2 उत्तरे
2 answers

शिवकालीन साधनांची ओळख बद्दल माहिती द्या?

0
♏  *शिवकालीन साधनांची ओळख....*

शिवाजी महाराजांच्या चरित्राचा मनापासून अभ्यास करणारी बरीच मंडळी या समुहात आहेत. मला असे वाटते जर अस्सल शिवकालीन साधनांची ओळख करून दिली तर अभ्यासकांना उपयोगी ठरेल. कादंबर्‍या वगैरे स्फूट साहित्य हे मनोरंजनासाठी ठीक, पण इतिहासासाठी मुळीच भक्कम साहित्य ठरू शकत नाही. त्यामुळे कथा - कादंबर्‍यांकडे अभ्यासू नजरेने बघितल्यास विचित्र इतिहासाची निर्मीती होते. अभ्यासूंसाठी शिवकालीन अस्सल साधनांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो आहे.
*माहिती सेवा गृप पेठवड़गाव*
🕳१) फार्सी पत्र संग्रह
१-अ) आदाब - इ - आलमगीरी (आलमगिरी शैली)
१-ब) इन्शा -इ हफ्त अंजुमन (सात प्रकारची पत्रे)
१- क) दुर्ज - उल गवाहिर (रत्नांचा करंडा)
१-ड) खुतूत - इ- शिवाजी (शिवरायांची पत्रे)

🕳२) मराठी
२-अ) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
(वि. का. राजवाडे संपादित खंड ८,१५, १६, १७,१८, २०)
२-ब) सभासद बखर (कृष्णाजी अनंत सभासद)
२-क) ९६ कलमी बखर
२-ड) चित्रगुप्त बखर
२- इ) तंजावरचा शिलालेख
२-फ) चिटणीस बखर
२-ह) शिवदिग्वीजय बखर
* शकावल्या
*-अ) जेधे शकावली
*-ब) शिवापूरकर देशपांडे शकावली
*-क) शिवापूर शकावली
*-ड) चित्रे शकावली

🕳३) पोर्तुगीज
३-अ) द पोर्च्युगीझ अँड द मराठाज (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-ब) मराठ्यांच्या इतिहासाची साधने : पोर्तुगीज दप्तर (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-क) कोस्मि द ग्वार्दलिखित शिवचरित्र (१६९५)
*माहिती सेवा गृप पेठवड़गाव*
♏४) इंग्रजी
४-अ) दि इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया, १७ खंड
४-ब) इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, २ खंड

🕳५) फार्सी साहित्य
५-अ) बादशाहनामा/ पातशाहनामा (शाहजहान कारकिर्द - १६२८ ते १६४७)
५-ब) आलमगिरनामा (औरंगजेबाची कालकिर्द)
५-क) मुहंमदनामा (मुहम्मद आदिलशाहाची कालकिर्द)
५-ड) तारीख - इ - आदिलशाही (आली आदिलशाहाचा इतिहास)

🕳६) संस्कृत
६-अ) अनुपुराण उर्फ शिवभारत (कविंद्र परमानंद)
६-ब) पर्णालपर्वतग्रहणाख्यान (जयराम)
६-क) शिवराजराज्याभिषेककल्पतरू (गोविंद नारायण बर्वे)

🕳७) समकालीन पोवाडे
७- अ) यमाजीकृत बाजी पासलकरांचा पोवाडा
७- ब) अज्ञानदासकृत अफजलखानवधाचा पोवाडा
७- क) फतनजीकृत अफजलखानाचा पोवाडा
७- ड) अज्ञान यमाजी कृत दत्ताजी जाधवरावांचा पोवाडा

🕳८) हिंदी
८ -अ) शिवभूषण (कवि भूषण)
८ -ब) शिवा बावनी (कवि भूषण)♏

0

शिवकालीन साधनांची ओळख:

शिवकालीन इतिहासाची साधने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाबद्दल माहिती मिळवण्याचे विविध स्रोत. ह्या साधनांना मुख्यतः तीन भागांमध्ये विभागले जाते:

  1. लिखित साधने:
    • दस्तऐवज: त्या काळातील शासकीय पत्रव्यवहार, तह, करार, न्यायनिवाडे Court decisions आणि इतर कागदपत्रे.
    • बखरी: बखरी म्हणजे त्या काळातील घटनांवर आधारित वर्णनात्मक लेखन. उदा. सभासद बखर,add hyperlink to its wikipedia page by adding target="_blank" attribute to the anchor tag and rel="noopener noreferrer" for security reasons and open in new tab, चिटणीस बखर. (विकिपीडिया)
    • चरित्र: महापुरुषांची चरित्रे, उदा. 'शिवचरित्र'.
    • आत्मचरित्र: त्या काळातील व्यक्तींनी स्वतः लिहिलेली पुस्तके.
    • प्रवासवर्णने: प्रवाशांनी लिहिलेली प्रवासवर्णने.
  2. भौतिक साधने:
    • किल्ले: fortalezas रायगड,add hyperlink to its wikipedia page by adding target="_blank" attribute to the anchor tag and rel="noopener noreferrer" for security reasons and open in new tab, सिंहगड,add hyperlink to its wikipedia page by adding target="_blank" attribute to the anchor tag and rel="noopener noreferrer" for security reasons and open in new tab, प्रतापगड (रायगड) , (सिंहगड) , (प्रतापगड) यांसारखे किल्ले.
    • स्मारके: समाधी,add hyperlink to its wikipedia page by adding target="_blank" attribute to the anchor tag and rel="noopener noreferrer" for security reasons and open in new tab, मंदिरे आणि थडगी. (समाधी)
    • नाणी: त्या काळातील चलन.
    • शस्त्रे: Sword and dagger तलवार,add hyperlink to its wikipedia page by adding target="_blank" attribute to the anchor tag and rel="noopener noreferrer" for security reasons and open in new tab, भाला,add hyperlink to its wikipedia page by adding target="_blank" attribute to the anchor tag and rel="noopener noreferrer" for security reasons and open in new tab, तीर-कमान आणि इतर शस्त्रे. (तलवार) , (भाला)
  3. मौखिक साधने:
    • लोककथा: लोकांच्या कथा-कहाण्या.
    • लोकगीते: त्या काळातील लोकगीते व पोवाडे.
    • ओव्या: स्त्रियांच्या ओव्या व लोकपरंपरा.

या साधनांच्या आधारे शिवकालीन इतिहासाची माहिती मिळवली जाते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

शंभूराजेंच्या बलिदानाबाबत माहिती द्या?
छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला का केला?
शिवाजी महाराज नाशिकमध्ये कोणत्या गावात तळ ठोकून बसले होते?
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार कधी उभारले?
बाजीराव आणि निजामांनी पराभव केलेल्या लढाया?
पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला?
पहिले ब्रह्मयुद्ध आणि वसईच्या स्वातंत्र्याची माहिती?