शिक्षण व्यक्तिमत्व पुस्तके इतिहास

डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके कोणती?

2 उत्तरे
2 answers

डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके कोणती?

7
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा व समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, अजून खूप बरेचशे लेखन प्रकाशीत आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे आंबेडकरांच्या ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीचे म्हणने आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले काही ग्रंथ त्यांच्या हयातीच प्रकाशित झाले तर काही त्यांच्या परिनिर्वाणानंतर प्रकाशित होऊ शकले, ज्यांचे वर्षानुसार विवरण पुढिलप्रमाणे आहे -

कास्ट्स इन इंडिया (१९१७)
स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज (१९१८)
द प्रॉब्लम ऑफ द रूपी (१९२३)
दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया (१९२४)
वेटिंग फॉर अ व्हिझा (१९३५-३६)
अनाइअलेइशन ऑफ कास्ट (१९३६)
मिस्टर गांधी अँड दी एमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स (१९४५)
रानडे, गांधी अँड जिन्ना (१९४३)
थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४५)
व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स (१९४५)
महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट (१९४५)
हू वर दि शुद्राज? (१९४६)
स्टेट्स अँड माइनॉरिटीज (१९४७)
हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी अँड बँकिंग (१९४७)
द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स (१९४८)
थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट (१९५५)
बुद्ध अँड कार्ल मार्क्स (१९४६)
कम्यूनल डेडलाक अँड वे टू सॉल्व इट (१९४५)
बुद्ध अँड दी फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०)
फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रेसी (१९५१)
लिंग्विस्टिक स्टेट्स नीड्स फार चेक्स अँड बॅलेन्सेज (१९५३)
बुद्धिज्म अँड कम्यूनिज्म (१९५६)
द बुद्धा अँड हिज धम्मा (१९५७)
उत्तर लिहिले · 25/3/2020
कर्म · 950
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या काही महत्वाच्या पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  • ॲनिहिलेशन ऑफ कास्ट ( जातींचे निर्मूलन ):

    हे पुस्तक बाबासाहेबांच्या प्रसिद्ध कार्यांपैकी एक आहे. यात त्यांनी जातीय भेदभावावर आणि समाजातील उच्च-नीचतेवर प्रखर विचार मांडले आहेत.

  • हू वेअर द शुद्राज? (शूद्र कोण होते?):

    या पुस्तकात त्यांनी शूद्रांच्या उत्पत्ती आणि इतिहासावर प्रकाश टाकला आहे.

  • द प्रॉब्लेम ऑफ रुपी: इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन (रुपयाची समस्या: त्याची उत्पत्ती आणि त्याचे समाधान):

    हे पुस्तक अर्थशास्त्रावर आधारित आहे, ज्यात त्यांनी भारतीय रुपयाच्या समस्यांवर उपाय सुचवले आहेत.

  • बुद्ध आणि त्यांचा धम्म (The Buddha and His Dhamma):

    हे पुस्तक बौद्ध धर्मावर आधारित आहे. यात भगवान बुद्धांचे जीवन आणि त्यांच्या शिकवणुकीचा सखोल अभ्यास आहे.

  • पाकिस्तान ऑर द पार्टीशन ऑफ इंडिया (पाकिस्तान किंवा भारताची फाळणी):

    या पुस्तकात फाळणीच्या समस्यांवर आणि परिणामांवर भाष्य केले आहे.

  • रानाडे, गांधी आणि जिना:

    हे पुस्तक तीन महत्वाच्या नेत्यांच्या विचारांवर आधारित आहे.

  • व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स ( What Congress and Gandhi Have Done to the Untouchables):

    या पुस्तकात त्यांनी काँग्रेस आणि महात्मा गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले यावर टीकात्मक विचार मांडले आहेत.

या व्यतिरिक्त, डॉ. आंबेडकरांनी अनेक लेख, निबंध आणि भाषणे दिली, जे त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा भाग आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?