व्यक्तिमत्व शिवाजी महाराज इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज यांची चांगली शायरी मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

छत्रपती शिवाजी महाराज यांची चांगली शायरी मिळेल का?

7
पाठीवर शिवाजी आन
छाताडावर संभाजी कोरलाय..
अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय,
उधळला तरी येळकोट आन
नाय उधळला तरी बी येळकोटच





शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय शिवराय! जय जिजाऊ!






सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!




सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”
तो “शिवनेरी किला” एक शेर की कहानी है..



छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा.



शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!


भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवाजी!
उत्तर लिहिले · 17/2/2020
कर्म · 11990
0

छत्रपती शिवाजी महाराज: प्रेरणादायी शायरी

शिवाजी महाराज, एक अद्वितीय व्यक्तिमत्व! त्यांच्या शौर्याला आणि विचारांना समर्पित काही निवडक शायरी खालीलप्रमाणे:

शौर्यगाथा

  • सिंहाची डरकाळी, आणि भगव्याची शान,
    अशा शिवबा राजांना, आमचा मानाचा मुजरा!

  • गरज काय तलवार हाती, जरी फक्त मर्दानी छाती!
    अश्या शिवरायांना, आमचा मानाचा मुजरा!

  • स्वराज्य रक्षक, धर्म रक्षक,
    शिवाजी महाराज की जय!

प्रेरणादायी विचार

  • शूरता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,
    आणि मी तो मिळवणारच!

  • ध्येय एकच, स्वराज्य!
    आणि मार्ग एकच, लढाई!

टीप:
या शायरी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला आदराने समर्पित आहेत.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2540

Related Questions

श्रीकांत चंद्रकांत जाधव यांच्याबद्दल माहिती द्या?
सरदार पटेलांना कोणत्या कामामुळे सरदार ही पदवी देण्यात आली?
आराम हराम है हे घोषवाक्य कोणाचे आहे?
माधवराव पेशवे यांच्या कार्याचे मूल्यमापन व योग्यता स्पष्ट करा?
छत्रपती संभाजी महाराजांची कामगिरी ३०० शब्दांत सांगा?
सुखात्मिका आणि शोकात्मिका यातील फरक तुमच्या शब्दांत लिहा?
बाबासाहेब आंबेडकर माहिती?