2 उत्तरे
2
answers
अंदमान आणि निकोबारच्या कोणत्या बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव दिले आहे?
1
Answer link
देशामधील काही शहरांचे नामांतरण झाल्यानंतर आता सरकारने अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावे बदलण्याची तयारी सुरु केली आहे. सरकारने नुकत्याच जारी केलेल्या जागांच्या नामांतरणाच्या यादीमध्ये या बेटांचा समावेश आहे. बेट समुहातील रोज आइसलॅण्ड, नील आइसलॅण्ड आणि हेवलॉक आइसलॅण्ड या तीन बेटांची नावे बदलून ती नेताजी सुभाषचंद्र बोस आइसलॅण्ड, शहीद द्विप आणि स्वराज द्विप असे नामकरण करण्यात येणार असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेयर येथे भारतीय तिरंगा फडकावल्याच्या अमृतमोहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे नामांतरण करण्याचा सरकारचा विचार आहे. बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेयर येथे भारताचा झेंडा फडकवला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडविरुद्ध लढणाऱ्या जपानने अंदमान निकोबार बेटांचा परिसर ताब्यात घेतल्यानंतर नेताजींची हे ध्वजारोहण केले होते. त्यावेळेस त्यांनी अंदमान निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज द्विप अशी नावं द्यावीत अशी मागणी केल्याचे सांगितले जाते.
संदर्भ:-https://www.loksatta.com/desh-videsh-news/three-islands-in-andaman-and-nicobar-will-be-renamed-as-netaji-subhash-chandra-bose-island-1811530/

0
Answer link
अंदमान आणि निकोबारच्या रॉस आयलंड (Ross Island) या बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस बेट (Netaji Subhas Chandra Bose Island) असे नाव देण्यात आले आहे.
हे नाव 30 डिसेंबर 2018 रोजी देण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये याच बेटावर भारताचा तिरंगा झेंडा फडकवला होता, त्या घटनेच्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले.
अधिक माहितीसाठी: