Topic icon

अधिवास प्रमाणपत्र

0

आधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) म्हणजे काय?

आधिवास प्रमाणपत्र हे एक अधिकृत कागदपत्र आहे जे हे सिद्ध करते की एखादी व्यक्ती विशिष्ट राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात काही विशिष्ट कालावधीपासून राहत आहे.

हे प्रमाणपत्र खालील गोष्टींसाठी आवश्यक आहे:

  • शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी.
  • सरकारी नोकरी मिळवण्यासाठी.
  • सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी.

आधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • अर्जदार संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात किमान 10-15 वर्षे वास्तव्य करत असावा. (राज्यভেদে नियम बदलू शकतात.)
  • अर्जदाराकडे वास्तव्याचा पुरावा (उदा. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल) असणे आवश्यक आहे.

हे प्रमाणपत्र कसे मिळवायचे?

  1. अर्जदाराने संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  2. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात.
  3. अर्जाची पडताळणी झाल्यावर प्रमाणपत्र जारी केले जाते.

अधिक माहितीसाठी, आपण आपल्या राज्याच्या अधिकृत सरकारी वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1080
1
राज्यातील रहिवासाचे प्रमाणपत्र म्हणून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) देण्यात येते. पासपोर्टपासून इतर महत्त्वाच्या कामांसाठी हे डोमेसाइल प्रमाणपत्र आवश्यक असते.
उत्तर लिहिले · 23/12/2020
कर्म · 14895
4
हे प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढील पायऱ्यांनी जा.
१) पुर्वतयारी – जन्मतारीख व रहिवासी पुरावा घेणे
२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढणे



१) पुर्वतयारी – जन्मतारीख व रहिवासी पुरावा घेणे.

● जन्मतारीख पुरावा घेणे
अ) अर्जदार आणि त्याचे वडील अशा दोघांचा शाळा सोडल्याचा दाखला (ज्यात जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख असावा) किंवा
ब) आपल्या ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपालिका/मनपा यांच्याकडील अर्जदाराच्या जन्माच्या नोंदवहीतील उतारा किंवा
क) सेवानोंद पुस्तकातील जन्मस्थानाचा उल्लेख असलेल्या पानाची साक्षांकित प्रत घ्यावी किंवा
ड) शाळा/कॉलेज मधील जन्मतारखेचा उल्लेख असणारा बोनाफाईड दाखला

● रहिवासी पुुरावा घेणे
गावातील १५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त एकाच ठिकाणी वास्तव्य असल्याचा ग्रामसेवक आणि गावकामगार तलाठी यांचा तुमच्या नावाचा रहिवासी दाखला घ्यावा.



२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे

● जन्मतारखेचा पुरावा

● रहिवासी पुरावा

● ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – तुमचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १०₹ चे कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो

● महाराष्ट्रात सलग १० वर्ष वास्तव्य असल्याबाबत १००₹ स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदाराचे वय १८ वर्ष पुर्ण असल्यास त्याने स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र
क) अर्जदार भाड्याने राहत असेल तर घरमालकाचे १००₹ स्टॅम्पवर संमतीपत्र व घरमालकाच्या नावे असणारे वीज बिल

● अर्जदार परराज्यातील असेल किंवा अर्जदाराचा जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास
अ) वीस वर्षापासुनचे महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा उदा.मालमत्ता कार्ड, जमीन असल्यास ७/१२, खरेदीखत, कर पावत्या
ब) मुळ राज्याचा अधिवास स्वखुशीने सोडत असल्याचे व महाराष्ट्र राज्याचा अधिवास स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र

● अर्जदार विवाहीत स्त्री असल्यास
अ) पतीचा शाळा सोडल्याचा दाखला व पतीकडील रहिवासाचा पुरावा
ब) विवाहाचा पुरावा (कोणताही एक)- विवाह नोंदणी दाखला, गॅझेटमध्ये प्रसिध्द झालेला नावातील बदल, लग्नपत्रिका, पोलीस पाटील यांचा दाखला

● अर्जदाराचे किंवा त्याच्या वडीलांचे जन्मस्थळ भारताबाहेरील असेल तर त्यांच्या पासपोर्टच्या सर्व पानांची साक्षांकित झेरॉक्स प्रत

● दहावी बोर्ड सर्टिफिकेट

(वरील कागदपत्रांची फाईल बनवुन त्याची साक्षांकित प्रत तयार करुन ठेवावी.)



३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढणे

सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयामधुन डोमीसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा. त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी. त्यावर १०₹ किंमतीचे कोर्ट फी स्टँप/तिकीट लावावे. तुमचा फोटो लावावा. या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत. हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयमध्ये जमा करावा. फॉर्म जमा केल्यावर पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचे डोमीसाईल प्रमाणपत्र मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपले डोमीसाईल प्रमाणपत्र घ्यावे. त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी. डोमीसाईल प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या झेरॉक्स काढुन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवाव्यात.
उत्तर लिहिले · 21/2/2020
कर्म · 3835
18
डोमोसाईल दाखला म्हणजे रहिवासी दाखला होय.
राज्यातील रहिवासाचे प्रमाणपत्र म्हणून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) देण्यात येते. पासपोर्टपासून इतर महत्त्वाच्या कामांसाठी हे डोमेसाइल प्रमाणपत्र आवश्यक असते.

डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल?
डोमेसाइल प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो. पहिल्या पद्धतीनुसार राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करता येऊ शकतो. किंवा राज्य सरकारने ‘आपले सरकार’च्या महाऑनलाइनच्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाइन अर्ज

‘आपले सरकार’च्या माध्यमातून सरकारने अनेक प्रमाणपत्रे मिळविण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसारच डोमेसाइल प्रमाणपत्रासाठीही अर्ज करता येणार आहे. त्यासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज उपलब्ध केला आहे. त्यानुसार या वेबसाइटवर अर्जदारांनी आपला लॉग इन आयडी तयार करून आवश्यक ती माहिती, कागदपत्रे आणि त्यासंदर्भातील शुल्क भरून अर्ज करता येईल.

महासेवा केंद्राद्वारे करावयाचा अर्ज

‘आपले सरकार’च्या माध्यमातूनच महाऑनलाइनच्या मदतीने राज्य सरकारने मुंबईभरात अनेक महासेवा केंद्राची उभारणी केली आहे. सध्याच्या घडीला मुंबईत ५३ महासेवा केंद्र असून, या केंद्राची माहिती महाऑनलाइनच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्या केंद्रावर आवश्यक कागदपत्रांच्या मदतीने आणि अर्जदारांच्या माहितीने भरलेल्या पूर्ण अर्जाच्या सहाय्याने हे अर्ज करता येणार आहे.

सेतू केंद्रावरही संधी

महासेवा केंद्राबरोबर राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू केंद्राच्या मदतीनेही डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येऊ शकेल. त्यासाठी सेतू केंद्राच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज उपब्लध असून, हा अर्ज भरून त्या त्या सेतू केंद्रावर हा अर्ज सादर करून डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येऊ शकतो.

सेतू केंद्रावरील प्रक्रिया

सेतू केंद्रावर उपब्लध करून दिलेला अर्ज भरल्यानंतर. त्यात पाच रुपयांचा न्यायिक मुद्रांक शुल्क (कोर्ट फी स्‍टॅम्‍प) अर्जाची छापील प्रत काढून त्यावर विहित जागी चिकटवणे गरजेचे आहे. तर आदिवासी अर्जदाराने (अनुसूचित जमाती - ST) न्यायिक मुद्रांक शुल्क देण्याची आवश्यकता नाही. तर जन्म दिनांक व जन्म ठिकाण याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला सबळ पुरावा आवश्यक आहे. जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास महाराष्ट्रात आजपासून मागील सलग १० वर्षे राहात असल्याचा पुरावा स्थलांतरीत व्यक्ती असल्यास अथवा जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास, मूळ राज्याचा अधिवास स्वखुशीने सोडत असल्याचा व महाराष्ट्र राज्याचा अधिवास स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास, वडिलांचे/पालकांचे अधिवास प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, ‘आरएसबीवाय’कार्ड, वाहनचालक परवाना

पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ चा उतारा

वयाचा पुरावा : जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)

रहिवासाचा पुरावा : रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याबाबत कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला

इतर आवश्यक कागदपत्रे

वीज देयक, भाडेपावती, रेशनकार्ड, दूरध्वनी बिल, विवाहाचा दाखला, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, पतीच्या रहिवासाचा दाखला

लागणारा कालावधी

साधारणपणे अर्ज केल्यानंतर अर्जदारांना १५ दिवसांनंतर डोमेसाइल प्रमाणपत्र मिळते. १५ दिवसांच्या कालावधीत प्रमाणपत्र मिळाले नाही, तर त्यासंदर्भात त्या त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपील करण्याची सोय अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेल्पलाइन आणि अधिक माहितीसाठी

महाऑनलाइनद्वारे उपलब्ध करून दिलेल्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास support@mahaonline.gov.in या ईमेल आयडीवर किंवा ०२२-६१३१६४०० या क्रमाकांवर संपर्क साधता येणार आहे.

स्रोत:-महाराष्ट्र टाईम्स
उत्तर लिहिले · 4/12/2019
कर्म · 458560
4
ओळखीचा पुरावा: पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो,
पत्त्याचा पुरावा: पासपोर्ट, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ चा उतारा
वयाचा पुरावा: जन्माचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक
रहिवासाचा पुरावा: रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी
उत्तर लिहिले · 29/11/2019
कर्म · 170
0

महाराष्ट्रामध्ये डोमिसाइल सर्टिफिकेट (Domicile Certificate) काढण्यासाठी तुम्ही खालील वेबसाईट वापरू शकता:

  • आपले सरकार (Aaple Sarkar): या वेबसाइटवर तुम्हाला डॉमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा मिळेल. आपले सरकार
  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग (Department of Revenue and Forest, Government of Maharashtra): या वेबसाइटवर तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट संबंधित माहिती आणि अर्ज कसा करायचा याची माहिती मिळेल. महसूल व वन विभाग

टीप: अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे तपासा.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1080
3
सर्व प्रकारच्या शासकीय दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी.

उत्तर लिहिले · 2/7/2018
कर्म · 5605