संस्कृती पूजा महाभारत धार्मिक स्थळ

दुर्योधनाची पूजा कोठे केली जाते?

2 उत्तरे
2 answers

दुर्योधनाची पूजा कोठे केली जाते?

2
🄼🄰🄷🄸🅃🄸

*🔹 भारतातील अशी दोन मंदिरे जेथे ‘दुर्योधनाची’ पूजा केली जाते*











————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
दुर्योधन म्हणजे महाभारतातील सर्वात दुष्ट पात्र ! महाभारत घडण्यासाठी दुर्योधनाचा अहंकार आणि पांडवांप्रती असलेला त्याचा द्वेष कारणीभूत होता हे आपण सर्वजण जाणतोच. https://bit.ly/4cCOqEM अश्या या दुर्योधनाला देवाचे रूप प्राप्त आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. आपल्या भारतात दोन टोकांना म्हणजे उत्तरेला आणि दक्षिणेला दुर्योधनाची दोन मंदिरे आहेत आणि तेथील स्थानिक न चुकता दरोरोज दुर्योधनाची पूजा करतात हे विशेष!
🔹एक मंदिर आहे उत्तराखंड राज्यामधील उत्तरकाशी या ठिकाणी ! : 
या भागातील एकूण २२ गावातील स्थानिक दुर्योधनाची पूजा करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक गावामध्ये दुर्योधनाची आणि इतर कौरवांची छोटी छोटी देऊळे आहेत. या गावांपैकी नेतवाड-जखोल-ओस्ला या गावामध्ये दुर्योधनाचे सर्वात मोठे मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहेकी दुर्योधन या संपूर्ण भागाला वाईट प्रवृत्तींपासून वाचवतो आणि या भागाचे संरक्षण करतो. अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा दुर्योधन मृत्यू पावला तेव्हा येथील स्थानिक इतके रडले की त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंमधून येथील तामस नदीचा उगम झाला. या भागात दुर्योधन-कौरव यांच्या नावाने मोठे उत्सव साजरे केले जातात. सर्वात मोठा उत्सव हा वैशाख महिन्यात होतो. या उत्सवावेळी लोक रात्रभर जागरण करतात आणि ज्या माणसाच्या अंगात दुर्योधन येतो तो माणूस रुपन आणि सुपन नद्यांच्या काठी यमराजाने बोलावलेल्या भूतांच्या बैठकीसाठी जातो. तो भूतांना आणि यमराजाला प्रश्न विचारतो आणि पहाटे पुन्हा मंदिराच्या ठिकाणी परततो. दुर्योधनाला मेंढी अर्पण करण्याची येथे प्रथा आहे असे केल्याने दुर्योधनाची आपल्यावर कृपादृष्टी होते असे येथील गावकऱ्यांचे मत आहे.            
╔══╗ 



╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
🔹दुसरे मंदिर आहे केरळ राज्यात ! : 
केरळ राज्याच्या कोल्लम जिल्ह्यात मलांडा नावाचे एक मंदिर आहे.हे मंदिर दुर्योधन आणि त्याच्या उर्वरित ९९ भावांना म्हणजेच कौरवांना अर्पित आहे. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫मलांडा मंदिरामध्ये मलायापोप्पमदेव या नावाने द्रविडी परंपरेने दुर्योधनाची पूजा अर्चा केली जाते. या भागातील कौरव समाजाचे लोक दुर्योधनाला आपला मूळपुरुष मानतात. दुर्योधनाच्या या मलांडा मंदिरामध्ये भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण आणि दुशला यांच्याही मुर्त्या आढळतात.ᵐᵃʰⁱᵗⁱ
मंदिरात येणारे भाविक दुर्योधनाला मद्य, सुपारी, कोंबडाआणि लाल रंगाचे कपडे अर्पण करतात. येथील कौरव समाज मार्च महिन्यात दुर्योधनाच्या नावाने ‘मालाकुडा’ नावाचा सण साजरा करतात. केरळ मधील प्रसिद्ध ‘केत्तूकाझचा’ परंपरा ‘मालाकुडा’ सणापासूनच सुरु झाली आहे.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24



______
0

दुर्योधनाची पूजा भारतामध्ये काही ठिकाणी केली जाते. त्यापैकी काही प्रमुख ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:

  • केरळ: केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये 'मालनाड मलनिकुळंगरा' (Malenad Malanikkulangara) नावाचे एक मंदिर आहे, जिथे दुर्योधनाची पूजा केली जाते. या मंदिराविषयी अधिक माहिती येथे वाचा.
  • उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी दुर्योधनाला देव मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.
  • कर्नाटक: कर्नाटकमध्येही दुर्योधनाची पूजा काही विशिष्ट समुदायांमध्ये केली जाते.

दुर्योधनाची पूजा विशेषतः दक्षिण भारतात आणि काही आदिवासी समुदायांमध्ये प्रचलित आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

जटायु मंदिर कोठे आहे?
कामाख्या देवीचे वैशिष्ट्य काय आहे?
रामेश्वरम हे कशासाठी प्रसिद्ध आहे?
भगवंत मंदिर बाशी कुठे आहे?
शिखर शिंगणापूरबद्दल माहिती द्या?
चारठाणा येथील मंदिर कशाचे आहे?
हरिहरेश्वर काय आहे?