4 उत्तरे
4 answers

क्रश म्हणजे काय?

3
क्रश म्हणजे प्रेम नाही. क्रश म्हणजे आकर्षण नाही. क्रश म्हणजे क्रश. या त्या रोमॅंटीक भावना असतात ज्या एखाद्या सेलिब्रेटीबद्दल वाटतात, किंवा शाळा, कॉलेज, कॉलनीतील सर्वात चिकण्या मुलाबद्दल / सर्वात देखण्या मुलीबद्दल वाटतात.
आपल्या क्रशला पटवणे हा आपला हेतू कधी नसतोच, ते मिळालेच पाहिजे असा हट्टही नसतोच, किंबहुना बहुतांश वेळा ते आपल्या आवाक्याबाहेरचेच असते.
ईतर कोणाच्या प्रेमात पडून जीवाचा कोंडमारा आणि मनाची घालमेल करण्यापेक्षा एखाद्याच्या गोड स्वप्नात हवे तेव्हा रंगणे आणि न गुंतता तितक्याच सहजतेने बाहेर पडणे अशी सोय करून देतात ते हे क्रश.
बॅचलर आणि सिंगल लोकांचेच एखादे क्रश असते असे गरजेचे नाही. तुम्ही कोणासोबत प्रेमबंधनात वा विवाहबंधनात अडकलेले असतानाही साईड बाय साइड तुमचे क्रश असू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल माहीतही असते, ते देखील विदाऊट आक्षेप.

बाकी इंग्रजी मध्ये क्रश म्हणजे काय सर्वांना माहीत असेलच..

उत्तर लिहिले · 26/3/2020
कर्म · 55350
1
साधारण नेहमीच्या इंग्रजी संभाषणात crush म्हणजे चिरडणे हाच अर्थ होतो, जसं की Crushed चिरडले, Was crushed चिरडला गेला इत्यादी.
उत्तर लिहिले · 23/3/2020
कर्म · 29340
0

क्रश (Crush) म्हणजे:

  • एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र आकर्षण वाटणे: क्रश म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खूप जास्त आकर्षण, आवड निर्माण होणे.
  • क्षणभंगुर भावना: 'क्रश' ही भावना सहसा काही काळापुरतीच असते.
  • अवास्तव कल्पना: अनेकदा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जास्त माहिती नसते, तरीही आपण तिच्याबद्दल मनात एक सुंदर प्रतिमा तयार करतो.
  • रोमँटिक किंवा Admiration: क्रशमध्ये रोमँटिक भावना असू शकतात किंवा केवळ त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आपल्यावर पडतो.

थोडक्यात, क्रश म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी तीव्र ओढ, जी काही वेळासाठीच असते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

मी लग्नासाठी मुलगी बघायला गेलो होतो. मुलगी स्वभावाला चांगली आहे, पण ती दिसायला तेवढी सुंदर नाहीये. पण तिला मी आवडतो. ती शिक्षण B.Com झालेली आहे. मग मी तिच्याशी लग्न केले पाहिजे का दुसरी बघू?
बायको चांगल्या गोष्टींकडे कानाडोळा का करते?
माझं लग्न ठरलं आहे आणि माझं अरेंज मॅरेज आहे. मी कधी मुलीशी जास्त बोललो नाही, मग मी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत बोलण्याची सुरुवात कशी करावी?
महाराष्ट्रातील बाबर आडनावाचा आणि मुघल सम्राट बाबर यांचा काही संबंध आहे का?
आदिवासींचे हितसंबंध जोपासण्यासाठी आणि भौतिक जीवनमान सुधारण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती सांगा?
मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा?
नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाचा त्याच्या भाषेशी निकट संबंध असतो हे स्पष्ट करण्यासाठी प्रा. ग. प्र. प्रधान यांनी कोणती उदाहरणे दिली आहेत?