सरकारी योजना मोबाईल अँप्स ॲप सुरक्षा तंत्रज्ञान

सगळ्या सरकारी योजना जाणून घेण्यासाठी उमंग हे ॲप सुरक्षित ॲप आहे का?

2 उत्तरे
2 answers

सगळ्या सरकारी योजना जाणून घेण्यासाठी उमंग हे ॲप सुरक्षित ॲप आहे का?

6
पुर्ण नाव – युनिफाइड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यु-एज गव्हर्नन्स ॲप

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मोबाईलवरून घेता यावा म्हणून उमंग ॲप सुरू केले आहे. हया ॲपद्वारे शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सेवा व योजना जसे. गॅस बुकिंग, टॅक्स् भरणे, पॅन कार्ड काढणे, नॅशनल पेंशन योजना, किसान सुविधा (कृषी विभाग), फार्मा सही दाम (औषधी विषयी)  इ. 400 योजनांचा महिती व लाभ घेता येईल. तसेच 4 राज्यातील योजनांचाही यात समावेश आहे. केंद्र सरकारने घोषित केले की हया ॲप मध्ये यापेक्षा जास्त योजनांची माहिती येणाऱ्या काळात टाकण्यात येईल.

हे ॲप केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स डिव्हीजन (NAGD) यांनी विकसीत केले आहे. हे ॲप इंग्रजी, हिंदी यासह 11 प्रादेशिक भाषेमध्ये वापरता येते.

उमंग ॲपद्वारे सर्व भारतीयांना एक मंच उपलब्ध करुन देने जेथे केंद्र राज्य, सरकारी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरी सुविधा केंद्रे, ई-सेवा केंद्र यामध्ये प्राप्त करता येतात त्यासर्व सेवांचा समावेश करण्यात येईल ज्याद्वारे नागरीक एकापेक्षा जास्त सेवांचा लाभ घेवू शकतील.

हे ॲप एंड्रॉयड (Android )4.4 व त्यावरील एड्रॉयड व्हर्जन व आय ओ एस (ISO) 8.0 व हयानंतरच्या पुढील व्हर्जनला सपोर्ट करतो. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.
उत्तर लिहिले · 24/4/2020
कर्म · 210095
0

उमंग ॲप (UMANG App) हे सरकारी योजनांसाठी एक सुरक्षित ॲप आहे. हे ॲप भारत सरकारच्या Ministry of Electronics and Information Technology (MeitY) आणि National e-Governance Division (NeGD) यांनी विकसित केले आहे.

सुरक्षितता वैशिष्ट्ये:

  • अधिकृत ॲप: उमंग ॲप हे सरकारी ॲप असल्यामुळे ते सुरक्षित आहे.
  • डेटा सुरक्षा: वापरकर्त्यांच्या डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
  • गोपनीयता धोरण: ॲपचे गोपनीयता धोरण (Privacy Policy) स्पष्टपणे नमूद केलेले आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या डेटाच्या वापराविषयी माहिती देते.

तथापि, कोणताही ॲप वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:

  • ॲप नेहमी अधिकृत स्त्रोतावरूनच डाउनलोड करा.
  • ॲपला आवश्यक परवानग्या (permissions) काळजीपूर्वक तपासा.
  • ॲप नियमितपणे अपडेट करा.

उमंग ॲप सरकारी योजना आणि सेवांसाठी एक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय आहे.

अधिक माहितीसाठी, आपण उमंग ॲपच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: UMANG

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5570

Related Questions

फोटो कसा टाकू?
तुम्हाला फोटो कसा टाकू?
कीबोर्डला किती बटणे आहेत?
गुगल पे (Google Pay) चा UPI पासवर्ड कसा बदलायचा?
फोन पे चा पासवर्ड विसरला आहे?
Whats app Chat lock कसे करावे?
कॉम्प्युटर चालू करताना लॉगिन पासवर्ड कसा सेट करावा?