2 उत्तरे
2 answers

हरिहरेश्वर काय आहे?

4
कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान म्हणजे हरिहरेश्वर. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजुला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा. तसेच नारळी पोफळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तिर्थस्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख 'श्री हरीहरेश्वर माहात्म्य' पोथीमध्ये आहे. हरिहरनावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरुप या दोन्हींचा संगम झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्वाची स्थाने आहेत.
हर‍िहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे. ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे. परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत. येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत.
उत्तर लिहिले · 20/1/2020
कर्म · 7285
0

हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर शहर आहे.

ठिकाण: हे शहर मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे.

विशेषता:

  • हरिहरेश्वर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
  • येथे सुंदर समुद्रकिनारे, मंदिरे आणि हिरवीगार डोंगर आहेत.
  • हे शहर धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

प्रमुख आकर्षणे:

  • हरिहरेश्वर मंदिर: हे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे.
  • समुद्रकिनारा: हरिहरेश्वरमध्ये स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे.
  • गणपती टेकडी: या टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे आणि येथून समुद्राचा सुंदर देखावा दिसतो.

हरिहरेश्वर हे एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे, जिथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेऊ शकतात आणि धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

जटायु मंदिर कोठे आहे?
कामाख्या देवीचे वैशिष्ट्य काय आहे?
रामेश्वरम हे कशासाठी प्रसिद्ध आहे?
भगवंत मंदिर बाशी कुठे आहे?
दुर्योधनाची पूजा कोठे केली जाते?
शिखर शिंगणापूरबद्दल माहिती द्या?
चारठाणा येथील मंदिर कशाचे आहे?