
धार्मिक स्थळ
हे मंदिर सुमारे 162.6 हेक्टर (402 एकर) क्षेत्रफळात पसरलेले आहे. अंगकोर वाट हे केवळ सर्वात मोठे मंदिरच नाही, तर ते जगातील सर्वात महत्वाचे पुरातत्वीय स्थळांपैकी एक आहे.
जटायु मंदिर केरळ राज्यात आहे.
हे मंदिर கொல்லம் (Kollam) जिल्ह्यात Chadayamangalam नावाच्या गावी एका मोठ्या टेकडीवर आहे.
हे ठिकाण तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळापासून (Thiruvananthapuram International Airport) सुमारे 51 किलोमीटर अंतरावर आहे.
अधिक माहितीसाठी:
कामाख्या देवी मंदिर हे भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी शहरामध्ये स्थित आहे. हे मंदिर तंत्रमार्गातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते.
- योनीरूपात देवी: येथे देवीची मूर्ती नसून योनीच्या रूपात तिची पूजा केली जाते.
- अंबुबाची उत्सव: दरवर्षी जून महिन्यात अंबुबाची उत्सव असतो, ज्यात देवी रजस्वला होते, असा समज आहे. या काळात मंदिर तीन दिवस बंद ठेवले जाते.
- नैसर्गिकरित्या रक्तस्त्राव: मंदिरातील योनीतून नैसर्गिकरित्या रक्तस्त्राव होतो, असे मानले जाते.
- तंत्र साधना: हे मंदिर तंत्र साधनेसाठी महत्वाचे केंद्र आहे.
- 51 शक्तिपीठांपैकी एक: कामाख्या मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक बेट शहर आहे. हे शहर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे:
- रामनाथस्वामी मंदिर: हे मंदिर भारतातील सर्वात महत्वाचे हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. यात जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे.
- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान: रामेश्वरम हे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान आहे.
- धनुषकोडी: हे एक निर्जन शहर आहे, जे 1964 च्या चक्रीवादळात पूर्णपणे उध्वस्त झाले होते. हे शहर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सीमेवर आहे.
- पंबन पूल: हा भारतातील पहिला समुद्रावरील पूल आहे, जो रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडतो.
- अगनि तीर्थम: येथे रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर प्रायश्चित्त केले होते, असे मानले जाते.
याव्यतिरिक्त, रामेश्वरम हे सुंदर समुद्रकिनारे आणि धार्मिक महत्त्वासाठी देखील ओळखले जाते.
संदर्भ:


शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक हुडकून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसर्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला 'दक्षिण कैलास' असे म्हणतात.
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात.
शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. या मंदिराविषयी आणखी एक की, जीजाबाईंना शिवनेरीवर सोडून चिंताक्रांत शहाजीराजे परतत असतांना या मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेव्हा त्यांना दृष्टांत मिळून सारे काही ठीक होईल असे शंकरांनी सांगितले. या गोष्टीची आठवण म्हणून जरी पटक्याबरोबर भगवा झेंडाही लावण्याचे त्यांनी ठरवले.माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!