सरकारी योजना कागदपत्रे अधिवास प्रमाणपत्र

डोमेसाईल दाखला म्हणजे काय, सविस्तर माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

डोमेसाईल दाखला म्हणजे काय, सविस्तर माहिती द्या?

4
हे प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढील पायऱ्यांनी जा.
१) पुर्वतयारी – जन्मतारीख व रहिवासी पुरावा घेणे
२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढणे



१) पुर्वतयारी – जन्मतारीख व रहिवासी पुरावा घेणे.

● जन्मतारीख पुरावा घेणे
अ) अर्जदार आणि त्याचे वडील अशा दोघांचा शाळा सोडल्याचा दाखला (ज्यात जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख असावा) किंवा
ब) आपल्या ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपालिका/मनपा यांच्याकडील अर्जदाराच्या जन्माच्या नोंदवहीतील उतारा किंवा
क) सेवानोंद पुस्तकातील जन्मस्थानाचा उल्लेख असलेल्या पानाची साक्षांकित प्रत घ्यावी किंवा
ड) शाळा/कॉलेज मधील जन्मतारखेचा उल्लेख असणारा बोनाफाईड दाखला

● रहिवासी पुुरावा घेणे
गावातील १५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त एकाच ठिकाणी वास्तव्य असल्याचा ग्रामसेवक आणि गावकामगार तलाठी यांचा तुमच्या नावाचा रहिवासी दाखला घ्यावा.



२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे

● जन्मतारखेचा पुरावा

● रहिवासी पुरावा

● ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – तुमचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १०₹ चे कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो

● महाराष्ट्रात सलग १० वर्ष वास्तव्य असल्याबाबत १००₹ स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदाराचे वय १८ वर्ष पुर्ण असल्यास त्याने स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र
क) अर्जदार भाड्याने राहत असेल तर घरमालकाचे १००₹ स्टॅम्पवर संमतीपत्र व घरमालकाच्या नावे असणारे वीज बिल

● अर्जदार परराज्यातील असेल किंवा अर्जदाराचा जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास
अ) वीस वर्षापासुनचे महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा उदा.मालमत्ता कार्ड, जमीन असल्यास ७/१२, खरेदीखत, कर पावत्या
ब) मुळ राज्याचा अधिवास स्वखुशीने सोडत असल्याचे व महाराष्ट्र राज्याचा अधिवास स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र

● अर्जदार विवाहीत स्त्री असल्यास
अ) पतीचा शाळा सोडल्याचा दाखला व पतीकडील रहिवासाचा पुरावा
ब) विवाहाचा पुरावा (कोणताही एक)- विवाह नोंदणी दाखला, गॅझेटमध्ये प्रसिध्द झालेला नावातील बदल, लग्नपत्रिका, पोलीस पाटील यांचा दाखला

● अर्जदाराचे किंवा त्याच्या वडीलांचे जन्मस्थळ भारताबाहेरील असेल तर त्यांच्या पासपोर्टच्या सर्व पानांची साक्षांकित झेरॉक्स प्रत

● दहावी बोर्ड सर्टिफिकेट

(वरील कागदपत्रांची फाईल बनवुन त्याची साक्षांकित प्रत तयार करुन ठेवावी.)



३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढणे

सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयामधुन डोमीसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा. त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी. त्यावर १०₹ किंमतीचे कोर्ट फी स्टँप/तिकीट लावावे. तुमचा फोटो लावावा. या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत. हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयमध्ये जमा करावा. फॉर्म जमा केल्यावर पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचे डोमीसाईल प्रमाणपत्र मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपले डोमीसाईल प्रमाणपत्र घ्यावे. त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी. डोमीसाईल प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या झेरॉक्स काढुन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवाव्यात.
उत्तर लिहिले · 21/2/2020
कर्म · 3835
0

डोमेसाईल दाखला (Domicile Certificate) म्हणजे काय?

डोमेसाईल दाखला म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र या गोष्टीचा पुरावा आहे की एखादी व्यक्ती ठराविक राज्यात / शहरात कायमस्वरूपी राहत आहे.

हे प्रमाणपत्र खालील ठिकाणी आवश्यक असते:

  • शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी.
  • सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी.
  • राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचा फोटो.
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इ.)
  • पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल इ.)
  • जन्माचा दाखला (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला)
  • लागू असल्यास प्रतिज्ञापत्र (Affidavit).

डोमेसाईल दाखला कसा मिळवायचा?

  1. संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करा.
  2. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
  3. शुल्क भरा आणि पावती घ्या.
  4. तलाठी किंवा इतर अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाते.
  5. पडताळणी झाल्यावर दाखला जारी केला जातो.

नोंद:domicile certificate साठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनुसार बदलू शकते.

अधिक माहितीसाठी, आपल्या राज्याच्या संबंधित सरकारी वेबसाइटला भेट द्या.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1100

Related Questions

आधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय?
डोमेसाइल प्रमाणपत्र म्हणजे काय?
डोमेसाईल दाखला म्हणजे काय?
डोमिसाईलसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ?
डोमिसाइल कोणत्या वेबसाईटवरून काढावे?
डोमेसाइल काढणे आहे डॉक्युमेंट काय लागतील ?
मला माझा डोमिसाइल अर्ज 'ट्रॅक' करायचा आहे, तर मी तो कसा करू?