शिक्षण मैत्री निबंध लेखन लिखाण

माझा मित्र निबंध कसा लिहावा?

3 उत्तरे
3 answers

माझा मित्र निबंध कसा लिहावा?

3
अनुराग हा माझा आवडता आणि जिवलग मित्र आहे. आम्ही दोघे लहानपणापासून एकाच वर्गात शिकत होतो. तो एक आदर्श विद्यार्थी आहे. तो सर्वांशी अगदी चांगल्या प्रकारे आणि प्रेमाने बोलतो.

तो कधी कोणाशी भांडत नाही. जेव्हा आम्ही दोघे शाळेत जायचो तेव्हा संध्याकाळी मी त्यांच्या घरी जात असे. त्याची आई मला आपल्या मुलाप्रमाणे मानते आणि खूप प्रेम करते.

अनुराग सुद्धा माझ्या घरी येत असे. अनुरागला कोणी बहीण – भाऊ नाहीत. म्हणून त्याला माझे लहान भाऊ आवडतात.

आमच्या गावात एक छोटीशी नदी आहे. तिथे आम्ही दोघे दर रविवारी दुपारी नदीच्या काठावर फिरायला जातो. अनुरागला चित्रकला खूप आवडते. तो खूप सुंदर चित्रे काढतो.

जसा एक मित्र नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो. त्याच प्रमाणे अनुराग सुद्धा माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या पाठीशी राहतो. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो.

आमच्या दोघांचं घर हे जवळ – जवळ आहे. म्हणून आम्ही लहानपणापासून चांगले मित्र आहोत. आम्ही दोघे आमच्या सुरुवातीच्या शिक्षणाद्वारे जोडलेले आहोत.

एके दिवशी मला खूप ताप येत होता. मी आजारी आहे हे पाहून अनुराग रडू लागला आणि तो दोन दिवस शाळेत गेला नाही. आम्ही दोघे एकमेकांची खूप काळजी घेतो. त्यामुळे आमच्या दोघांची मैत्री ही आणखीनच मजबूत होते.
उत्तर लिहिले · 9/2/2020
कर्म · 19320
0
नमस्कार. माझा मित्र या विषयावर मी सविस्तर निबंध माझ्या ब्लॉग मध्ये लिहिलेला आहे. जर आपल्याला या विषयावर सोप्या भाषेतील सखोल निबंध हवा असल्यास कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या. धन्यवाद.
उत्तर लिहिले · 30/3/2021
कर्म · 1100
0

मित्रा, निबंध कसा लिहायचा यासाठी काही मार्गदर्शन खालीलप्रमाणे:

१. विषय निवड:

  • तुम्हाला लिहायचा असलेला विषय निवडा.
  • विषय निवडताना तुम्हाला आवड निर्माण होईल असा विषय निवडा.

२. माहिती गोळा करा:

  • विषयाशी संबंधित माहिती मिळवा.
  • पुस्तके, लेख, इंटरनेट, किंवा तज्ञांची मदत घ्या.

३. रूपरेषा तयार करा:

  • निबंधाची रूपरेषा तयार करा, जसे की प्रस्तावना, मुख्य भाग आणि निष्कर्ष.
  • प्रत्येक भागामध्ये काय लिहायचे आहे, याचे मुद्दे तयार करा.

४. प्रस्तावना:

  • प्रस्तावना आकर्षक आणि विषयाची ओळख करून देणारी असावी.
  • विषयाबद्दलची उत्सुकता निर्माण करा.

५. मुख्य भाग:

  • मुख्य भागामध्ये विषयावर विस्तृत माहिती लिहा.
  • प्रत्येक मुद्दा स्पष्ट करा आणि त्याचे समर्थन करा.
  • उदाहरण आणि दाखले द्या.

६. निष्कर्ष:

  • निष्कर्षामध्ये निबंधाचा सार लिहा.
  • मुख्य विचार आणि मुद्दे पुन्हा सांगा.
  • निष्कर्ष सकारात्मक आणि विचार करायला लावणारा असावा.

७. भाषा आणि शैली:

  • भाषा सोपी आणि स्पष्ट ठेवा.
  • वाक्य रचना व्यवस्थित असावी.
  • शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.

८. पुनरावलोकन:

  • निबंध लिहून झाल्यावर तो पुन्हा वाचा.
  • Grammatical चुका तपासा.
  • आवश्यक बदल करा.

उदाहरण:

विषय: 'माझी शाळा'

प्रस्तावना: माझ्या शाळेचे नाव [शाळेचे नाव] आहे. माझी शाळा खूप सुंदर आहे.

मुख्य भाग: माझ्या शाळेत मोठे वर्ग आहेत. शिक्षक खूप चांगले शिकवतात. शाळेत एक मोठी लायब्ररी आहे. खेळायला मोठे मैदान आहे.

निष्कर्ष: मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेमुळे मला खूप काही शिकायला मिळते.

हे काही मुद्दे आहेत ज्यांच्या आधारे तू निबंध लिहू शकतोस. All the best!

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1640

Related Questions

जिल्हा परिषद शाळा चांगली की इंग्लिश शाळा चांगली?
इयत्ता दहावी, शास्त्रीय कारणे: सगळ्या पुस्तकांतील?
एका परीक्षा केंद्रामध्ये एका वर्गामध्ये 7 रांगा आहेत असे एकूण 3 वर्ग आहेत. एका रांगेत 25 विद्यार्थी बसतात, एका रांगेसाठी 2 शिक्षक आणि एका वर्गासाठी एक पर्यवेक्षक आहे. तर एका केंद्रप्रमुखासह परीक्षाकेंद्रामध्ये एकूण किती लोक उपस्थित आहेत?
ITI परीक्षा कधी आहे?
Badati mhnje kay badatiche uddhesh spshta kara?
बदती म्हणजे काय? बदतीचे उद्देश स्पष्ट करा?
मुद्दे: शिक्षणाचे तत्त्वे?