3 उत्तरे
3
answers
संयम म्हणजे काय?
3
Answer link
संयम म्हणजे एक युद्ध स्वतः विरुद्धचे...
स्वतः विरुद्ध पुकारलेले बंड म्हणजे संयम...
इच्छा, आकांक्षा उफाळून वर येत असताना भावनांना घातलेला आवर म्हणजे संयम....
प्रिय व्यक्तिस सरणावर पाहून सत्य स्वीकारणे म्हणजे संयम...
काळजाला भेदणारा तीर झेलताना केलेले हास्य म्हणजे संयम....
ओठांवर आलेली गोष्ट आवंढ्यासारखी गिळणे म्हणजे संयम....
जीव घेणारी तहान एका थेंबावर शमवणे म्हणजे संयम...
एक ना अनेक पाळलेले भावनांचे बंधन म्हणजे संयम...
1
Answer link
संयम म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी यांचा एकत्रित अभ्यास. संयम म्हणजे एक युद्ध स्वतःविरुद्ध,🙏
0
Answer link
संयम म्हणजे आपल्या इच्छा, भावना आणि कृतींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता.
संयमाचे काही पैलू:
- भावनांवर नियंत्रण:arr आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करणे आणि नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवणे.
- आवेगांवर नियंत्रण:arr कुठल्याही गोष्टीचा विचार न करता लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम बाळगणे.
- धैर्य:arr उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणींवर मात करण्याची तयारी.
- आत्म-अनुशासन:arr स्वतःला शिस्त लावणे आणि नियमांचे पालन करणे.
संयमाचे फायदे:
- चांगले संबंध
- यशस्वी जीवन
- मानसिक शांती
संयम एक महत्त्वाचे गुण आहे जो आपल्याला जीवनात यशस्वी आणि आनंदी राहण्यास मदत करतो.