3 उत्तरे
3 answers

पॉडकास्ट म्हणजे काय?

3
*_पॉडकास्ट माध्यमाचा ऑनलाइन शिक्षणासाठी केला जाणार उपयोग; जाणून घ्या 🤔पॉडकास्ट म्हणजे काय?_*

*🔰📶महा डिजी | तंत्रज्ञान*

अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याची माहिती दिली असून हे ऑनलाइन शिक्षण अनेक वेगवेगळ्या माध्यमातून दिले जाणार आहे. यामध्ये टीव्ही, इंटरनेट, रेडिओ आणि पॉडकास्ट या माध्यमांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये पॉडकास्ट हे नाव कदाचित काहींसाठी नवे असणार आहे. यामुळे आज आपण पॉडकास्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे.


🎙️ *पॉडकास्ट म्हणजे काय?*
पॉडकास्ट हे रेडिओ सारखेच ऑडिओ स्वरूपातील माध्यम आहे. पण हे माध्यम डिजिटली म्हणजेच ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहे. पॉडकास्ट ऐकण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर अनेक ॲप उपलब्ध आहे. या ॲपचा उपयोग करून आपण अनेक ऑनलाइन पॉडकास्ट ऐकू शकतात.
या पॉडकास्ट वर विविध कार्यक्रम सादर केले जातात. यामध्ये बातम्या, मुलाखती, तंत्रज्ञान, व्यवसाय, विविध विषयांवर चर्चा, शिक्षण, ऑडिओ वेब सिरीज, यांसारखी बरेच प्रकार यामध्ये उपलब्ध आहे.

😇 *पॉडकास्ट चे फायदे*
पॉडकास्ट चे अनेक फायदे आहे. पॉडकास्ट ऑडिओ स्वरूपात असल्याने तो कुठेही कधीही ऐकता  येतो. एखाद्या कामात असताना, प्रवास करत असताना,किंवा जिम मध्ये असताना देखील आपण ऐकू शकतो. त्यातच रात्री झोपण्याच्या वेळी अनेकांना व्हिडिओ बघण्याची देखील सवय असते. व्हिडीओ बघण्यापेक्षा झोपण्याच्या वेळी पॉडकास्ट  ऐकणे अधिक चांगले.

▪ *विविध पॉडकास्ट ॲप*

1) Google podcast

2) Spotify

3) Castbox.FM

4) Headfone

5) Stitcher

👉🏻 *टीप*
वर दिलेल्या ॲप व्यतिरिक्त आपण गुगल वर देखील सर्च करू शकतात. गूगलवर सर्च केल्यानंतर अनेक ऑडिओ पॉडकास्ट  आपल्याला मिळतात.  पॉडकास्ट अनेक वेबसाईट गुगल वर उपलब्ध आहेत.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 17/5/2020
कर्म · 569245
3
पॉडकास्ट हा इतर देशामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेला ऑडिओ प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्म चा खूप ऑडिओ ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पॉडकास्ट मध्ये स्वतः च्या आवाजात ऑडिओ रेकॉर्ड करून विविध अँप्स किंवा पॉडकास्ट वेबसाईटसामायिक करतात तसेच इंटरनेट वर प्रसारित करतात.

ब्लॉग मध्ये आपण विविध आर्टिकल च्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती तसेच नवनवीन टेकनॉलॉजि इत्यादी प्रकारची माहिती ब्लॉग च्या स्वरूपात इंटरनेट वर मांडतो.
   
           

तर पॉडकास्ट मध्ये आपल्याला जी माहिती इंटरनेट वर सामायिक करायची असते त्या माहिती संदर्भात आपल्या आवाजामध्ये एक ऑडिओ रेकॉर्ड करायचा असतो आणि तो इंटरनेट वर विविध पॉडकास्ट अँप्स किंवा वेबसाईट मध्ये प्रसारित करावा लागतो.

तसेच आमच्या वेबसाईट मराठी स्पिरिट मध्ये आम्ही वाचकांना उत्कृष्ट दर्जाची आणि इंटरेस्टिंग माहिती माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करू.

पॉडकास्ट नक्की काय आहे?
खूप वेळा प्रश्न येतो कि पॉडकास्ट नक्की काय आहे? तर सोप्या भाषेत म्हणायचे झाल्यास पॉडकास्ट एक प्रकारचा रेडिओ असतो. ज्यामध्ये विविध प्रकारचे ऑडिओ सामायिक केलेले असतात. 
ज्या प्रमाणे युट्युब हा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे त्या प्रमाणेच पॉडकास्ट हा एक ऑडिओ प्लॅटफॉर्म आहे.

पॉडकास्ट चे मुख्य तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे आहेत.

  1. व्यक्तिगत पॉडकास्ट

Personal Podcast या मध्ये केवळ एकच व्यक्ती कार्यरत असते म्हणजेच एकाच व्यक्ती द्वारे विविध प्रकारचे ऑडिओ तयार करून या ऑडिओ ला विविध पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर अपलोड केल्या जाते. या ऑडिओ मध्ये विविध विषयांबद्दल माहिती तसेच बातम्या आणि त्या व्यक्ती चे विचार प्रकट केले जातात.

  2. संभाषण पर | दोन व्यक्तीचे पॉडकास्ट

या पॉडकास्ट मध्ये दोन व्यक्तींमध्ये विविध विषयांवर तसेच घटनांवर संवाद साधल्या जातो. या मध्ये दोन व्यक्ती मध्ये संभाषण सुरु असताना एक व्यक्ती पॉसिटीव्ह बोलत असते तर दुसरी व्यक्ती निगेटिव्ह बोलत असते. अशा प्रकारे दोन व्यक्ती मधील ऑडिओ रेकॉर्ड करून ते पॉडकास्ट मध्ये सामायिक केले जातात.

  3. इंटरव्हिव पॉडकास्ट

Interview Podcast सर्वांच्या परिचयाचा असेल कारण इंटरव्हिव कश्या प्रकारे घेतल्या जातो याची कल्पना जवळजवळ सर्वांनाच आहे. या मध्ये एक व्यक्ती प्रश्न विचारत असतो आणि दुसरी व्यक्ती त्या प्रश्नांची उत्तरे देत असतो.

पॉडकास्ट कसे तयार करावे?

पॉडकास्ट तयार करण्यासाठी सर्वात पहिले तुमच्या जवळ मोबाइल किंवा लॅपटॉप असणे खूप गरजेचे आहे आणि दुसरे म्हणजे इंटरनेट कनेक्शन सुद्धा आवश्यक असते.

मोबाईल किंवा लॅपटॉप बरोबरच एक माईक असायला हवा माईक नसेल तरी सुद्धा तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड करू शकता. पण माईक असेल तर तुमच्या ऑडिओ चा आवाज चांगला येईल.

मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये माईक घेऊन स्वतः च्या आवाजामध्ये चांगल्या प्रकारे ऑडिओ रेकॉर्ड करावा. आणि त्या ऑडिओ ला विविध पॉडकास्ट अँप्स किंवा वेबसाईट वर अपलोड करावे.

अश्या पद्धतीने तुमची ऑडिओ सामग्री म्हणजेच पॉडकास्ट तयार होईल.

टॉप पॉडकास्टींग वेबसाईट
  • Podbean
  • BuzzSprout
  • SoundCloud
  • Blubrry
  • Smart Podcast Player
  • Transistor
  • Google Podcasts
  • RadioPublic
या वेबसाईट च्या माध्यमातून तुम्ही विविध प्रकारचे पॉडकास्ट ऐकू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट तयार करायचे असतील तर तुम्ही तयार करू शकता.

अश्याच प्रकारची पॉडकास्ट बद्दल आणखी माहिती वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग वर क्लिक करा.

उत्तर लिहिले · 27/4/2021
कर्म · 2195
0

पॉडकास्ट (Podcast) म्हणजे काय?

पॉडकास्ट म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेला ऑडिओ कार्यक्रम. हे एक प्रकारचे डिजिटल माध्यम आहे, जे विशिष्ट विषयावर आधारित असते. पॉडकास्टमध्ये संभाषणे, मुलाखती, कथा किंवा माहितीपूर्ण चर्चा समाविष्ट असू शकतात.

पॉडकास्टची वैशिष्ट्ये:

  • ऑडिओ स्वरूप: पॉडकास्ट केवळ ऑडिओ स्वरूपात असतो, ज्यामुळे तो ऐकणे सोपे होते.
  • विविध विषय: पॉडकास्टमध्ये कला, क्रीडा, तंत्रज्ञान, बातम्या, शिक्षण, मनोरंजन आणि इतर अनेक विषयांचा समावेश असतो.
  • एपिसोड्स: पॉडकास्ट मालिकेत विभागलेला असतो, ज्याला एपिसोड म्हणतात. प्रत्येक एपिसोड एका विशिष्ट विषयावर आधारित असतो.
  • डाउनलोड आणि स्ट्रीमिंग: पॉडकास्ट एपिसोड डाउनलोड करून ऑफलाइन ऐकता येतात किंवा थेट स्ट्रीमिंगद्वारे ऐकता येतात.
  • सदस्यता: वापरकर्ते त्यांच्या आवडत्या पॉडकास्टची सदस्यता घेऊ शकतात, ज्यामुळे नवीन एपिसोड उपलब्ध झाल्यावर त्यांना सूचना मिळते.

पॉडकास्टचे फायदे:

  • सोपे माध्यम: हे वापरण्यास सोपे आहे आणि कधीही, कोठेही ऐकता येते.
  • वेळेचा सदुपयोग: प्रवास करताना, व्यायाम करताना किंवा इतर कामे करताना पॉडकास्ट ऐकणे वेळेचा चांगला उपयोग करण्यास मदत करते.
  • ज्ञान आणि मनोरंजन: पॉडकास्टमुळे नवनवीन माहिती मिळते आणि ते मनोरंजक देखील असतात.

पॉडकास्ट कसा ऐकायचा:

  • पॉडकास्ट ॲप्स: ॲपल पॉडकास्ट (Apple Podcasts), स्पॉटिफाय (Spotify), गुगल पॉडकास्ट (Google Podcasts) यांसारख्या ॲप्सवर पॉडकास्ट उपलब्ध असतात.
  • वेबसाइट्स: अनेक पॉडकास्ट निर्माते त्यांच्या वेबसाइटवर एपिसोड्स उपलब्ध करतात.

पॉडकास्ट हे माहिती आणि मनोरंजनाचे एक उत्तम माध्यम आहे, जे आपल्या व्यस्त जीवनात ज्ञान मिळवण्याचा आणि आराम करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1240

Related Questions

podcast म्हणजे काय??