2 उत्तरे
2
answers
शिवाजी महाराज यांच्या भवानी तलवारी विषयी माहिती द्या?
5
Answer link
शिवरायांच्या तलवारीची नावे..तुळजा अन् भवानी
छत्रपती शिवाजी महाराजांकडे तीन तलवारी होत्या. त्यापैकी एका तलवारीचे नाव ‘तुळजा’ तर दुसर्या तलवारीचे नाव ‘भवानी’ होते, असा दावा करीत तुळजाभवानीवर महाराजांची मोठी श्रद्धा होती, त्याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात, असे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. सतीश कदम यांनी सांगितले. तुळजापूर आणि शिवरायांचे असणारे नाते आणखी स्पष्ट करण्यासाठी गेल्या सात वर्षापासून कदम हे संशोधन करीत आहेत.
भोसले घराण्याची कुलदेवता म्हणजे तुळजाभवानी माता. देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी शिवाजी महाराजही तुळजापूरला येऊन गेले आहेत. वारंवार दर्शनाला येणे शक्य नसल्यानेच त्यांनी प्रतापगडावर देवीचे मंदीर बांधले. हे सर्व उल्लेख बखरींमध्ये आहेत. महाराजांनी शत्रूचा पाडाव करण्यासाठी तीन तलवारी ठेवल्या होत्या. या तलवारींना नावे देवीची दिली होती. दोन तलवारींना ‘तुळजा’, ‘भवानी’ तर तिसर्या तरवारीला त्यांनी ‘जगदंबा’ असे नाव दिले होते, असे ते म्हणाले.
मालोजीराजेंचे आजोबा महाराष्ट्रात स्थायिक झाल्यापासूनच्या बखरींमध्ये भोसले घराण्याची कुलदेवता तुळजाभवानी देवी असल्याचे जसे उल्लेख आहेत; तसेच भोसले घराण्याची तुळजाभवानी मातेशी असलेली भक्तीही दिसते. ‘शिवराज-शिवकाल’ या पुस्तकातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराज 16 मार्च 1666 ला येऊन गेल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्षात मात्र तुळजाभवानी देवीच्या संबंधित एखादा अस्सल कागद शोधून ही तुळजाभवानीप्रति शिवरायांची उपासकता किती निस्सीम होती हे दाखविण्यासाठी प्रा. कदम यांची धडपड गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. संशोधन करत करत ते राजस्थानपर्यंत पोचले आहेत. मिर्झाराजे जयसिंहसोबत शिवरायांनी पुरंदरचा तह केला होता.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या तहानुसार आग्रा भेटीसाठी जात असताना शिवराय तुळजापुरातून देवीचे दर्शन घेऊन गेल्याचे उल्लेख बखरींमध्ये आहेत. तर याच कालावधीत मिर्झाराजांचे वास्तव्य औसा, भूम आणि तुळजापुरातही होते. त्यामुळे या विशिष्ट कालखंडावरच संशोधन कदम यांनी सुरू केले आहे. त्यासाठी राजस्थानच्या डिंगली भाषेतील कागदपत्रेही सध्या ते अभ्यासत आहेत. ते ‘पुढारी’शी बोलताना म्हणतात, की प्रतापगडावर महाराजांनी तुळजाभवानी देवीचे मंदिर बांधले होते. तर महाराजांचे वडील शहाजीराजांचे निधन कर्नाटकातील ज्या होदिगेरे येथे झाले तिथेच समाधीस्थळ परिसरात देवीचे मंदिरही आहे. याशिवाय भोसले घराण्याने (ताराबाई यांनी) 1708 मध्ये तत्कालीन रातंजण तालुक्यातील काटी, अळजापूर ही गावे तुळजाभवानी देवीच्या दिवाबत्तीसाठी म्हणून दिली होती.
करवीरच्या संस्थानचा नैवेद्य अजूनही देवीला नियमितपणे आहे. मंदिरातील महाद्वारांना छत्रपती शहाजी, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचीच नावे आहेत. मावळ्यांचे मनोबल वाढविण्यासाठीच महाराजांनी तुळजाभवानी मातेने भवानी तलवार दिल्याचे तेव्हा सांगितले. हे पाहता तुळजाभवानीवर महाराजांची श्रध्दा किती पराकोटीची होती हे सिध्द होते.
तुळजाभवानी देवीशी संबंधित शिवरायांचा अस्सल कागद शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. ते मी करीत राहणारच. जो कोणी असा कागद समोर आणेल त्याची तुळजापुरात पुस्तक तुला करणार आहे, असे मी तुळजापूरच्या इतिहास परिषदेत जाहीर केले आहे.
- प्रा. डॉ. सतीश कदम, इतिहास संशोधक, उस्मानाबाद
दै पुढारी वरून

0
Answer link
शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रसिद्ध तलवार आहे. या तलवारीशी अनेक कथा आणि आख्यायिका जोडलेल्या आहेत.
भवानी तलवार:
- स्वरूप: भवानी तलवार ही सरळ पात्याची, उत्तम प्रतीची तलवार आहे.
- कथा: शिवाजी महाराजांना ही तलवार तुळजाभवानी मातेने दिली, अशी मान्यता आहे.
- महत्व: भवानी तलवार ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक मानली जाते.
सध्याची स्थिती: सध्या ही तलवार लंडनच्या वस्तुसंग्रहालयात (museum) आहे. भारत सरकारने अनेक वेळा ही तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
संदर्भ: या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: