अध्यात्म देव नामस्मरण

नामस्मरण म्हणजे काय?

4 उत्तरे
4 answers

नामस्मरण म्हणजे काय?

5
नामस्मरण म्हणजे नावाची आठवण परंतु अध्यात्मात नाव आठवत सतत म्हणजे नामस्मरण हे नेहमी करणे म्हणजेच ''जप ''.
जप म्हणजेच नामस्मरण आपण आपल्या आवडत्या देवाचे आपपल्या आवडीने करु शकतो.
देवाचे अस्तित्व जाणवले की मनुष्य नामस्मरण करीत राहतो अस्तित्व हे कोणत्याही व्यक्ती रुपात मदत करुन आपली काळजी दुर करुन तो जाणवतो.
जसे एखाद्या पदार्थातील गोडी दिसत नाही किंवा फुलातील सुगंध दिसत नाही  पण आपण जाणवतो तस देवाचे अस्तित्व जाणवते.
देवाचे रुप कोणतेही असो तो जळी स्थळी चराचरात आहे नामस्मरण म्हणुन कुठेही करावे.
म्हणुन म्हटले ''हरी मुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी ''
'' ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरुप मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ''.
उत्तर लिहिले · 9/1/2020
कर्म · 20950
3
संपुर्ण विश्व स्पंदनशील आहे, विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे, मनुष्य हा सुध्दास्पंदनाचा समूह आहे. पूर्व जन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुध्द आहेत तर बर्याच अंशी अशुध्द आहेत, तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल, तो क्षणात भावुक बनेलतर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन कृषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण,ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रहकेलेला आहे. या गोष्टींनी आपली स्पंदने शुध्द होत असतात, आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते.
श्रीगुरु भक्ताची अशुध्द स्पंदने (पाप व दु:खे) खेचून घेत असतात म्हणून श्रीगुरुंच्या सहवासाची आस घरावी. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरण करुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.
एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्णहोतो. तसेच सदगुरुंची भक्ती करणारा सदगुरु रुप होतो.एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन:पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय.
उत्तर लिहिले · 9/1/2020
कर्म · 16430
0

नामस्मरण म्हणजे एखाद्या देवतेच्या नावाचा किंवा मंत्राचा सतत जप करणे. हे एक प्रकारची उपासना आहे.

  • नामस्मरण हे अनेक धार्मिक परंपरांमध्ये महत्वाचे मानले जाते.
  • यामुळे मनःशांती मिळते आणि एकाग्रता वाढते, असा समज आहे.
  • नामस्मरण करताना, भक्त विशिष्ट नावाची किंवा मंत्राची पुनरावृत्ती करतात.

नामस्मरण हे ध्यान आणि प्रार्थनेचा एक भाग आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 4820

Related Questions

सतत नामस्मरण करावे का?
नामस्मण कसे करावे?
दत्तात्रेयाचे कोणते नामस्मरण करावे?