आरोग्याचा मंत्र काय?
साभार -डॉ. महेश बरामदे
गतिमान आयुष्यात सतत पळापळ, हे जीवनाचे सूत्र झाले आहे. सतत कामाच्या पाठीमागे धावणार्या लोकांना खाण्यापिण्याविषयीही शुद्ध नसते. दिवसभरात आहारावर लक्ष दिलेले नसताना, रात्री घरी आल्यावर भरपेट जेवण्याकडेच सगळ्यांचा कल दिसतो. आहार आणि आरोग्य हे एकमेकांशी जोडले गेले आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे; पण तरीही काहीवेळा आहाराचे नियम डावलले जातात. रात्री कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, हे पाहूया...
*🍀 भाज्या 🍀*
अनेक आरोग्यदायी भाज्या रात्री उशिरा जेवणात खाण्यात आल्या की, त्रास होतो. भाज्या आरोग्यदायी असल्या, तरीही त्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने त्या पचायला काही कालावधी लागतो.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=306875023043761&id=100011637976439
त्यामुळे खूप उशिरा जेवताना भाज्या खाल्ल्यास जेवण न पचल्याने व्यक्ती नीट झोपू शकत नाही.
*🍗लाल मांस 🍗*
मांसाहारात लाल मांस म्हणजेच मटण खाल्ले जाते; पण रात्री उशिरा कोणत्याही प्रकारचा मांसाहार टाळणेच हितकारक आहे. मांसाहारात विशेषतः मटणात अधिक प्रमाणात चरबी आणि प्रथिने असतात. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो.
रात्री मटण किंवा मांसाहार केल्यास अस्वस्थता येते आणि गाढ झोप लागत नाही. संपूर्ण दिवस कष्ट केल्यानंतर रात्रीची झोप सर्वात आवश्यक असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात मांसाहार न केलेलाच बरा.
*🍗मसालेदार जेवण🍲*
मांसाहाराप्रमाणेच मसालेदार जेवणाची आवड असणार्यांना सावध होण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी मसालेदार जेवण केल्यास पोटात वायू होणे म्हणजेच गॅसेसचा त्रास, पित्त होणे यासारखे त्रास होतात. त्यामुळे संपूर्ण रात्र व्यक्ती तळमळत काढते.
वेफर्स आणि इतर स्नॅक्स रात्रीच्या वेळी प्रक्रियायुक्त आहार घेणे नक्कीच चुकीचे आहे. या पदार्थात अजिनोमोटो म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेट असते. त्याचे अतिसेवन झाल्यास निद्रेसंबंधी आजार होतात.
_माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव_
*🍩पास्ता आणि पिझ्झा🍕*
आपण खूप काळ भुकेले असाल, तर पास्ता हा उत्तम आहारा सांगितला जातो. कारण, पास्ता खाल्ल्यावर खूप वेळपर्यंत भूक लागत नाही; पण रात्रीच्या वेळी मात्र पास्ता न खाणेच इष्ट. कारण, पास्तामध्ये चरबी किंवा मेदाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वजनवृद्धी होते. पास्त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेटचे रूपांतर वेगाने चरबीत होते. त्यामुळे तो पचायला वेळ लागतो. हीच गोष्ट पिझ्झाची.
*🍧आइस्क्रिम🍧*
आइस्क्रिम कोणाला नाही आवडत. न आवडणारी व्यक्ती शोधूनच काढायला हवी; पण आपण सर्रास जेवणानंतर आइस्क्रिम खातो; पण आइस्क्रिममध्ये भरपूर प्रमाणात चरबी आणि साखर दोन्ही असते. आइस्क्रिम खाऊन आपण लगेचच झोपूनही जातो. या काळात कॅलरी जळण्यासाठी काहीच वाव नसतो. त्यामुळेच वजनवृद्धी होते.
*🍛ओटस् किंवा कॉर्नफ्लेक्स🍲*
हल्ली सकाळच्या न्याहारीला झटपट पदार्थ म्हणून ओटस् किंवा कॉर्नफ्लेक्स खाल्ले जातात; पण रात्रीच्या वेळी मात्र याच गोष्टी त्रासदायक ठरतात. या दोन्हीमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रात्री कॉर्नफ्लेक्स किंवा ओटस् खाल्ल्यास झोप लागत नाही.
Mahitiseva group pethvadgaon
*🍬चॉकलेट🍬*
आइस्क्रिमसारखेच चॉकलेटची भुरळ पडते. रात्रीच्या जेवणानंतर गोड खायचे म्हणून लोक आनंदाने चॉकलेट खातात. मात्र, चॉकलेटमध्ये कॅफीनचे खूप अधिक प्रमाण असते, त्यामुळे रात्री झोप येणे कठीणच असते.
*☕चहा किंवा कॉफी☕*
रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी प्यायल्याने आपल्या मेंदूवर त्याचा परिणाम होत असतो. कॅफीन असणारे कोणतेही पेय रात्रीच्या वेळी पिणे झोपेवर परिणाम करत असते. कारण, त्यामुळे तीन ते चार तास झोप येत नाही.
*🍷मद्यपान 🍷*
मद्यपान केल्यानंतर लवकर झोप येते; पण अगदी गाढ झोपेची गरज असताना मद्य प्यायल्यास झोपेची शक्यता नाही. मात्र, नशा उतरल्यावर दुसर्या दिवशी झोप घेतल्याशिवाय आराम मिळत नाही.
या गोष्टींचे पथ्य रात्री उशिरा जेवताना पाळल्यास दुष्परिणाम सहजपणे टाळता येतील.
आरोग्य चांगले राहण्यासाठी काही महत्वाचे मंत्र खालीलप्रमाणे:
- सकस आहार:
आपल्या आहारात फळे, भाज्या, धान्ये आणि प्रथिने यांचा समावेश असावा. जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत.
स्त्रोत: WHO Healthy Diet
- नियमित व्यायाम:
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही धावणे, चालणे, योगा किंवा कोणताही खेळ खेळू शकता.
स्त्रोत: CDC Physical Activity Basics
- पुरेशी झोप:
दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
स्त्रोत: NIH Sleep Deprivation
- तणाव व्यवस्थापन:
तणाव कमी करण्यासाठी ध्यान, श्वासोच्छ्वास व्यायाम आणि मनोरंजक गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
स्त्रोत: Mayo Clinic Stress Relief
- पुरेसे पाणी पिणे:
दिवसभर पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
हे काही मूलभूत मंत्र आहेत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही आपले आरोग्य सुधारू शकता.