेखात दिलेली आहे. “English Records on Shivaji”मधल्या पत्रांमधून आपल्याला ह्या प्रसंगाचा उल्लेख मिळतो.महाराजांनी राज्याभिषेकानंतर मुंबईच्या ईंग्रजांकडून तांबं विकत घेतलं होतं, नाणी पाडायला किंवा भांडी करायला वगैरे घेतलं असेल. महाराजांनी ईंग्रजांना सांगितलं की आता इथे म्हणजे रायगडावर इतके रोख पैसे नाहीत. तुम्हाला मी हुंडी (Bill of Exchange)देतो. तुम्ही ही हुंडी घेऊन गोवळकोंड्याला जा, तिथल्या कुतुबशाहकडून आम्हाला जी खंडणी मिळते त्यातून तुम्हाला हवी असलेली रक्कम तुम्ही तिथे असलेल्या आमच्या माणसाकडून मागून घ्या.
ईंग्रजांचा “कुरिअर” गोवळकोंड्याला जात नसे म्हणून त्यांनी तो सुरतेला पाठवला. मग सुरतेचा कुरिअर गेला गोवळकोंड्याला. तिथे खरोखर महाराजांचा माणूस होता. तिथल्या महाराजांच्या माणसाने सांगितलं कि ह्या हुंडीसाठी पैसे द्यायची authority आमच्याकडे नाही. ज्यांच्याकडे आहे ते प्रल्हाद निराजी गेलेत रायगडावर तर आता तुम्ही एकतर रायगडावर तरी जा नाहीतर ते येईपर्यंत थांबा इथेच.तो कुरिअर सुरतेला माघारी आला आणि तिथल्या ईंग्रजांनी त्याच्या रिपोर्टवर शेरेबाजी केली आणि ते कागदपत्र मुंबईला पाठवले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, ते कागद माघारी आल्यावर ईंग्रजांना कळून चुकलं होतं की आता महाराज आपल्याला भारतभ्रमण करवणार! ईंग्रजांनी ठरवलं की आता रायगडावरच जायचं म्हणून त्यांनी त्यांच्या दुभाष्या असलेल्या नारायण शेणवी याला रायगडावर पाठवलं. नारायण शेणवी जेव्हा रायगडवाडीला आला तेव्हा त्याला कळलं की महाराज गडावर नाहीत म्हणून, चौकशी केल्यावर त्याला कळलं की महाराज कधी येतील हे काय नक्की कुणालाच माहित नाही. म्हणूनत्याने गडावर असलेल्या स्वराज्याच्या पंतप्रधान असलेल्या मोरोपंत पिंगळे ह्यांना भेटायचं ठरवलं.मोरोपंतांनी त्याला चांगलं महिनाभर खालीच थांबवून ठेवलं. खूपकाम आहे अशी सबब दिली त्याला. मग एका महिन्याने त्याला रायगडावर बोलावलं.मग ह्या नारायण शेणव्याने सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाला की मला प्रल्हाद निराजींना भेटायचंय म्हणून, मोरोपंत म्हणाले “बरोबर आहे तुमचं! निराजी एका बैठकीसाठी इथे आले होते…. पण….. आता ते परत गेलेत.” शेणवी म्हणाला, “आम्ही पुन्हा पुन्हा गोवळकोंड्याला जाणार नाही, तुम्ही मला इथेच पैसे द्या आणि मोकळं करा.” मोरोपंत म्हणाले, “अहो,रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला सांगितलं ना!” शेवटी थोड्या वादानंतर मोरोपंत म्हणाले की, “आम्हाला ईंग्रजांशी व्यापारी संबंध ठेवायचे आहेत म्हणून स्वराज्याचा पंतप्रधान म्हणून मी तुम्हाला एक उपाय सुचवतो – अलिबागला आमचे जे कोठार आहेत तिथे तिथली प्रजा जो आम्हालाकर स्वरूपात नारळ, सुपारी, भात वगैरे देते, तुम्हाला हव्या असलेल्या पैशाइतकी ती पोती तुम्ही तिथून उचला.”आता ह्या शेणव्याला असं स्वीकारण्याचा अधिकार नाही. मोरोपंत म्हणाले सावकाश मुंबईला जा आणि तुमच्या वरिष्ठांना विचारून या. तो परत मुंबईला आला. त्याला बघताच तिथल्या अधिकाऱ्याला खात्री झाली की ह्याच्या हाती काहीही लागलेलं नाही.शेणवी त्या अधिकाऱ्याला म्हणाला कि अहो महाराज नाहीचेत तिथे, आणि पिंगळे म्हणतायेत की भात, सुपारी वगैरे घेऊन जा. त्यावर तो ईंग्रज अधिकारी म्हणाला अरे हे देतो देतोम्हणतील आणि ऐनवेळी जनतेला सांगतील की अलिबागला तुम्ही पोती टाकू नका म्हणून! तू एक काम कर आता महाराज रायगडावर पोचलेत असं कळलंय तर तू तिथे जा आणि फक्त महाराजांना भेट.तुझ्यासोबत ईंग्रज अधिकारीही घेऊन जा असं तो म्हणाला. तर शेणवी आणि फ्रांसिस मौलीव्हेरर नावाचा एक ईंग्रज हे दोघे रायगडावर जायला निघाले.
महाराज नुकतेच रायगडावर आले होते.कामात होते म्हणून यांना महिना दीडमहिना खालीच थांबवून ठेवलं. वरबोलावल्यावर महाराजांनी त्यांनाप्रश्न ला की काय नक्की ठरलय तुमचं ते एकदाचं सांगून टाका. शेणव्याने पैसे मागितल्यावर परत महाराज म्हणाले ,“अहो आमच्याकडे रोख पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला गोवळकोंड्याला पाठवलं ना….. मी एक उपाय सुचवतो…. बरं, एक काम करा तेवढ्या किमतीची चांदी किंवा सोनं तुम्हाला देऊन टाकतो.”
“उपाय” म्हटल्यावर शेणव्याच्या पोटात गोळा आला. आता शेणव्याकडे ऑथॉरिटी नाही म्हणून तो परत मुंबईला आला. त्याकाळचा प्रवास हाघोडा, उंट वगैरे यांवर करावा लागत असे. महाराज त्यांना कसे फिरवतायेत बघा. त्या शेणव्याला बघताच अधिकाऱ्याला कळलं की ह्याहीवेळी त्याच्या हाताला काही लागलेलं नाही. ह्या काळात तो मौलीव्हेरर रायगडावर थांबला आणि काही जमतंय का याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला कसलं जमतंय. पंधरा दिवसांनी तो देखील परत आला.मौलीव्हेररने त्याच्या “tour report ” मध्ये लिहून ठेवलय – “I got nothing but hollow promises” (मला पोकळ आश्वासनांखेरीज काहीही मिळालं नाही)! तो ईंग्रज अधिकारी शेवटी वैतागला आणि शेणवी आणि मौलीव्हेररला म्हणाला की आता जे मिळतंय ते घेऊन या नाहीतर नंतर काहीच हाती लागणार नाही.नारायण शेणवी परत रायगडावर जायला निघाला. परत त्याला महाराजांनी महिनाभर पायथ्याशी थांबवून ठेवलं. वर आल्यावर महाराज चढ्या स्वरात म्हणाले – “काही ठरतंय का तुमचं?” शेणवी म्हणाला की काहीही द्या महाराज …. काहीही द्या!महाराज एकदम शांतपणे म्हणाले की,“तसं नाही, मला कळलं पाहिजे नक्की सोनं पाहिजे की चांदी पाहिजे ते.”शेणव्याच्या पोटात पुन्हा गोळा आला पण तो म्हणाला महाराज काहीही द्या. महाराज मोरोपंतांना म्हणाले की ह्याला जामदारखान्यात घेऊन जा आणि चांदी देऊन टाका आणि हे सगळं हुंडी वगैर प्रकरण मिटलं असं लिहून घ्या. आता मोरोपंतांनी शेवटची कामगिरी बजावली. ते म्हणाले “इथे रायगडावर चांदी २८ रुपये प्रति शेर आहे बरं का!” शेणवी चमकलाच! तो म्हणाला की “अहो सगळीकडे चांदी २३ रुपये प्रति शेर आहे.” आता हा भाव जाणून घेण्यासाठी परत मुंबईला जायची हिम्मत शेणव्यात नव्हती. त्याने ती चांदी घेतली.तो मुंबईला आल्यावर त्या ईंग्रज अधिकाऱ्याने ईस्ट इंडिया कंपनीला जो रिपोर्ट लिहिला त्यात त्याने लिहिलंय – सुमारे दीड वर्षचाललेल्या ह्या प्रकरणात शिवाजीने २३ रुपये प्रति शेर असलेली चांदी २८ रुपये प्रति शेर विकून हे प्रकरण निकालात काढलं. ह्या सगळ्या व्यवहारात आपल्याला साडे बावीस टक्के तोटा झालेला आहे.महाराजांच्या आणि त्यांच्यासाठीकाम करणाऱ्या स्वराज्याच्या पंतप्रधानाच्या गनिमी काव्याची ही खूप कमी जणांना माहित असलेली गोष्ट. महाराज किती मुत्सद्दी होते हे या गोष्टीवरून लक्षात येतं!===(दिवंगत ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांच्या भाषणातून)
-
सुरतेची लूट (1664):
शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर हल्ला केला आणि ते शहर लुटले. त्यावेळी इंग्रजांची सुरत मध्ये एक मोठी व्यापारी वखार होती. महाराजांनी इंग्रजांना धमकी दिली की जर त्यांनी खंडणी भरली नाही, तर त्यांची वखार उद्ध्वस्त करतील. त्यामुळे इंग्रजांनी खंडणी भरली आणि महाराजांनी त्यांना अभयदान दिले. या घटनेमुळे महाराजांनी इंग्रजांना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.
Britannica - Sack of Surat -
पुरंदरचा तह (1665):
पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना आपले काही किल्ले मुघलांना द्यावे लागले, ज्यात इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाजवळील किल्ले होते. या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी इंग्रजांशी संबंध सुधारले आणि त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा मिळवण्याचा प्रयत्न केला.
Live History India - The Treaty of Purandar -
शिवाजी महाराजांची आग्रा भेट (1666):
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा येथे भेटीसाठी बोलावले, परंतु दरबारातील अपमानास्पद वागणुकीमुळे महाराज नाराज झाले आणि त्यांनी तेथून सुटका करून घेतली. या घटनेनंतर इंग्रजांनी महाराजांना मदत करण्याची तयारी दर्शवली, कारण त्यांना मुघलांविरुद्ध एक मजबूत মিত্র हवा होता.
Shivaji Maharaj - Escape from Agra -
इंग्रजांविरुद्ध संघर्ष:
1670 मध्ये, शिवाजी महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आणि त्यांच्या ताब्यातील काही प्रदेश जिंकून घेतले. या संघर्षात महाराजांनी इंग्रजांना नमवले आणि त्यांना तह करण्यास भाग पाडले.