Topic icon

ॲप सुरक्षा

0
ॲपचा पासवर्ड विसरल्यास, तो परत मिळवण्यासाठी किंवा रीसेट (Reset) करण्यासाठी खालील उपाय वापरले जाऊ शकतात:

1. 'पासवर्ड विसरला?' (Forgot Password?) पर्यायाचा वापर:

  • ॲपमध्ये 'Forgot Password?' किंवा 'पासवर्ड विसरला?' असा पर्याय असतो. त्यावर क्लिक करा.
  • तुमचा ईमेल आयडी किंवा यूजरनेम (Username) टाका.
  • तुम्हाला ईमेलवर पासवर्ड रीसेट करण्याची लिंक (Link) येईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नवीन पासवर्ड सेट करू शकता.

2. सुरक्षा प्रश्नांची उत्तरे (Security Questions):

  • काही ॲप्स (Apps) सुरक्षा प्रश्न विचारतात, जसे की 'तुमचे आवडते शहर कोणते आहे?' किंवा 'तुमच्या पहिल्या पाळीव प्राण्याचे नाव काय होते?'
  • तुम्ही हे प्रश्न सेट केले असल्यास, त्यांची उत्तरे देऊन तुम्ही तुमचा पासवर्ड रीसेट करू शकता.

3. नोंदणीकृत ईमेल किंवा फोन नंबर (Registered Email or Phone Number):

  • ॲपमध्ये तुम्ही तुमचा ईमेल आयडी (Email ID) किंवा फोन नंबर (Phone Number) रजिस्टर (Register) केला असेल, तर त्यावर तुम्हाला ओटीपी (OTP) किंवा रीसेट लिंक (Reset Link) मिळू शकते.

4. ग्राहक सेवा (Customer Service):

  • वरीलपैकी कोणताही पर्याय काम करत नसेल, तर ॲपच्या ग्राहक सेवा टीमशी संपर्क साधा.
  • त्यांना तुमची समस्या सांगा आणि पासवर्ड रीसेट (Reset) करण्यासाठी मदत मागा.

5. पासवर्ड व्यवस्थापक (Password Manager):

  • जर तुम्ही पासवर्ड व्यवस्थापक वापरत असाल, तर त्यात तुमचा पासवर्ड सेव्ह (Save) केला असेल. तुम्ही तो तिथे शोधू शकता.

टीप: प्रत्येक ॲपची पासवर्ड रिकव्हरी (Password Recovery) प्रक्रिया वेगळी असू शकते, त्यामुळे ॲपच्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

उत्तर लिहिले · 8/8/2025
कर्म · 3640
0
व्हॉट्सॲप (WhatsApp) प्रोफाइल फोटो कोणी कॉपी करू नये यासाठीsetting खालीलप्रमाणे:
  • प्रायव्हसी सेटिंग्ज (Privacy Settings): व्हॉट्सॲपमध्ये प्रोफाइल फोटो कोणाला दिसावा हे निवडण्याचा पर्याय आहे. तुम्ही तुमचा प्रोफाइल फोटो फक्त तुमच्या कॉन्टॅक्ट्सना (contacts) दाखवू शकता, ज्यामुळे अनोळखी व्यक्ती तो पाहू शकणार नाही.

सेटिंग बदलण्याची प्रक्रिया:

  1. व्हॉट्सॲप उघडा.
  2. सेटिंग्जमध्ये जा (settings).
  3. अकाउंट (Account) > प्रायव्हसी (Privacy) वर क्लिक करा.
  4. प्रोफाइल फोटो (Profile Photo) वर टॅप करा आणि 'माय कॉन्टॅक्ट्स' (My Contacts) हा पर्याय निवडा.

या सेटिंगमुळे तुमचा प्रोफाइल फोटो फक्त तुमच्या फोनमध्ये असलेल्या नंबर असलेल्या लोकांनाच दिसेल.

उत्तर लिहिले · 6/8/2025
कर्म · 3640
2
अजिबात नाही. तुम्ही स्वतः चे स्टिकर बनवून मित्रांना शुभेच्छा देऊ शकता. १]स्टिकर कसे बनवायचे त्यासाठी वरती प्ले बटनवर क्लिक करा व जाणून घ्या स्वतःचे Whatsapp sticker कसे बनवायचे व असे sticker बनवून Whatsapp कसे add कराल?  तसेच २]how to remove background of any personal photos हा विडीओ नक्की बघा. अशीच आणखी टीप्स् व ट्रिक्स् जाणून घेण्यासाठी चॅनला सब्सक्राइब करा. जेणेकरून अशीच माहिती जाणून घेता येईल एका क्लिक वर सहजच.
उत्तर लिहिले · 7/9/2021
कर्म · 5250
6
पुर्ण नाव – युनिफाइड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यु-एज गव्हर्नन्स ॲप

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मोबाईलवरून घेता यावा म्हणून उमंग ॲप सुरू केले आहे. हया ॲपद्वारे शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सेवा व योजना जसे. गॅस बुकिंग, टॅक्स् भरणे, पॅन कार्ड काढणे, नॅशनल पेंशन योजना, किसान सुविधा (कृषी विभाग), फार्मा सही दाम (औषधी विषयी)  इ. 400 योजनांचा महिती व लाभ घेता येईल. तसेच 4 राज्यातील योजनांचाही यात समावेश आहे. केंद्र सरकारने घोषित केले की हया ॲप मध्ये यापेक्षा जास्त योजनांची माहिती येणाऱ्या काळात टाकण्यात येईल.

हे ॲप केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स डिव्हीजन (NAGD) यांनी विकसीत केले आहे. हे ॲप इंग्रजी, हिंदी यासह 11 प्रादेशिक भाषेमध्ये वापरता येते.

उमंग ॲपद्वारे सर्व भारतीयांना एक मंच उपलब्ध करुन देने जेथे केंद्र राज्य, सरकारी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरी सुविधा केंद्रे, ई-सेवा केंद्र यामध्ये प्राप्त करता येतात त्यासर्व सेवांचा समावेश करण्यात येईल ज्याद्वारे नागरीक एकापेक्षा जास्त सेवांचा लाभ घेवू शकतील.

हे ॲप एंड्रॉयड (Android )4.4 व त्यावरील एड्रॉयड व्हर्जन व आय ओ एस (ISO) 8.0 व हयानंतरच्या पुढील व्हर्जनला सपोर्ट करतो. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.
उत्तर लिहिले · 24/4/2020
कर्म · 210095
0
*💁‍♂️ कोरोनाग्रस्तांसाठी विठुराया आला धावून; पंढरपूर विठ्ठल मंदिराकडून 1 कोटी रुपयांची मदत*

*🔰📶 महा डिजी | मदत*

⚡कोरोनाचे संकट वाढू लागले असताना आता विठूराया मदतीसाठी पुढे आला आहे. मंदिराकडून 1 कोटी रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस घोषित करण्यात आली आहे.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी ही माहिती दिली. मंदिर समितीशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

💫दरम्यान 4 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा देखील रद्द केल्याची घोषणा मंदिराकडून करण्यात आली असून वारकरी संप्रदायाने यापूर्वीच यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला आहे.

😤संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असतानाच देशभरात अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गर्दीची ठिकाण बंद करण्यात आली आहेत.

◼️अशातच राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार, पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय पंढरपूर देवस्थान विश्वस् मंडळाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या हितासाठी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त आमदार राम कदम यांनी दिली होती.
________________
*🧐 कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी कुणी किती केली मदत💸*

*🔰📶 MAHA DIGI|HELP*

🔘अभिनेता अक्षय कुमार कडून PMCares फंदात 25 कोटींची मदत

🔘बजाज कंपनी कडून 100 कोटींची मदत

🔘शिर्डी साईबाबा संस्थान यांच्याकडून 51 कोटींची मदत

🔘विवेक ओबेरॉय कडून 9 कुटुंबांना आर्थिक मदत

🔘अभय फिरोदिया समुहातर्फे 25 कोटींची मदत

🔘रतन टाटा यांच्याकडून भरघोस 1500 कोटींची मदत

🔘रेल्वे कर्मचाऱ्यांकडून 260 कोटींची मदत

🔘सुरेश रैना कडून सरकारी यंत्रणांना 52 लाखांची मदत

🔘प्रभास कडून 4 कोटी रुपयांची मदत

🔘गौतम गंभीर कडून 50 लाख रुपयांचा निधी

🔘BCCI ने सुद्धा पंतप्रधान निधीला 51 कोटींची मदत

🔘सचिन तेंडुलकर कडून 50 लाखांची मदत

🔘वरून धवन ची मुख्यमंत्री सहायता निधिला 25 लाखांची मदत

        मित्रांनो आता अशा वेळी मदतीचे असे खूप हात समोर येत आहेत. तुमच्या आमच्या सारखे सुद्धा थोडी का होईना मदत करत आहेत अगदी 1 रुपयांपासून. जर तुम्हालाही काही मदत करायची असल्यास तर तुम्हीही मुख्यमंत्री सहायता निधी किंवा पंतप्रधान सहायता निधी मध्ये थोडीफार मदत देऊ शकता🍂

         परंतु अशा वेळेस खूप जन असे पुढे येतील, आमच्याकडे मदत जमा करा म्हणतील परंतु तुम्ही त्यांना कोणतीही मदत देऊ नका, जर तुम्हाला मदत करावयचीच असेल तर तुम्ही मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान यांच्याकडे मदत जमा करू शकता तीसुद्धा मोबाईल वरून.

        जर तुम्हा सर्वांचे असे मदतीचे हात जर पुढे आले तर आपण कोरोणा ला नक्कीच हरवू शकतो ✌️

        देशाचा विचार करा, जर आपण थोडीफार मदत केली तर तेवढाच देशाला हातभार काही शकतो. आधीच देशावर आर्थिक संकट आहे त्याचा आपण विचार करू आणि थोडीफार का होईना मदत करू 🇮🇳

        हा मेसेज आपल्याकडे जेवढे ग्रुप असतील तेवढ्या ग्रुप वरती आपल्या नातेवाईकांना, मित्रांना पाठवा जेणेकरून असे अनेक मदतीचे हात समोर येतील, आणि त्यामुळेच देशासमोरील आर्थिक संकट कमी होईल 🤝
___________________________
🤝🏻  _* करोना: मदत करायचीय? 'या' बँक खात्यात पैसे जमा करा!*_

🔰📶 * MAHA DIGI । HELP*

🗣️ करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार काटेकोर उपाययोजना करत असून, या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरू करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. दरम्यान,

✍️ * मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ विषयी सविस्तर माहिती*

🔹 * बचत खाते क्रमांक* - ३९२३९५९१७२०
🔹 * स्टेट बँक ऑफ इंडिया* , मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई ४०००२३
🔹 * शाखा कोड*  ००३००
🔹 * आयएफएससी कोड* SBIN००००३००

📍 सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून *१०० टक्के सूट* देण्यात येणार आहे.
____________________________________
* आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 30/3/2020
कर्म · 2770
1
🥏 *WhatsApp मधून 'डिलीट' न करता 'असा' लपवा पर्सनल मॅसेज, कोणालाही दिसणार नाही 'चॅट'*

*🔰📶MAHA DIGI#UPDATE*

🗣 व्हॉट्सअ‍ॅप हे भारतातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. लोक कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. सुरुवातीला हे अ‍ॅप तरुण-तरुणी वापरत असत. पण आता हे सर्व वयोगटातील आणि गृहिणींपासून ते कार्यालय आणि व्यावसायिक गटांपर्यंतचे लोकही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपले काम करत आहेत. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने चॅटिंगला सुरक्षित करण्यासाठी फिंगरप्रिंट लॉक फीचर जारी केले आहे, ज्यात स्मार्टफोनप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याच्या फिंगरप्रिंटने उघडता येईल.

परंतु जर आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी गप्पा मारत असाल आणि तुम्हाला त्याची चॅटिंग डिलिट न गुपित ठेवायची असेल त्यासाठी तुम्हाला आम्ही असा खास मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमची वैयक्तिक चॅटिंग न हटवता व्हॉट्सअ‍ॅपवरच सगळ्यांपासून ते गुपित ठेवू शकता. व्हॉट्सअ‍ॅपवरील या खास फिचरचे नाव आर्काइव्ह आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर हा पर्याय पाहिला आहे परंतु तो कधीही वापरलेला नाही. आर्काइव्हमधून हटवल्याशिवाय आपण व्हॉट्सअ‍ॅप चॅट गुपित ठेवू शकता.


💁🏻‍♂ *जाणून घेऊया याची पद्धत…*

▪ व्हाट्सअ‍ॅप उघडा आणि चॅट्स वर जा.

▪ जे चॅट तुम्हाला वैयक्तिक ठेवायचे आहे, ते ओपन न करता, त्या चॅट बॉक्सला लॉग प्रेस करा.

▪ जेव्हा आपण चॅट बॉक्सवर लॉन्ग प्रेस केल्यावर, वरती एक आयकॉन फोल्डर दिसेल.

▪ या आयकॉनवर क्लिक केल्याने त्या संपर्कासाठी चॅट Archive होईल.

▪ त्यानंतर तो संपर्क चॅट लिस्टमधून गायब होईल, कितीही व्हॉट्सअ‍ॅप स्क्रोल केले तरी चालेल.
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
🤷🏻‍♂ *आयफोन वापरकर्त्यांनी हा स्वीकारावा मार्ग :*

▪ आयफोनचा वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपमधील त्या संपर्कात जा आणि चॅट बॉक्सला उजवीकडे स्वाइप करा.

▪ उजवीकडे स्वाइप केल्यानंतर More आणि Archive दिसेल, Archive क्लिक करा.

▪ Archive केल्यानंतर लगेचच तो चॅट बॉक्स हिस्ट्रीतून नाहीसा होईल.

🔙 *परत कसे आणावे :*


📲 Android वापरकर्ता –

▪ जेव्हा आपल्याला पुन्हा त्या संपर्कासह चॅट करायचे असेल, तर Android वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर खाली स्क्रोल करा आणि सर्वात खाली जा.

▪ शेवटच्या चॅटच्या खाली पहाल तर, शेवटी एक लहान Archive दिसेल.

▪ त्यावर टॅप करा, आपण लपवलेला संपर्क दिसेल.

▪ संपर्क चॅट बॉक्सला लॉन्ग प्रेस करा. Unarchive चे फोल्डर चिन्ह दिसेल.

▪ या चिन्हावर क्लिक करून तो संपर्क आणि सर्व चॅट पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपच्या यादीमध्ये दिसून येतील.

🍎 *आयफोन वापरकर्ता*

▪ Android फोनमध्ये, जिथे संग्रहित फोल्डर तळाशी दिले गेले आहे, आयफोनमध्ये हे फोल्डर सर्वात वरती असेल.

▪ विशेष म्हणजे, जेव्हा आपण व्हॉट्सअ‍ॅप उघडता तेव्हा हे फोल्डर दिसत नाही, जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप होम पेज खाली खेचल्यानंतर ते दिसून येईल.

▪ या फोल्डरवर जा आणि लपविलेले गप्पा बॉक्स स्वाइप करा.

▪ येथे More आणि Archive दिसेल. आयकॉनवर टॅप करून किंवा बॉक्स उजवीकडे स्वाइप करू करून Unarchive करू शकता.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 27/12/2019
कर्म · 569265